
मेहकर हद्दीतील व्यवसाईक प्रतिष्ठाने फोडणारा अट्टल चोरटा गुन्हे शाखेच्या ताब्यात…
पानटपरी, मेडीकल फोडणाऱ्या चोरट्यास गुन्हे शाखेने केली अटक…
बुलढाणा (प्रतिनिधी) – जिल्ह्यामध्ये किराणा दुकाने, घरफोडी, पानटप-या व इतर ठिकाणी होणाऱ्या चोरीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेवून, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, वी.वी. महामुनी यांनी अशा गुन्ह्याची उकल करुन, आरोपीतांचा शोध घेवून, मुद्देमाल हस्तगत करणेबाबत अशोक लांडे, स्था.गु.शा. बुलढाणा यांना आदेशीत केले होते. सदर अनुषंगाने पोनि.अशोक लांडे यांनी अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांची स्वतंत्र पथके तयार करुन, चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करुन, गुन्ह्याची उकल, आरोपींचा शोध आणि गेलेला मुद्देमाल हस्तगत करणेबाबत सुचना केल्या.


या बाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी परमेश्वर अश्रुबा नवले रा.सुकळी ता.मेहकर यांनी (दि.03सप्टेंबर) रोजी पो.स्टे. मेहकर येथे तक्रार दिली की, (दि.01 सप्टेंबर) रोजी रात्री दरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपी याने फिर्यादीचे मेहकर शहरातील माया पान सेंटर नामक दुकानाचे शटर तोडून, पानटपरीत ठेवलेले 10,000/-रुपये चोरुन नेले सदर प्रकरणी पो.स्टे. मेहकर येथे अप.क्र 527/2024 कलम 334(1), 305 भा.न्या.सं. प्रमाणे दाखल होता. सदर गुन्ह्याचा तपास करुन, मिळालेली गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर गुन्ह्यातील एका आरोपीला 5 सप्टेंबर रोजी जालना जिल्ह्यातून अटक करण्यात आली ज्याचे नाव दगडुबा मुकुंदा बोर्डे (वय 35 वर्षे) रा.पेरजापूर ता.भोकरदन, जि.जालना असे आहे. आरोपीने बुलढाणा, वर्धा, नांदेड, हिंगोली जिल्हयात केलेल्या, 06 चोऱ्यांची कबुली दिली आहे. ज्या मध्ये आरोपीने बुलढाणा जिल्ह्यासह ईतर जिल्ह्यामध्ये मेडीकल स्टोअर्स, डेंटल क्लिनीक, पान टपरी अशा ठिकाणी चोरी केल्याचे कबुल केले. त्याने ईतर ठिकाणी सुध्दा अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची शक्यता असल्याने, पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. अशोक एन. लांडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तपास करीत आहे. नमुद आरोपी यास पो.स्टे. मेहकर यांच्या ताब्यात देण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास पो.स्टे. मेहकर करीत आहेत.

पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बी.बी. महामुनी यांनी गुन्ह्याची उकल, आरोपी शोध, गुन्ह्यांना प्रतिबंध बाबत सुचना दिल्या होत्या. सदर अनुषंगाने पोनि.अशोक एन. लांडे, स्थानिक गुन्हे शाखा- बुलढाणा यांनी अधिनस्त पोलीस स्टाफची पथके तयार करुन, त्यांना गोपनीय माहिती संकलीत करणे, गुन्हेगारांची माहिती काढून त्यांचे हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे, तांत्रीक स्वरुपातील बाबी पडताळणे, जिल्हा व जिल्हया बाहेरील गुन्हेगारांचा अभिलेख पडताळणे बाबत सुचनात्मक मार्गदर्शन केले. एकंदर समांतर तपासामध्ये गुन्ह्यामध्ये बाहेरील जिल्ह्याच्या आरोपी याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्या प्रमाणे गोपनीय माहिती व तांत्रीक माहितीच्या आधारे सदर गुन्ह्यांची उकल करुन, आरोपी यास जालना जिल्ह्यातून अटक करण्यात आली. सदर कारणाने जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यांची यशस्वी उकल होवून, अशा गुन्ह्यांना प्रतिबंध झालेला आहे.

सदरची कामगिरी विश्व पानसरे पोलीस अधीक्षक बुलढाणा, अशोक थोरात अपोअ. खामगांव, बी.वी महामुनी-अपोअ. बुलढाणा यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली, पोनि.अशोक एन. लांडे स्था.गु.शा. बुलढाणा,प्रताप बाजड, पोहेकॉ. शरद गिरी, दिनेश बकाले, पुरुषोत्तम आघाव, पोकों, गजानन गोरले सर्व नेमणूक स्थागुशा. बुलढाणा यांनी केली आहे.


