
सायबर फ्रॅाड करणाऱ्या आंतरराष्ट्रीय नायजेरीयन टोळीस बुलढाणा पोलिसांनी दिल्ली येथुन केली अटक…
बुलढाणा – सवीस्तर व्रुत्त असे की 15 ऑगस्ट 2023 रोजी तक्रारदार दिपक शिवराम जेताळकर, मेहकर यांनी तक्रार दिली की, दिनांक 23 जून 2023 रोजी फिर्यादी हे फेसबुक अकाउंट चेक करीत असता त्यांना अनोळखी विदेशी महिलेची फ्रेंड रिकेस्ट आली व त्यांनी ती स्वीकारली असता अनोळखी महिलेने लंडन येथील असून भारत देशाविषयी प्रेम व्यक्त करून ओळख निर्माण केली व तक्रारदार यांचेशी मैत्री झाली असल्याने ती खुप खुश झाल्याने त्यांना 65000 ग्रेट ब्रिटिश पाउंड चे गिफ्ट पार्सल पाठवीत असल्याचे सांगितले व ते पार्सल दिल्ली एअरपोर्ट इथून सोडून घेण्यासाठी दिनांक 13 जुलै 2023 रोजी ते 9 ऑगस्ट 2023 या कालावधीत कस्टम क्लिअरन्स चार्जेस, पाठवलेली रक्कम भारतीय चलनात रूपांतर करण्यासाठी कन्वर्जन फी मास्टर कार्ड पाठवण्यासाठी, ज्युडीशीअल कोन्सिल कडून मंजुरी
मिळविण्यासाठी, तसेच मास्टर कार्ड अपडेट करण्यासाठी व इतर विविध प्रोसेसिंग फी भरण्याच्या नावाखाली वेगवेगळ्या मोबाईल क्रमांक वरून व व्हाट्सअप तसेच ई-मेल द्वारे रक्कम पाठविण्यास सांगितल्याने तक्रारदार दिपक जैताळकर यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांची वेगवेगळ्या बँकांचे खात्यामधून आरटीजीएस चेक व फोन पे द्वारे एकूण 62,69,700/- रुपये ऑनलाईन पाठविले. परंतु त्यांना गिफ्ट पार्सल त्यांचे पत्त्यावर मिळाले नसल्याने त्यांना फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने त्यांचे तक्रारीवरुन सायबर पोलीस स्टेशन बुलढाणा येथे अपराध क्रमांक 37/2023 कलम 420, 465, 468, 470, 471 भारतीय दंड संहिता सह कलम 66 क, 66 ड माहिती व तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचे स्वरुप हे क्लिष्ट व तांत्रिक गुंतागुंतीचे असल्याने पोलिस अधिक्षक सुनील कडासने, यांनी सदर
गुन्ह्याचा तपास तात्काळ करण्याकरीता पोलिस निरीक्षक अशोक लांडे स्था. गु.शा व पोलिस निरीक्षक सारंग नवलकार, सायबर पोस्टे
बुलढाणा व तांत्रिक विश्लेषण विभागाचे प्रभारी अधिकारी विलासकुमार सानप सहा. पोलिस निरीक्षक व त्यांचे पथक यांनी सायबर पोलिस स्टेशन सोबत समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशित केले. सायबर पोलिस स्टेशन व तांत्रिक विश्लेषण विभाग बुलढाणा यांनी गुन्ह्याचे तपासाकरीता तक्रारदार यांनी ऑनलाइन पाठविलेल्या रकमेचे विविध बँक अकाउंट, एटीएम फुटेज, फेसबुक अकाऊंट, ओला सर्व्हिस, पेटीएम, फोन पे, गूगल अकाउंट, गुगल पे. इंडीगो एअरलाईन, इंशोरन्स कंपनी फ्लिपकार्ट व इतर ईकॉमर्स वेब साईट्स व सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरील कंपन्यांकडुन गुन्ह्यासंबंधाने वेगवेगळ्या स्वरुपाची माहिती प्राप्त केली व सदर तांत्रिक माहितीचे अत्यंत बारकाईने विश्लेषण करुन आरोपी हे धंतीया, बरेली(उत्तरप्रदेश), बुरारी नगर, संत नगर (दिल्ली), दिमापुर (नागालँड) येथे असल्याचे व ते वापर करीत असलेले सिमकार्ड व मोबाईल नंबर हे वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे असल्याचे तांत्रिक विश्लेषण विभागाने केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे.
