डिझेल चोरट्यांची टोळी बिबी पोलिसांनी केली जेरबंद…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

सम्रुध्दी महामार्गावर उभ्या ट्रकमधुन डिझेलची चोरी करणारी टोळी बिबी पोलिसांनी केली जेरबंद….

बिबी(बुलढाणा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 13/09/2024 रोजी 04/30 वा चे सुमारास स्व. बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग नागपुर मुंबई लेनवर चेनेज क्रमांक 310 मांडवा शिवारामध्ये इंडीयन ऑईल पेट्रोल पंपा जवळ ट्रक क्रमांक एम एच 15 इ जी 9513 वाहनाचा चालक प्रदिपसिंग जसवंतसिंग मान वय 35 वर्ष व्यवसाय ट्रक चालक रा. लासलगाव ता निफाड जि नाशिक हा ट्रक सर्व्हिस रोडवर लावुन आराम करीत असतांना चालक प्रदिपसिंग यास डिझेल टाकीचे झाकण उघडल्याचा आवाज आला म्हणुन त्याने खाली उतरुन पाहीले असता दोन इसम ट्रकचे डिझेल टाकोतील डिझेल चोरी करीत असतांना दिसुन आले म्हणुन चालक प्रदिपसिंग याने त्यांना हटकताच ते त्यांचे इर्टिगा गाडीत बसुन भरधाव वेगाने पळुन जात असतांना त्यांची गाडी रोडचे बॅरीअरला धडकुन अपघात झाला





त्याच दरम्यान पोलिस स्टेशन बिबी चे पेट्रोलींग वाहन चेकिंग अधिकारी नापोशि नितीन मापारी, चापोहवा अशोक अंभोरे  हे सदर ठिकाणावरुन पेट्रोलौंग करीत असतांना त्यांना सदर अपघात दिसल्याने ते अपघात ग्रस्त वाहन ईटींगा क्रमांक एम एच 28 व्हि 9310 जवळ जावुन वाहनात असलेला चालक यास वाहनाचे बाहेर काढले त्याच दरम्याण त्यांना सदर वाहनामध्ये प्लॉस्टीक कॅन ठेवलेल्या दिसुन आल्याने त्यांना संशय आल्याने त्यांनी जखमी चालक यास विचारपुस केली असता त्याने सांगीतले की मी व माझे सोबत इतर तिन इसम समृध्दी महामार्गावर डिझेल चोरी करण्यासाठी आलो होतो. आम्ही इंडीयन ऑईल पेट्रोल पंपा जवळ सर्व्हिस रोडवर उभा असलेल्या एका ट्रक चे डिझेल चोरी करीत असतानां ट्रक चालक याने हटकल्याने आम्ही पळून जात असतांना आमचा अपघात झाला व माझे साथीदार पळुन गेले



सदर बाबत नापोशि  यांनी ठाणेदार सपोनि संदिप पाटील यांना माहीती दिल्याने ठाणेदार संदिप पाटील सोबत नापोशि  अरुण सानप यांनी समृध्दी महामार्गावर जावुन जखमी चालक ज्ञानेश्वर फकिरवा सोसरे यास विचारपुस करुन त्याचे कडुन त्याचे साथीदारांबाबत माहीती घेवुन त्यास मार लागलेला असल्याने उपचार कामी ग्रामिण रुग्नालय बिबी येथे भरती केले तसेच फरार आरोपींचा शोध घेत असतांना शुभम दिपक उबरहंडे वय 25 वर्ष रा चिखली हा मलकापुर पांग्रा येथे पळून जाण्याच्या बेतात असतांना मिळुन आला



त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे साथीदारांबाबत विचारपुस केली असता त्याने सांगीतले की मी भैय्या नावाचे इसमासोबत आलो होतो. त्यानेच आम्हाला सर्व साहोत्य व चोरी करण्यासाठी गाडी पाहीली होती. शुभम उबरहंडे याचे कडुन भैय्या चा मोबाईल नंबर घेवुन त्याची तांत्रीक माहीती घेवुन शोध घेतला असता तो भिमराव दगडु इंगळे रा मांडवा यांचे कपाशीचे शेतात तुरीच्या पाटयामध्ये लपलेला मिळून आल्याने त्याला विजय सुदाम साळवे यांचे समक्ष ताब्यात घेतले असता त्याला भुवईला व कपाळाला अपघातामध्ये मार लागुन रक्त निघत होतो. त्यास नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव हर्षद ऊर्फ भैय्या पांडुरंग साबळे वय 23 वर्ष रा डौलखेड ता जाफ्राबाद जि जालना वरुन त्यास ग्रामिण रुग्नालय बिबी येथे आणुन त्याचेवर औषधउपचार करुन पो स्टे ला हजर केले. त्यानंतर त्याच्या ईतर साथीदारांच्या वर्णनावरुन पोलिस पथकाने शोध घेतला असता आरोपी संकेत सुनिल बोर्ड रा शेळगाव आटोळ हा मिळून आला त्यास मलकापुर पांग्रा येथुन ताब्यात घेवुन पो स्टे ला . पो स्टे ला आणलेल्या आरोपींना गुन्हयाबाबात विचारपुस केली असता त्यांनी ईतर पोलिस स्टेशन दाखल 1) अपनं 158/2024 कलम 303 (2) बि.एन.एस. तसेच 2) अपनं 146/2024 कलम 303 (2) बि.एन.एस. केल्याची कबुली दिली

तसेच आज रोजी फिर्यादी प्रदिपसिंग जसवंत सिंग मान वय 35 वर्ष यांचे फिर्याद वरुन अपनं 176/2024 कलम 281, 125 (a), 324 (4), 303 (2), 62 वि एन एस प्रमाणे गुन्हा दाखल गुन्हयाची कबुली देवुन व गुन्हयात आरोपींनी चोरी करण्याचा प्रयत्न केलेले दोन कॅन मध्ये असलेले 50 लिटर डिझेल किंमती 4800/ रुचे तसेच एक इंर्टिगा वाहन क्रमांक एम एच 28 व्हि 9310 किंमती 7 लाख रुपये तसेच दोन प्लॉस्टीक नळया किंमती 100 रुपये 6 रिकाम्या प्लास्टिक कॅन किंमती 600 रुपये असा एकूण 705500/रुपये किमती चा मुददेमाल जप्त करण्यात आला.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक विश्व पानसरे, अपर पोलिस अधिक्षक बुलढाणा बि.बि. महामुणी, अपर पोलिस अधिक्षक खामगाव अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी मेहकर  प्रदिप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन बिबी चे ठाणेदार सपोनि संदिप पाटील, सफौ परमेश्वर शिंदे , चापोहवा अशोक अंभोरे,नापोशि नितीन मापारी अरुण सानप, पोशि यशवंत जैवळ, रविंद्र बोरे, भारत ढाकणे यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!