
धोकादायक व्यक्ती हातभट्टीवाला रविन्द्र व दिनेश उर्फ डाल्या यांचेवर भंडारा पोलिसांची MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही….
हातभट्टीवाला रविंद्र रामचंद मेश्राम व दिनेश उर्फ डाल्या यांचेवर भंडारा पोलिसांची एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही, अनुक्रमे भंडारा व नागपुर कारागृहात येथे केली रवानगी…..
भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत् असे की,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी म्हनुन पोलिस अधिक्षक लोहीत मतानी यांनी जिल्ह्यातील धोकादायक व्यक्तीवर कडक करण्याचे आदेश निर्गमित केले होते


त्या अनुषंगाने रविंद्र रामचंद मेश्राम वय 43 वर्ष रा. सिरसघाट ता. जि. भंडारा (महाराष्ट्र) हा पोलिस स्टेशन कारधा परीसरातील सिरसघाट येथील रहिवासी असुन तो आपल्या सोबत गुंड प्रवृतीच्या लोकांना सोबत घेऊन हातभट्टी मोहफुलाची दारु काढुन हातभट्टीवाला व्यक्ती अशी ओळख निर्माण केली आहे. रविंद्र रामचंद मेश्राम हा मागील 5 वर्षापासुन हातभट्टीची दारु काढण्याचे व्यवसायात सक्रिय असुन त्याचेवर पोलिस स्टेशन, कारधा येथे हातभट्टी दारु निर्मीती, विक्री अशा प्रकारचे 4 गुन्हे दाखल असुन
दारु निर्माण करुन मिळालेल्या पैशाचे बळावर निर्दोष सुटका करीत आहे. त्याने त्याची एमपीडीए कायद्यान्वये हातभट्टीवाला व्यक्ती अशी ओळख निर्माण केली होती.

त्याच प्रमाणे दिनेश उर्फ डाल्या मधुकर मेश्राम वय 49 वर्ष रा. आंबेडकर वार्ड तुमसर, ता.तुमसर, जि. भंडारा पोलिस स्टेशन तुमसर परीसरातील आंबेडकर वार्ड तुमसर येथील रहिवासी असुन तो गुंड
धोकादायक व खुनसी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. दिनेश उर्फ डाल्या मधुकर मेश्राम हा सन 2021 पासुन निर्विघ्न गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असुन त्याचेवर पोलिस ठाणे तुमसर, भंडारा येथे खुनाचा प्रयत्न, सरकारी कर्मचारी हमला, दंगा, मोक्का कायदा अशा प्रकारचे 4 गुन्हे दाखल आहेत. त्याने त्याची एमपीडीए कायद्यान्वये धोकादायक व्यक्ती अशी ओळख निर्माण केली होती.

म्हनुन जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनात रविंद्र मेश्राम व दिनेश उर्फ डाल्या मधुकर मेश्राम वय 49 वर्ष रा. आंबेडकर वार्ड तुमसर ता.तुमसर जि. भंडारा (महाराष्ट्र) याचे विरुध्द एमपीडीए कायद्यान्वये प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यास दिनांक 5/04/2024 रोजी जिल्हाधिकारी, भंडारा श्री. योगेश कुंभेजकर यांचे आदेशाने ताब्यात घेऊन अनुक्रमे भंडारा व नागपुर मध्यवर्ती कारागृह येथे दाखल करण्यात आले.
यांनतर सुध्दा अशा धोकादायक व्यक्ती, रेती तस्कर, हातभट्टीवाले यांचे गुन्हे अभिलेख तपासुन एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यासाठी पोलिस प्रशासन दक्ष आहे.
सदरच्या दोन्ही कार्यवाही पोलिस अधीक्षक लोहीत मतानी,अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे,सहा.पोलिस अधिक्षक रश्मिता राव यांचे मार्गदर्शनात नितीनकुमार चिंचोळकर पोलिस निरीक्षक (स्था. गु.शा.), गणेश पिसाळ,पोलिस निरीक्षक, कारधा,तत्कालीन ठाणेदार निलेश ब्राम्हणे, व नरेंद्र हिवरे पोलिस निरीक्षक, पो.स्टे. तुमसर, सफौ धर्मेद्र प्रधान,पो.हवा. राजेश पंचबुधे,पो.हवा रणधिर डोंगरे,नापोशि अंकोश पुराम,मार्कंड डोरले, पो.शि. प्रमोद आरीकर यांनी केली.
,