1) विलासकुमार सानप, सहायक पोलिस निरीक्षक
(2) पोहेकॉ ज्ञानेश नागरे, सायबर पोस्टे,
3) पोना दिपक जाधव, सायबर पोस्टे,
3) पोलीस अंमलदार गजानन गोरले, स्थागुशा,
4) पोकॉ ऋषीकेश खंडेराव तांत्रिक विश्लेषण विभाग बुलढाणा
तांत्रिक विश्लेषण पथक
1) पोहेकॉ राजु आडवे
(2) पोकॉ कैलास ठोंबरे
3) पोकॉ अमोल तरमळे
अटक आरोपीची नावे
1) निजोस फ्रैंक वय 30 वर्षे, रा. संतनगर बुरारी दिल्ली (मुळ नायजेरीयन)
(2) अलाई विन्संट वय 32 वर्षे रा. संतनगर बुरारी दिल्ली (मुळ नायजेरीयन)
आरोपीची गुन्हा करण्याची पद्धत
1) फेसबुकवर खाते तयार करुन भारतीय पुरुष व महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे
2) फ्रेंड रिकेस्ट स्विकारल्यानंतर संबंधीत व्यक्तीशी भावनिक नाते निर्माण करणे.
3) आरोपी हे इंटरनेटच्या साह्याने व्हर्चुअल नंबर खरेदी करुन विदेशातुन बोलत असल्याचे भासवतात.
4) फेसबुक व व्हाट्सअप द्वारे चॅटिंग करुन प्रेम व्यक्त करून गिफ्ट पाठविण्याचा बहाणा करून फसवणुकीला सुरुवात करतात.
5) वेगवेगळ्या राज्यातील व्यक्तीचे नावे असलेले मोबाईल सिमकार्ड, बैंक खाते मोबाईल हॅन्डसेट जास्तीचे पैसे देवुन खरेदी
करतात.
(6) फिर्यादीला आपण विमानतळावरून कस्टम अधिकारी बोलत असुन आपणास आलेले गिफ्ट दिल्ली एअरपोर्ट वर आले असुन
त्यामध्ये परदेशी चलन असुन ते अवैध मार्गाने आले असल्याने त्याबाबत आपणास कस्टम क्लिअरंस चार्जेस भरावे लागतील नाही
भरल्यास आपणावर कायदेशिर कारवाई करण्यात येईल अशी भिती दाखवितात व फसवणुक करतात.
जप्त मुद्देमाल खालीलप्रमाणे
अॅपल लॅपटॉप- 02, राऊटर 03, आयफोन मोबाईल 03 व इतर मोबाईल 12, ATM 15, बँक पासबुक 03, असा एकुण 04
लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त तसेच बँकेत फ्रिज केलेली अमाऊंट एकुण 04,50,000/- रुपये
पोलिस अधिक्षक सुनिल कडासने, अपर पोलिस अधिक्षक बुलढाणा बी.बी. महामुनी, अपर पोलिस अधिक्षक खामगाव
अशोक थोरात यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक लांडे, स्थागुशा, पोलिस निरीक्षक सारंग नवलकार, सायबर पोस्टे बुलढाणा यांचे नेतृत्वात विलासकुमार सानप, सहायक पोलीस निरीक्षक, पोहेकॉ ज्ञानेश नागरे, पोना दिपक जाधव, पोकॉ गजानन गोरले, स्थागुशा,पोकॉ ऋषीकेश खंडेराव यांनी आरोपी शोध कामी धंतीया, बरेली, संत नगर, बुराडी (दिल्ली) येथे संशयीत आरोपींचा त्यांचे परिसरात जावुन तांत्रिक बाबींचा मागोवा घेतला व 02 नायजेरीयन आरोपींना त्यांचे रहिवासी ठिकाणावरुन शिताफीने अटक करुन बुलढाणा येथे पुढील तपासकामी हजर केले आहे.
नागरीकांना आवाहन मोबाईलची टेक्नॉलॉजी ज्या गतीने अपडेट होत आहे त्या गतीने मोबाईल वापरकर्त्यांनी टेक्नॉलॉजीच्या वापराबाबत अपडेट होणे गरजेचे आहे. अन्यथा तुमचे अज्ञान तुमच्या सोबत होणाऱ्या सायबर गुन्ह्यास कारणीभुत ठरु शकते यासाठी पोलिस अधिक्षक बुलढाणा यांनी गुगल सर्चवर दिसणाऱ्या सर्वच गोष्टी खऱ्या असतील हा भ्रम सर्वप्रथम डोक्यातुन काढुन टाकावा ऑनलाईन शॉपींग साईटवर करण्यात येणाऱ्या ऑर्डरचे पेमेंट हे कॅश ऑन डिलीव्हरी असणे अपेक्षीत आहे, अज्ञात इसमाचा व्हाट्सअप व्हिडीओ कॉल उचलु नये किंवा स्क्रिन शेअरींग करु नये किंवा कुठल्याही व्यक्तीच्या सांगण्यावरुन पैसे पाठविण्याचे व्यवहार करु नये याबाबत सोशल मिडीयावर काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.



