अवैध रेतीची वाहतुक करणारे SDPO भंडारा पथकाचे ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्यांना SDPO भंडारा यांचे पथकाने घेतले ताब्यात….

भंडारा (प्रतिनिधी) – भंडारा पोलिसांनी विना परवाना अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या दोघांना शिताफिने अटक करून त्यांच्या ताब्यातून ट्रॅक्टर, ट्रॉली, रेती असा एकूण ५ लाखाचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी पो.शी. रोहन काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरठी पोलिस ठाण्यात १८९/२४ कलम ३०३(२), ४९ भा.न्या.सं. सहकलम ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, सहकलम ७, ९ पर्यावरण संरक्षण अधिनियम सहकलम ५०/१७७, १३९/१७७ मो.वा.का. अंतर्गत आरोपी – मुकंदर भावराव भोयर (वय ३३ वर्षे), रा. टाकळी पुनर्वसन, ता. जि. भंडारा आणि सतीश कैलाश राघोते, (वय ३३ वर्षे), रा. खमाटा, ता.जि.भंडारा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.२४सप्टेंबर) रोजी पो.हवा. सुभाष राठोड, पो.हवा. साजन वाघमारे, पो.हवा. राजेश टेंभुर्णे, पो.अं. वैभव काळे, पो.अं. रोहन काळे, पो.अं. विजय राघोर्ते, पो.अं. स्वप्नील शिवनकर सर्व एस.डी.पी.ओ. पथक भंडारा यांच्या पथकाने पो.स्टे. वरठी परिसरात अवैद्य रेती वाहतुक कारवाई करण्याकरीता पेट्रोलींग करीत असतांना पथकाला मिळालेल्या माहीतीप्रमाणे मौजा दाभा येथे मागोवा काढत दबा धरुन बेटाळा, कोथुर्णा गावाकडुन दाभाकडे यातील आरोपी मुकंदर भावराव भोयर (वय ३३ वर्षे) रा.टाकळी, पुनर्वसन ता.जि. भंडारा. हा ट्रॅक्टर मालक सतीश कैलाश राघोर्ते (वय ३३ वर्षे) रा.खमाटा ता.जि. भंडारा याचे सांगण्यावरुन त्याचे ताब्यातील विना नंबरच्या स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टरचे ट्रॉलीमध्ये ०१ ब्रास रेती विना परवाना (विना रॉयल्टी) अवैद्यरित्या वाहतुक करतांना मिळुन आल्याने वेळीच पंचासमक्ष कारवाई करुन दोन्ही आरोपीसह १) एक विना नंबरचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर की. ४,००,०००/-रु. २) एक सेंद्री रंगाची ट्रॉली की.१,००,०००/-रु. २) एक ब्रास रेती की. ५,५००/-रु. असा एकुण ५,०५५००/-रु.चा मुद्देमाल जप्त करुन पो.स्टे. वरठी येथे देण्यात आले आहे. दोन्ही आरोपींना अटक करुन कोर्टासमक्ष हजर केले असता दोन्ही आरोपीतांचा एक दिवसाचा पीसीआर मंजुर करण्यात आला.



अशा प्रकारे सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नूरुल हसन,अपर पोलीस अधीक्षक, ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, भंडारा डॉ.अशोक बागुल, यांचे मार्गदर्शनात सफौ साजन वाघमारे,पो.हवा. साजन वाघमारे, पो. हवा. सुभाष राठोड, पोशि वैभव काळे, रोहन काळे, विजय राघोर्ते, स्वप्नील शिवनकर सर्व एस.डी.पी.ओ. पथक भंडारा यांनी केलेली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!