स्थानिक गुन्हे शाखेची अफुची लागवड करणार्यावर सर्वात मोठी कार्यवाही,12 कोटीचे वर मुद्देमाल केला जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अंढेरा शिवारात अवैधरित्या विनापरवाना अंमली पदार्थ अफूची लागवड करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन 1572 किलो 100 ग्रॅम. अफू किं. 12,60,28,000/-रु.चा मुद्देमाल केला जप्त….

बुलढाणा(प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्ह्यातील युवकांमध्ये वाढत असलेली व्यसनाधिनता कमी होऊन, युवापिढी अंमली पदार्थाच्या विळख्यातून बाहेर पडावी व जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी गांजा व ईतर तत्सम अंमली पदार्थाचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक व विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेवून, त्यांचेवर अंमली औषधीद्रव्ये व मनः प्रभावी पदार्थ अधिनियम (N.D.P.S.) कायद्याखाली धडक कारवाई करणेबाबत पोलिस अधिक्षक विश्व पानसरे,अपर पोलिस अधिक्षक अशोक थोरात,  बी. बी. महामुनी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते.





त्या अनुशंगाने पोनि.स्था.गु.शा. अशोक लांडे यांनी त्यांचे अधिनस्त पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करुन, त्यांना अफू, गांजा व इतर तत्सम अंमली पदार्थ बाळगणाऱ्या, तसेच उत्पादन घेणाऱ्या इसमांचा शोध घेवून, त्यांचेवर कायदेशीर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.



यानुसार दि.22 फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, पो.स्टे. अंडेरा हद्दीत संतोष मधूकर सानप रा. अंडेरा हा त्याचे मालकीच्या शेतामध्ये विनापरवाना व अवैधरित्या अफू या अंमली पदार्थाची लागवड व त्याचे संवर्धन करुन, सदर अफू बाळगून आहे. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंढेरा शिवारातील संतोष सानप याचे मालकीच्या शेतामध्ये सापळा रचून अफू संबंधाने कार्यवाही केली. सदर कारवाईमध्य शेतात लागवड केलेली अफू अंमली पदार्थ मिळून आला. 1) अफू अंमली पदार्थ- वजन 1572 किलो 100 ग्रॅम किं. 12,60,28,000/-रुपये,



गुन्ह्यामध्ये आरोपी संतोष मधूकर सानप वय 49 वर्षे, रा. अंढेरा ता. देऊळगांव राजा जि. बुलढाणा याने त्याचे शेताचे मधोमध 16 गुंठे जागेमध्ये अफूची लागवड करुन संवर्धन केले. लागवड केलेल्या अफूची लोकांना जाणीव होऊ नये, म्हणून चारीबाजूंनी मका या पिकाची लागवड केली. तसेच अफूची जागा कोणालाही दिसू नये म्हणून त्यावर ग्रीन नेटने आच्छादन केलेले होते.

सदर गुन्ह्यामध्ये संतोष मधूकर सानप वय 49 वर्षे, रा. अंढेरा ता. देऊळगांव राजा जि. बुलढाणा या आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून,त्याचे विरुध्द पो.स्टे. अंडेरा येथे NDPS अॅक्टचे कलम 8 (क), 18(क) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन गुन्ह्यात इंतर आरोपी निष्पन्न करुन त्यांचा स्थानिक गुन्हे शाखेकडून शोध घेण्यात येत आहे. गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागिय पोलिस अधिकारी देऊळगावराजा मनिषा कदम करीत आहेत

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक विश्व पानसरे,अपर पोलिस अधिक्षक बुलढाणा बी.बी महामुनी,अपर पोलिस अधिक्षक खामगांव अशोक थोरात.उपविभागिय पोलिस अधिकारी देऊळगावराजा मनिषा कदम यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अशोक एन. लांडे यांचे नेतृत्वात, सपोनि. आशिष रोही, रुपेश शक्करगे, पोउपनि, सचिन कानडे, प्रताप बाजड, सफौ, राजकुमार राजपूत, मपोहवा. वनिता शिंगणे, पोहवा. दिनेश बकाले, दिपक लेकुरवाळे, शेख चाँद, गणेश पुरुषोत्तम पाटील, पुरुषोत्तम आघाव, अनुपकुमार मेहेर, राजेंद्र टेकाळे, सतीश हाताळकर, नापोशि, विजय वारुळे, युवराज राठोड, गजानन दराडे, विजय पेटणे, पोशि, मंगेश सनगाळे, दिपक वायाळ, भारत जाधव, चापोहवा, शिवानंद मुंढे, समाधान टेकाळे,चानापोशि सुरेश भिसे, चापोशि विलास भोसले सर्व नेमणूक- स्था.गु.शा. बुलढाणा यांनी केली.

 

 





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!