धाराशिव मधील वाहन चालकाला समृद्धी महामार्गावर लुटणारे चोरटे बुलढाणा गुन्हे शाखेने केले गजाआड….
धाराशिव मधील वाहन चालकाला समृद्धी महामार्गावर लुटणारे चोरटे गजाआड….
बुलढाणा (प्रतिनिधी) – आराम करण्यासाठी बाजूला वाहन लावून थांबलेल्या एका वाहन चालकाला समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून धमकावून जबरीने नगदी रोख, सोने-चांदी, लॅपटॉप असा जवळपास १ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल घेऊन लंपास होणाऱ्या जबरी चोरीच्या गुन्ह्यांतील अट्टल चोरट्यांना बुलढाणा पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या प्रकरणी फिर्यादी रुषीकेश शिवाजी जगदाळे (वय 28 वर्षे) रा.तेरखेडा ता.वाशि,जि.धाराशिव यांनी पो.स्टे. डोणगांव येथे दिलेल्या फिर्यादीवरून अप.क्र 114/2024 कलम 392, 34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये समृध्दी महामार्ग तसेच इतर ठिकाणी घडलेल्या जबरी चोरी तसेच घरफोडीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेवून, पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, बी.बी. महामुनी यांनी नमुद गुन्ह्याची लवकरात लवकर उकल करुन, गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन, गुन्ह्यामध्ये चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करणेबाबत अशोक लांडे, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा यांना आदेशीत केले होते. सदर अनुशंगाने पोनि. अशोक लांडे स्था.गु.शा. बुलढाणा यांनी अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी स्वतंत्र समांतर तपास पथके तयार करुन, नमुद गुन्ह्याची यशस्वी उकल, गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध आणि गेलेला मुद्देमाल हस्तगत करणेबाबत सुचना केल्या. तेव्हा सदर अनुशंगाने, पो.स्टे. डोणगांव अप.क्र 114/2024 कलम 392,34 भादंवि गुन्ह्यामध्ये गोपनीय बातमीदाराने खात्रीलायक बातमी माहिती दिली त्या नुसार पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर कारवाई केली.
या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रुषीकेश शिवाजी जगदाळे (वय 28 वर्षे) रा.तेरखेडा ता. वाशि,जि.धाराशिव यांनी पो.स्टे. डोणगांव येथे रिपोर्ट दिला की, (दि.10मे) रोजी फिर्यादी त्याचे वाहनासह समृध्दी महामार्गावरील रोडवर आराम करण्यासाठी उभे असतांना, तीन अनोळखी ईसमांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून, फिर्यादी व साक्षीदार यांचे जवळील नगदी रोख व ईतर सोने चांदी व लॅपटॉप साहित्य असा एकूण 1,65,000/-रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला. सदर प्रकरणी पो.स्टे. डोणगांव येथे अप.क्र 114/2024 कलम 392, 34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार, सदर गुन्ह्यात जालना जिल्हा व मध्यप्रदेश राज्यातून आरोपी – 1) समीर नूर मोहम्मद मेव (वय 25 वर्षे) रा.दुपाडा, ता.जि.शहाजापूर, मध्य प्रदेश राज्य, 2) राकेश गुजल चंदेल (वय 21 वर्षे) रा. दुपाडा, ता.जि.शहाजापूर, मध्य प्रदेश राज्य, 3) धरमराज विक्रम हरीजन (वय 19 वर्षे) रा. दुपाडा, ता.जि.शहाजापूर, मध्य प्रदेश राज्य, 4) रावण ऊर्फ अभिषेक प्रताप गवारे (वय 21 वर्षे) रा.साडे सावंगी, ता. अंबड जि.जालना, 5) रंगनाथ बाजीराव डनडे (वय25 वर्षे) रा.जालना, 6) विक्रम गोपाल राजपूत (वय 31 वर्षे) रा.जालना, 7) संतोष अंबादास वाघमारे (वय 24 वर्षे) रा.गारखेडा ता.जाफ्राबाद, जि.जालना, 8) राहूल राधाकिसन कोकाटे (वय 21 वर्षे), रा.गारखेडा ता.जाफ्राबाद, जि.जालना, 9) जावेद हबीब मुल्लानी (वय 29 वर्षे) रा.घरखेडा ता.जाफ्राबाद, जि.जालना आदींवर कारवाई करून गुन्ह्यातील गेलेला जप्त मुद्देमालाचात शोध घेण्यात येत आहे.
गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षक बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. अशोक एन.लांडे प्रभारी अधिकारी स्थागुशा. यांच्या नेतृत्वात स्थनिक गुन्हे शाखेचे विशेष पथके तयार करण्यात आले असून, सदर पथकाकडून गुन्ह्यामध्ये फरार आरोपीतांचा कसोशीने शोध घेण्यात येत आहे. अशी माहिती वरिष्ठांनी दिली आहे.
पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, बीबी. महामुनी यांनी जिल्ह्यात होत असलेल्या जबरी चोरी आणि चोरीच्या घटनांना अत्यंत गांभीर्याने घेऊन, सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध तसेच अशा गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. सदर अनुषंगाने, पोनि.अशोक एन. लांडे, स्थानिक गुन्हे शाखा- बुलढाणा यांनी अधिनस्त पोलीस स्टाफ यांची वेगवेगळी पथके त्यार करुन, त्यांना गुन्हे संबंधाने गोपनीय माहिती संकलीत करणे, अशा गुन्हेगारांची माहिती काढून त्यांचे हालचालीवर लक्ष ठेवणे तसेच तांत्रीक स्वरुपामध्ये तपास करणे, जिल्हा व जिल्हया बाहेरील गुन्हेगारांचा अभिलेख पडताळणे बाबत सुचनात्मक मार्गदर्शन केले. सदर प्रकरणी एकंदर केलेल्या तपासामध्ये गुन्ह्यामध्ये बाहेरील जिल्ह्यातील आरोपीतांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्या प्रमाणे गोपनीय खबर आणि तांत्रीक माहितीच्या आधारे वरीलप्रमाणे गुन्हांची उकल करुन, आरोपीतांना बाहेरील जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. सदर कारणाने जिल्ह्यामध्ये घडलेल्या गुन्ह्यांची यशस्वी उकल होऊन, जिल्ह्यातील मालमत्ता संबंधीत गुन्ह्यांना प्रतिबंध झालेला आहे.
अशा प्रकारे सदरची कामगिरी सुनिल कडासने पोलीस अधोक्षक बुलडाणा, अशोक थोरात अपर पोलीस अधीक्षक खामगांव, बी.बी महामुनी अपर पोलीस अधीक्षक-बुलढाणा, यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली, पोनि.अशोक एन.लांडे प्रभारी अधिकारी स्था.गु.शा. बुलढाणा, सपोनि. विलासकुमार सानप, आशिष चेचरे, पोउपनि, श्रीकांत जिंदमवार, सचिन कानडे, रवि मोरे, पोलीस अंमलदार, रामविजयसिंग राजपूत, पंकज मेहेर, शरद गिरी, दिपक लेकुरवाळे, दिपक वायाळ. जगदेव टेकाळे. गजान्न गोरले, पुरुषोत्तम आघाव, गणेश पाटील, वैभव मगर, विक्रांत इंगळे, सुनिल मिसाळ, अमोल शेजोळ, विजय सेनोने, अनंता फरताळे, राजेंद्र अंभोरे, गजानन माळी, दिगंबर कपाटे, मनोज खरडे, चालक पो.अं. सुरेश भिसे, समाधान टेकाळे, विलास भोसले व ईतर पोलीस अंमलदार स्थागुशा बुलढाणा, पोहेकॉ. रजू आडवे, ऋषी खंडेराव, तांत्रीक विष्लेषण विभाग, सायबर पो.स्टे., बुलढाणा यांचे पथकाने पार पाडली आहे.