अवैध शस्त्रासह एकास जळगाव जामोद येथुन LCB ने घेतले ताब्यात…
जळगांव जामोद येथे देशी पिस्टल व 17 जिवंत काडतूसह एकास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…
बुलढाणा(प्रतिनिधी) –याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 ही भयरहीत आणि खुल्या वातावरणात पार पडाव्यात, या करीता मध्यप्रदेश राज्याचे सीमेलगत पो.स्टे. सोनाळा, तामगांव, जळगांव जामोद हद्दीमध्ये अवैध देशी पिस्टल (अग्नीशस्त्र) च्या विक्रीला प्रतिबंध घालून, अशा ईसमांवर प्रभावि कायदेशीर कारवाई करणे करीता पोलिस अधीक्षक पोलिस अधिक्षक सुनिल कडासने, अपर पोलिस अधीक्षक
अशोक थोरात, बी. बी. महामुनी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते. त्यानुसार पोनि. अशोक एन. लांडे, प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा – बुलढाणा यांनी अधिनस्त पोलिस स्टाफच्या वेगवेगळी पथके तयार करुन, त्यांना सदर परिसरातून गोपनीय माहिती काढून त्याआधारे अवैध देशी पिस्टल (अग्नीशस्त्र) खरेदी-विक्री करणारे ईसमांचा शोध घेवू त्यांचेवर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करणेबाबत सुचित केले होते.
त्याअनुषंगाने दि.08/04/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय खबर मिळाली की, पो.स्टे. जळगांव जामोद
हद्दीतील महाराष्ट्र बँकेजवळ, जळगांव जामोद परिसरात एक इसम देशी बनावटीचे पिस्टल (अग्नीशस्त्र) खरेदी-विक्री करण्याच्या
उद्देशाने त्याचे ताब्यात बाळगून आहे. सदर गोपनीय खबरे वरुन पोलिस पथकाने सदर इसमास पकडून,त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख जमीन शेख चाँद वय 31 वर्षे, रा. टिपू सुलतान चौक, खेड शिवार, जामोद, ता. जळगांव जा., जि. बुलढाणा असे सांगितले वरुन त्याची अंगझडती घेतली असता, त्याचे जवळ 1) देशी बनावटीचे 01 नग अग्नीशस्त्र ( पिस्टल ) किं. 40,000/- रुपये 2) दोन नग स्टील मॅग्झीन किं. 5000/-रुपये, 3) 17 नग जिवंत काडतूस- किं. 17,000/-रुपये, 4) एक मोबाईल फोन क्रि. 15,000/-रुपये, असा एकूण- 77,000/- रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
सदर प्रकरणी पो.स्टे. जळगांव जामोद येथे अग्नीशस्त्र कायद्याचे कलम 3,7/25 आणि महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 123, 135 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदर गुन्ह्यामध्ये पकडण्यात आलेल्या आरोपी व्यतिरीक्त आणखी ईतर कोणी आरोपी आहेत अगर कसे? या बाबत पोलिस तपास सुरु आहे. सदर संबंधाने स्थानिक गुन्हे शाखेतील पथकांकडून तपास करण्यात येवून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन, पुढील कारवाई करण्यात येत आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक सुनिल कडासने,अपर पोलिस अधीक्षक खामगाव अशोक थोरात,अपर पोलिस अधीक्षक बुलढाणा बी.बी महामुनी,उपविभागिय पोलिस अधिकारी,मलकापुर डी. एस. गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. अशोक एन. लांडे प्रभारी अधिकारी स्थागुशा. बुलढाणा, सपोनि. आशिष चेचरे, पोउपनि
श्रीकांत जिंदमवार, पोहवा दिपक लेकुरवाळे, नापोशि गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, युवराज राठोड, पोशि. गजानन गोरले,
मपोशि आशा मोरे सर्व नेमणूक- स्थानिक गुन्हे शाखा – बुलढाणा यांच्या पथकाने केली आहे.