
पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशाने दहशतवाद विरोधी पथकाची अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणाऱ्यावर मोठी कार्यवाही…
सिमेलगतच्या राज्यातुन अवैधरित्या प्रतिबंधित अशा सुगंधीत तंबाखुची वाहतुक करणाऱ्या वाहनावर दहशतवाद विरोधी पथक पो.स्टे. दिघोरी यांचा नाकाबंदी करुन छापा, चारचाकी एकुन वाहनासह एकुण रूपये ११,१६,६५५/- किमतीचा मुद्देमाल जप्त…..
भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,भंडारा जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैद्य धंदे सुरू राहणार नाही याकरिता नागरिकांनी सहाकार्य करून अवैद्य धंदयाची माहिती दिल्यास त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन भंडारा जिल्हा पोलिस अधिक्षक नूरूल हसन यांनी भंडारा जिल्हयातील सर्व नागरिकांना केले होते. व त्यांना त्यांच्या तकारी देण्याकरीता प्रसारित करण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकावर माहिती देण्याचे व माहिती देण्या-याचे नाव गुप्त ठेवणार असल्याचे सांगितले होते.


त्या अनुषंगाने दि. २६ जानेवारी रोजी एका सुजान नागरिकांकडुन माहिती मिळाली की, गोंदिया जिल्हातुन भंडारा जिल्हयाचे पो. स्टे. दिघोरी हद्दीत एका स्कॉरपीयो वाहनातुन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेल्या सुगंधीत तंबाखुची वाहतूक होणार आहे अशा. मिळालेल्या गोपनीय माहितीनरुन पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी त्यांचे अधिनस्त असलेल्या दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाला सदर ठिकाणी जावुन कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केले होते.

त्यानुसार दहशतवाद विरोधी पथकातील अधिकारी सपोनि गोरखनाथ नागलोत, हे त्यांचे शाखेतील स्टॉपसह पो.स्टे. दिघोरी हद्दीत खाना होवुन पो.स्टे. दिघोरी येथील स्टॉप मदतीला घेवुन रात्री ९.०० वा. वे सुमारास दिघोरी ते पालांदूर जाणाऱ्या रस्त्यावर चुलबंध नदीचे पुलाजवळ नाकाबंदी करून संशयीत वाहनाचे तपासणी करीत असतांना एम.एच.-४० ऐ/६८७९ क्रमांकाची स्कॉरपीओ या वाहनास अडवुन तपासणी केली असता त्यामध्ये मिळालेल्या गोपनीय माहिती प्रमाणे वाहनाचे पाठीमागील सिट काढून त्यामध्ये पांढऱ्या व पिवळ्या रंगाच्या बोरीमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेली सुगंधीत तंबाखु आढळून आली. वाहन चालकास व त्याचेसोबत असलेल्या ईसमास त्यांचे नाव व पत्ता विचारले असता वालकाने आपले नाव भरत नरेश खापरिकर वय १९ वर्ष रा. कोंढा-कोसरा ता. पवनी जिल्हा भंडारा, व त्याचेसोबत असलेल्या इसमाने आपले नाव नयन राजेश नंदनवार वय २१ वर्ष रा. अडयाळ ता. पथनी असे सांगुण सदर वाहन हे अड्याळ येथील आशु शेख याचे मालकीचे असुन वाहनात असलेली सुगंधीत तंबाखु आम्ही त्याचे सांगण्यावरून राजनांदगाव येथुन आणल्याचे सांगीतले.

सदर वाहनामध्ये मिळून आलेल्या सुगंधीत तंबाखुची पंचासमक्ष पाहणी केली असता त्यामध्ये होला हुक्का, ईगल हुक्का, मजा १०८, प्रिमीयम पान पराग मसाला असे एकुण रूपये ६,१६,६५५/- किमतीची प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु व रूपये ५,००,०००/- किमतीची एम.एच.-४० ऐ/६८७९ स्कॉरपीओ वाहन असे एकुण रूपये ११,१६,६५५/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी राजेश बळीराम यादव अन्न व सुरक्षा अधिकारी, नागपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून तीन्ही आरोपी विरुध्द पो.स्टे. दिघोरी येथे अप. क्र. ०४/२०२५ कलम २२३,२७४, २७५,१२३.३ (५) भा. न्या. सं. सहकलम ५९,२६ (२) (आय), २६ (२) (आय.व्ही.), २७ (३) (३), ३(१) (कोड झेड) (आय. व्ही.) अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन वरिल आरोपी क्र. १ व २ यांना अटक करण्यात आली असुन आरोपी क्र ३ फरार असुन शोध सुरू आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधिक्षक, ईश्वर कातकडे, यांचे मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथकातील अधिकारी स.पो.नि.गोरखनाथ नागलोत, सफौ कुरंजेकर,पो. हवा. गभने, प्रमोद वैद्य पो.शि. विजय दमाहे. आरने, चालक पो.शि. सिंगणजुडे व पो.स्टे. दिघोरीचे पो.उप.नि. बुरांडे यांनी संयुक्तरित्या केली आहे.


