खुनी हल्ला करुन पसार झालेल्या आरोपींना ५ तासात चिखली पोलिसांनी केले गजाआड….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

जिवे मारण्याच्या उद्देशाने जखमी करुन फरार झालेल्या  दोन आरोपींना ५ तासाचे आत चिखली पोलिसांनी लोणार येथून  केले जेरबंद…

चिखली(बुलढाणा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. (9) रोजी १०.00 वा. दरम्यान पोलिसांना माहीती मिळाली की, गजानन टी सेंटर समोर आठवडी बाजारात एक इसम रक्ताचे थारोळ्यात पडलेला आहे, यावरून पोलिस निरीक्षक संग्राम पाटील यांनी तात्काळ आपल्या सहकाऱ्यासह आठवडी बाजारात धाव घेऊन नमूद रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमीस ग्रामीण रुग्णालय चिखली येथे नेऊन उपचारासाठी भरती केले. त्यानंतर सदर इसमाचे नाव निष्पन्न केले असता तो चिखली शहरातील राजू नंदू डोळफोडे वय 40 वर्ष रा. इंदिरा नगर चिखली असे असल्याचे समजले. पोलिसांनी तात्काळ त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना  सदर घटनेची माहिती देऊन फिर्यादीचे पत्नीस नामे लक्ष्मी राजू वाघ रा. इंदिरा नगर चिखली यांना विचारपूस करून तक्रार नोंदवली असता त्यांनी सांगितले की राजू नंदू डोळफोडे याचे बहीनीचे नवऱ्याने त्यास आठवडी बाजार गजानन टी सेंटर समोर कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात फरशी मारून गंभीर जखमी केले. अशा फिर्यादीच्या रिपोर्ट वरुन गु. र. नं. 279/2024 कलम 307 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला
सदर गुन्ह्यातील जखमी हा बेशुद्ध असल्याने व त्यास पुढील उपचाराकरीता बुलढाणा व तेथून अकोला, नागपूर असे रेफर केल्याने नमूद घटना कोणी व कोणत्या कारणासाठी केली याचा तपास करणे पोलिसांसमोर आव्हान होते. ठाणेदार संग्राम पाटील यांनी सदर गुन्ह्याच्या तपासकामी व आरोपी शोधकामी सपोनि संजय मातोंडकर,पोउपनि शरद भागवतकर, नितीनसिंह चव्हाण, पोलिस शिपाई विजय किटे, अमोल गवई, चंद्रशेखर मुरडकर, राहुल पायघन, निलेश सावळे, प्रशांत धंदर, सागर कोल्हे, पंढरी मिसाळ, राजेश मापारी, सुनील राजपूत यांचे वेगवेगळे पथके तयार करून त्यांना सदर गुन्हा उघड करण्याच्या अनुषंगाने सूचना देऊन रवाना केले. सदर पथकाने गोपनीय माहिती तसेच इतर तांत्रिक माहितीच्या आधारे जखमी राजू डोळफोडे यास आरोपी नामे विनोद रामचंद्र लाखाडे व सचिन आत्माराम राठोड दोन्ही रा. लोणार यांनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केल्याचे निष्पन्न केले व तात्काळ लोणार येथे रवाना होऊन नमूद आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना लोणार येथून मोठ्या शीताफिने ताब्यात घेऊन सखोल व बारकाईने विचारपूस केली असता जखमीस जीवे मारण्याच्या दृष्टीने डोक्यात फरशी मारून जखमी केल्याबाबत कबुली दिली असून नमूद आरोपींना अटक करण्याची कार्यवाही सुरु आहे.
सदरची कामगिरी ही पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात संग्राम पाटील यांच्या नेतृत्वात सपोनि संजय मातोंडकर,पोउपनि शरद भागवतकर, नितीनसिंह चव्हाण, पोलीस अंमलदार विजय किटे, अमोल गवई, चंद्रशेखर मुरडकर, राहुल पायघन, निलेश सावळे, प्रशांत धंदर, सागर कोल्हे, पंढरी मिसाळ, राजेश मापारी, सुनील राजपूत यांनी केली आहे.





सदर गुन्हा उघड करण्यासाठी चिखली शहरात लावण्यात आलेल्या Cctv कॅमेऱ्यांची मोठी मदत झाली असून शहरातील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी आपल्या प्रतिष्ठान व घरी कॅमेरे लावण्याचे आवाहन ठाणेदार संग्राम पाटील यांनी केले आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!