बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने केले मोटारसायकल चोरी व जबरी चोरीचे गुन्हे केले उघड….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

बुलढाणा- जिल्ह्यातील पोलिस स्टेशनला नोंद असलेले मोटार सायकल चोरी, जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करुन, त्यातील आरोपी आणि गेलेला मुद्देमालाचा शोध घेवून अशा गुन्ह्यांना वेळीच प्रतिबंध करण्यासाठी योग्य त्या उपाय योजना कार्यान्वीत करण्याकरीता  पोलिस अधीक्षक . सुनिल कडासने यांनी स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांना आदेशीत केले होते. सदर अनुशंगाने पोलिस निरीक्षक अशोक  लांडे, स्थानिक गुन्हे शाखा – बुलढाणा यांनी जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी आणि जबरी चोरी संबंधीत गुन्हे उघडकीस आणून, त्यातील आरोपीतांचा शोध आणि चोरीस
गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी अधिनस्त पोलिस पथकांना सुचना देवून पथके तयार केली होती. सदर नुसार दि. 20.09.2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय खबरेवरुन पो.स्टे. बोराखेडी हद्दीत आरोपी

1) अरुण रघुनाथ शिंदे वय 25 वर्षे रा. पळसखेड चक्का ता. सिंदखेड राजा, (





2) समाधान सुनिल घेवंदे वय 27 वर्षे रा. पळसखेड चक्का,



(3) विजय शेषराव देवकर वय 24 वर्षे रा. नेहरुनगर, मोताळा, (



4)सचिन काळूसे रा. जगदरी ता. सिंदखेड राजा जि. बुलढाणा यांना ताब्यात घेवून विचारपूस केली असता, नमुद आरोपी यांनी (

1) पो.स्टे. मेहकर गुरनं. 276/2022 कलम 392 भादंवि

(2) पो.स्टे. साखरखेर्डा गुरनं. 247/2023
कलम 461,380,379 भादंवि (

3) पो.स्टे. किनगांव राजा गुरनं. 186/2023 कलम 379 भादंवि (

4) पो.स्टे. सिंदखेड राजा गुरनं. 210/2023 कलम 379 भादंवि.

, (5) पो.स्टे. सिंदखेड राजा गुरनं. 152/2023 कलम 379 भादंवि . ( 6 )पो.स्टे. देऊळगांव राजा गुरनं. 355/2023 कलम 379 भादंवि (7) पो.स्टे. अंढेरा गुरनं. 251/2023 कलम 379 भादंवि
अशा एकूण 07 गुन्ह्याची कबुली दिली. नमुद आरोपी यांचे कडून गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेल्या होंडा शाईन कंपनीच्या 05 मोटार सायकली, हिरो सीडी डिलक्स-01, स्प्लेंडर कंपनीची 01 तर पॅशन कंपनीची 01 अशा एकूण 08 मोटार सायकली किं. अं. 4,80,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदर कारवाईमध्ये पकडण्यात आलेले आरोपी

(1) अरुण रघुनाथ शिंदे वय 25 वर्षे रा. पळसखेड चक्का ता. सिंदखेड राजा, (

2) समाधान सुनिल घेवंदे
वय 27 वर्षे रा. पळसखेड चक्का, (

3) विजय शेषराव देवकर वय 24 वर्षे रा. नेहरुनगर, मोताळा, यांना पो.स्टे.
साखरखेर्डा यांच्या ताब्यात तर आरोपी

(4) सचिन काळूसे रा. जगदरी ता. सिंदखेड राजा जि. बुलढाणा यास
पो.स्टे. मेहकर यांच्या ताब्यात पुढील कारवाईकामी ताब्यात देण्यात आले. नमुद गुन्ह्यातील ईतर आरोपीचा शोध घेणे कामी स्था.गु.शा. विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्याव्दारे फरारी आरोपीचा शोध सुरु आहे.
सदरची कारवाई . सुनिल कडासने पोलिस अधीक्षक बुलडाणा यांचे आदेशान्वये तर  अशोक थोरात- अपर पोलिस अधीक्षक खामगांव,  बी. बी महामुनी, अपर पोलिस अधीक्षक- बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. अशोक लांडे प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांचे नेतृत्वात, पोउपनि. श्रीकांत जिंदमवार,
सचिन कानडे, पोहेकॉ. दिपक लेकुरवाळे, पोना. पुरुषोत्तम आघाव, मपोना. वनिता शिंगणे, पोकॉ. गणेश शेळके, अमोल शेजोळ, मनोज खरडे, गजानन गोरले, चापोना. सुरेश भिसे, राहूल बोर्डे स्थागुशा बुलढाणा तसेच पोना. राजू आडवे तांत्रिक विष्लेषन विभाग, बुलढाणा यांच्या पथकांनी पार पाडली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!