हरविलेले मोबाईल हस्तगत करुन मुळ मालकांना केले परत,चिखली पोलिसांची कामगिरी….
चिखली पोलिसांनी हरवलेले मोबाईल मूळ मालकांना दिले परत…
बुलडाणा (प्रतिनिधी) – हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत केल्याची कामगिरी चिखली पोलीस स्टेशनच्या डी.बि. पथकाने केली आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये काही नागरिकांचे मोबाईल हरवले होते. त्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला, तपासाअंती हरवलेले मोबाईल पोलिसांना सापडले. ते मूळ मालकाला परत देण्यात आले.
अदखलपात्र. व गहाळ अर्ज प्राप्त झाले वरुन पोलिस स्टेशन सायबर बुलडाणा यांच्याशी वेळोवेळी संपर्क करून संबंधित गहाळ मोबाईलचे आयएमईआय नंबर वरुन त्यांचा शोध घेऊन ते हस्तगत करण्यात आले असुन ते खालीलप्रमाणे आहेत.
1) Oppo A16 (किं. 10000/- रुपये)
2) Redmi K20 (किं.18000/-रुपये)
3) Redmi Note 9 (किं.12000/-रुपये)
4) Redmi Note 9 ए स्पोर्ट (किं.10000/-रुपये)
5) Samsung F 41 (किं.14000/-रुपये)
6) Oppo A18(किं.10000/-रुपये)
7) Oppo AS5 (किं.10000/-रुपये)
8) Redmi 9 (किं.9000/-रुपये)
9) Oppo A 78 (किं.12000/-रुपये)
10) Oppo A 53 (किं.12,000/-रुपये)
11) Oppo A 38 (किं.10000/-रुपये)
12) Vivo T 144 (किं.14000/-रुपये)
13) Realme C33 (किं.9000/-रुपये)
14) Oppo AS74 (किं.12000/-रुपये)
15) Narzo (किं.10000/-रुपये)
16) Oppo A17K (किं.8000/-रुपये)
17) Mi AR (किं.6000/-रुपये)
18) Redmi 10 Power (किं.10000/-रुपये)
19) Vivo (किं.20000/-रुपये)
अशा प्रकारे पोलिसांनी एकूण 2 लाख 16 हजार रु. किमतीचे 19 मोबाईल मूळ मालकांना परत दिले आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक बुलडाणा, अपर पोलीस अधिक्षक बुलडाणा, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बुलडाणा यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक .संग्राम पाटील, डि.बी. पथकाचे पोउपनि नितिनसिंह चौहाण, मपोशि रुपाली उगले, पंढरीनाथ मिसाळ यांनी मोबाईलचा शोध घेतला. तसेच मपोहवा माया सोनुने, नापोशि अमोल गवई, पोशि. राजेश मापारी, रोहीदास पंढरे, प्रशांत धंदर, निलेश सावळे, सागर कोल्हे, राहुल पायघन पोलिस स्टेशन चिखली तसेच तांत्रीक विश्लेषण विभाग सपोनि. विलासकुमार सानप बुलडाणा यांनी मिळून केली आहे.