
जळंब येथील घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने केला उघड..
घरफोडी करणारे अट्टल घरफोडे बुलढाणा गुन्हे शाखेच्या ताब्यात…
बुलढाणा (प्रतिनिधी) – जलंब येथील घरफोडी करणाऱ्या घरफोड्यांची मिळालेली गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर घरफोडीच्या गुन्ह्यांची यशस्वी उकल करून स्थानिक गुन्हे शाखेने 6 मोबाईल, नगदी रकमेसह 1 लाख रु.चा मुद्देमाल जप्त करून 02 आरोपी व 03 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेऊन गुन्ह्यातील ईतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षक बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पोलिस निरीक्षक प्रभारी अधिकारी स्थागुशा, यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथके तयार करण्यात आले असून, सदर पथक यांच्या कडून गुन्ह्यामध्ये ईतर आरोपी निष्पन्न करुन, त्यांचा शोध घेण्यात येत आहे.


बुलढाणा जिल्ह्यातील वाढत्या घरफोडी, चोरी, अवैध धंदे, या गुन्ह्यांची गंभीर दखल घेवून, पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, बी.बी. महामुनी यांनी नमुद गुन्ह्याची उकल करुन, आरोपींचा शोध घेवून, चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा यांना आदेशीत केले होते. सदर अनुषंगाने पोनि.अशोक लांडे स्था.गु.शा. बुलढाणा यांनी अधिनस्त पोलिस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी स्वतंत्र पथके तयार करुन, त्यांना घरफोडीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करुन, गुन्ह्याची उकल करुन, आरोपीतांचा शोध आणि गेलेला मुद्देमाल हस्तगत करणेबाबत सुचना केल्या होत्या.

या प्रकरणी फिर्यादी राजेश सत्यनारायण भुतडा (वय 53 वर्षे) रा.माटरगांव ता.शेगांव यांनी (दि.22मार्च) रोजी पो.स्टे. जलंब येथे रिपोर्ट दिला की, 21मार्च चे रात्री दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांचे श्री हार्डवेअर, माटरगांव या दुकानाचे पाठीमागील शटर वाकवून, दुकानात विक्रीसाठी ठेवलेले 05 नग मोबाईल तसेच नगदी रोख 25,000/-रुपये अशी एकूण 68,000/-रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. फिर्यादी यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे. जलंब येथे गुरनं. 79/2024 कलम 457, 380 भादंवि प्रमाणे नोंद होता.

पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, बी.बी. महामुनी यांनी गुन्ह्यातील आरोपींचा शोध तसेच गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. सदर अनुषंगाने, पोनि. अशोक एन.लांडे, स्थानिक गुन्हे शाखा- बुलढाणा यांनी अधिनस्त पोलीस स्टाफ यांची पथके तयार करुन, त्यांना गुन्हे संबंधाने गोपनीय माहिती संकलीत करणे, अशा गुन्हेगारांची माहिती काढून त्यांचे हालचालींवर लक्ष ठेवणे, तांत्रीक स्वरुपामध्ये तपास करणे, जिल्हा व जिल्हया बाहेरील गुन्हेगारांचा अभिलेख पडताळणे बाबत सुचनात्मक मार्गदर्शन केले. सदर प्रकरणी दि.24जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेला समांतर तपास, गोपनीय खबर व तांत्रीक माहितीच्या आधारे वरील प्रमाणे गुन्ह्यांची उकल करुन, 02-आरोपींना अटक केली, तर विधी संघर्षीत 03 बालकांना ताब्यात घेऊन पो.स्टे. जलंब यांच्या ताब्यात देण्यात आले.
या कारवाईत आरोपी (१) सुपडा सुधाकर खंडारे वय १९ वर्षे रा. माटरगाव ता.शेगाव, जि.बुलढाणा, (२) दिपक महादेव श्रीरथ वय १९ वर्षे, रा. माटरगाव ता. शेगाव जि. बुलढाणा आणि ईतर 03 विधी संघर्षीत बालके, आदींवर कारवाई करून यांच्याकडून एकूण- 06 नग मोबाईल फोन- किं.83,000/-रुपये, (2) नगदी रोख – 25,000/-रुपये एकूण- 1,08,000/-रुपये. गुन्ह्यातील ईतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षक बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. अशोक एन.लांडे प्रभारी अधिकारी स्थागुशा, यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथके तयार करण्यात आले असून, सदर पथक यांचे कडून गुन्ह्यामध्ये ईतर आरोपी निष्पन्न करुन, त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
अशा प्रकारे सदरची कामगिरी ही पोलिस अधिक्षक सुनिल कडासने अपर पोलिस अधीक्षक खामगाव अशोक थोरात अपर पोलिस अधीक्षक बुलढाणा, बी.बी महामुनी आदेशाने व मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक अशोक एन.लांडे, पोउपनि. श्रीकांत जिदमवार, पोहवा, राजेंद्र टेकाळे, नापोशि अनंता फरताळे, चापोहवा समाधान टेकाळे सर्व नेमणूक- स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा यांचे पथकाने पार पाडली आहे.


