
रेती चोरी प्रकरणी तुमसर पोलिसांची दोन वाहनांवर कार्यवाही…
रेती चोरी प्रकरणी तुमसर पोलिसांची दोघांवर कारवाई; साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त…
तुमसर(भंडारा)प्रतिनिधी – तुमसर पोलिसांनी अवैधरित्या ट्रॅक्टर द्वारे तुमसर येथील वैनगंगा नदी पात्रातून रेती चोरी करणाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून 11 लाख 51 हजारांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. आरोपी नामे 1) लक्ष्मण मदन गुर्वे (वय 41 वर्ष ) रा.नवरगाव, ता. तुमसर, जि.भंडारा, 2) प्रभाकर कान्हा गुर्वे (वय 41 वर्ष) रा. नवरगाव ता.तुमसर, जि.भंडारा यांच्यावर तूमसर पोलिस ठाण्यात अपराध क्र. 481/2024 कलम 303(2), 62,49, 3(5) भारतीय न्याय संहिता -2023 सहकलम – 48 (8) महा.जमिन महसुल अधि.1966 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.


या बाबत मिळालेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशन तुमसर चे पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन तुमसर येथील अधिकारी सपोनि रमेश खाडे, पो.हवा. सतिष देंगे यांना गोपनिय माहिती मिळाल्यावरुन सदर गोपनीय माहितीच्या आधारे मोजा उमरवाडा ता.तुमसर येथील वैनगंगा नदीचे पात्रात ट्रॅक्टर द्वारे रेती चोरी करत असल्या बाबतची माहिती मिळाल्यावरुन सपोनि रमेश खाडे व पो.हवा. सतिष देंगे हे तात्काळ घटनास्थळी जावुन आरोपी नामे लक्ष्मण मदन गुर्व (वय 41 वर्ष) रा.नवरगाव, ता.तुमसर, जि.भंडारा याचे ताब्यातुन एक स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर ज्याचा क्रमांक एम.एच. 36 एए/1566 त्यावर 735 AP क्रमांक लिहिलेला असुन किमत 5,00000/- रु. 2) ट्रॉली क्रमांक एम.एच. 36 एजी 0887 किं.1,00000/- रु. 3) दोन फावडे किं.प्रत्येकी 150/- रु.प्रमाणे एकूण 300/- रु. 4) दोन प्लास्टीक घमेले प्रत्येकी किंमती 100/- रु प्रमाणे एकूण 2001/- रू असा एकूण 600500/- रु. चा मुद्देमाल व दुसरा आरोपी प्रभाकर कान्हा गुर्वे (वय 41 वर्ष) रा.नवरगाव ता.तुमसर, जि.भंडारा चाचे ताब्यातुन 1) एक स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर ज्याचा क्रमांक एम.एच. 36 झेड 4032 त्यावर 735 ST असे क्रमांक लिहिलेला असून किं. 4,50,000/- रु. 2) ट्रॉली क्रमांक एम.एच. 36 ब्रेड 9825 किमत 1,00000/- रु. 3) दोन फावडे किंमत प्रत्येकी 150/- रु प्रमाणे एकुण 300/- रु. 4) दोन प्लास्टीक घमेले प्रत्येकी किं.100/- रु प्रमाणे एकूण 200/- रू असा एकूण 550500/- रु. चा मुद्देमाल असा दोन्ही आरोपितांच्या ताब्यातून 11,51,000/- रु. चा मुद्देमाल जप्त करुन नमूद दोन्ही आरोपितांविरुध्द पोलीस स्टेशन तुमसर येथे अपराध क्रमांक 481/2024 कलम 303(2), 62,49, 3(5) भारतीय न्याय संहिता 2023 सहकलम 48 (8) महा. जमिन महसूल अधि. 1966 अन्वये गुन्हा दाखल करुन तपासात आहे.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे,प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी तुमसर डॉ.अशोक बागुल यांचे मार्गदर्शनात सपोनि रमेश खाडे व पो.हवा. सतिष देंगे यांनी गोपनिय माहिती काढून केली आहे.



