
अवैधरित्या सरकारी तांदुळाची वाहतुक करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
स्थानिक गुन्हे शाखेने अवैध तांदुळाची वाहतुक करणारे आरोपी केले गजाआड…
भंडारा (प्रतिनिधी) – मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारवर तांदुळाची अवैध वाहतूक करणाऱ्या १) ट्रक क्रमांक एम.एच.२६/सि.एच. ७३७३ चा चालक नामे अकबर निजाम शेब्छा (वय ३२ वर्षे), रा.ममदापुर, ता.परळी वैजनाथ, जि.बिड. ह.मु. कृषी कॉलोनी परभणी, २) ट्रक नामे नदिम खान मो.इसा खान रा. नांदेड, ३) माल भरून देणारा बालाजी जाधव रा
नांदेड, ४) माल भरून देणारा सैफ पठाण, रा. वाशिम, ५) रायस मिल राजेश अग्रवाल रा गोंदिया, या पाच आरोपींना शिताफीने अटक करून त्यांच्या २९६४० किलो तांदूळ ८ लाख ६७ हजार आणि एक ट्रक ज्याची किं.२५ लाख असा एकूण ३३ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे.


या बाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर यांना गोपनीय खबर मिळाली की, नानपुर ते भंडारा हायवेनी ट्रक क्रमांक एम.एच.२६ सी.एच.७३७३ ने बेकायदेशिर अवैधरित्या तांदुळाची वाहतुक होत आहे अशी माहिती मिळाल्यावरून त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव पुंजरवाड, पोलीस उपनिरीक्षक, अनिलकुमार चांदोरे, पोलीस हवालदार पो.हवा. नितीन महाज, पो.हवा. राजेश पंचबुश्रे, पो.हवा. अजय बारापात्रे, पो.हवा. संदिप मते, पोहवा, रमेश बेदुरकर, पो.अंमलदार मंगेश माळोदे यांना तात्काळ रवाना केले असता, सदर पथक नानपुर नाका भंडारा येथे हजर असतांना मिळालेल्या नोपनीय माहीतीप्रमाणे अंदाजे १३:३० वा सुमारास नानपुर नाका येथे ट्रक क्रमांक एम.एच.२६/सी.एच. ७३७३ हा येतांना दिसला, ट्रक चालकास त्यांचा ट्रक रोडच्या कडेला थांबविण्याचा ईशारा केला, चालकाने त्याचे ट्रक रोडच्या कडेला थांबवून त्याचे ट्रक मध्ये असलेल्या मालाबाबत विचारपुस करीत असतांना तो उडवा उडविचे उत्तरे देवु लागल्याने सदर पथकाने ट्रकवर झाकुन असलेली ताडपत्री बाजुला करून तपासणी केली असता ट्रक मध्ये अंदाजे २१६४० किलो ग्रॅम तांदुळ अंदाजे किं
८.६७,०००/रू तांदुळ मिळून आला. मिळुन आलेल्या तांदळाची शहानिशा करण्याकरीता तहसिलदार भंडारा यांना माहिती देवून, त्यांनी त्यांचे कार्यालयात हजर असलेले निरीक्षण अधिकारी तहसिल कार्यालय भंडारा यांना पाठवुन त्यांनी वाहनात असलेल्या तांदुळाची व कडधान्ये तपासुन त्यांनी ट्रक मध्ये असलेले तांदुळ बेकायदेशिर असल्याचे सांगितले, ट्रक चालक नामें अकबर निजाम शेब्ख (वय ३२ वर्षे), रा. ता.परळी वैजनाथ, जि. बिड. ह.मु. कृषी कॉलोनी परभणी, यास तांदुळाबाबत विचारपुस केली असता, ट्रक मालक नामे नदिम शेख, नांदेड याचे सांगणेवरून, नांदेड येथुन भरत जाधव, नांदेड, व रौफ भाई यांनी वाशिम येथुन तांदुळ भरून दिल्याचे सांगुन सदरचे तांदुळ राहुल राईस मिल गोंदियाचे मालक राजेश अग्रवाल याचे कडे घेवुन जात असल्याचे सांगितल्याणे फिर्यादी नामे पोचीराम रामा कापडे (वय ४५ वर्षे), निरीक्षण अधिकारी तहसिल कार्यालय भंडारा यांचे लेखी तक्रारीवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव पुंजरवाड, पोलीस उपनिरीक्षक, अनिलकुमार चांदोरे, पोलीस हवालदार,नितीन महाजन,पो.हवा. राजेश पंचबुश्रे, पो.हवा. अजय बारापात्रे, पो.हवा. संदिप मते, पोहवा, रमेश बेदुरकर, पो.अंमलदार मंगेश माळोदेलसर्व नमुद पोलीस अधिकारी व अंमलदारांनी अथक परिश्रम व कौशल्यपुर्ण गोपनीय माहिती काढून आरोपीस ताब्यात घेवुन गुन्ह्याची उकल केली आहे.



