
अवैधरित्या वाळुचे उत्खनन करुन विक्री करणारे मोहाडी पेलिसांचे ताब्यात….
अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोघांना अटक; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त…


भंडारा (प्रतिनिधी) – विनापरवाना अवैधरित्या रेती (वाळू) उपसा करून विक्री च्या उद्देशाने त्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना भंडारा पोलिसांनी शिताफीने अटक करून त्यांच्या ताब्यातून १) एक निळसर पांढऱ्या रंगाचा टिप्पर क्रमांक एम.एच ३४ ए.बी. ४२२७ कि. १०,००,०००/- रु. २) टिप्पर मधील अंदाजे ५ ब्रास रेती कि. २०,०००/-रु. ३) एक पिवळया रंगाची निळया विना क्रमांकाची जे.सी.बी मशीन कि. १५,००,०००/- रु. असा एकुण २५ लाख २० हजार रु. चा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी पोहवा. दुर्योधन ईश्वरदास भुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहाडी पोलिस ठाण्यात २२७/२०२४ कलम ३०३(२), ३(५) बि.एन.एस. सहकलम ५०/१७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार यातील फिर्यादी हे पो. स्टाफसह (दि.०७सप्टेंबर) रोजी बेटाळा बिट परिसरात गणेश उत्सव संबंधाने पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय खबरेवरुन माहीती मिळाली त्यावरुन दोन पंचांना अवगत करुन वर नमुद वेळी व ठिकाणी यातील आरोपी १) जावेद मेहबुब खान (वय २३ वर्ष) रा.बेटाळा टिप्पर क्रमांक एम.एच ३४ ए.बी. ४२२७ चा चालक व आरोपी क्रमांक २) जेसीबी मशीनचा चालक प्रकाश रुपचंद नेरकर (वय ३५ वर्ष), रा.बेटाळा ग्राम बेटाळा शिवारात वैनगंगा नदी घाटाकडे जाणाऱ्या रोडचे बाजुला असलेल्या रेती साठयामधुन अवैध रित्या रेती अंदाजे ५ ब्रास रेती किं.२०,०००/- ची जे.सी.बी. सहाय्याने संगणमत करुन टिप्परमध्ये भरत असताना मिळून आल्याने फिर्यादीचे रिपोर्टवरुन सदरचा गुन्हा नोंद करुन तपासात घेतला. सध्या गुन्हयातील जप्त वाहने हे पोलीस स्टेशन मोहाडी येथे आहेत. गुन्हयाचा तपास सुरेंद्र बेलखेडे पोलीस निरीक्षक, यांचे मार्गदर्शनात पोहवा राजेश गजभिये पोलीस स्टेशन मोहाडी हे करीत आहेत.

अशा प्रकारे सदरची कारवाई पोलिस अधिक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी, भंडारा डॉ. अशोक बागुल यांचे मार्गदर्शनात ठाणेदार मोहाडी पोलिस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे, पोलिस उपनिरीक्षक कातीकराम दुधकावरा, पोहवा दुर्योधन भुरे राजेश गजभिये, पो.हवा. लांडगे, पो.ना स्वप्नील मते, यांनी केलेली आहे.


