दारुचे सेवन करुन शुल्लक कारणावरुन मित्राचाच केला खुन….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

नांदुरा पोलिस स्टेशन हद्दीतील माळेगाव रोडवरील खून प्रकरणाची यशस्वीपणे उकल करण्यात स्थानिक गु्न्हे शाखेला यश, गुन्ह्यांत वाररलेल्या वाहनासह ३ आरोपी अटकेत….

नांदुरा(बुलढाणा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ३/२/२०२४ रोजी  फिर्यादी संदीप अर्जुन तायडे वय ३८ वर्षे रा. लोणवडी ता. नांदूरा यांनी पो.स्टे. नांदूरा येथे तक्रार दिली की,
त्यांचे माळेगांव रोडवरील शेतातील धुऱ्यावर एक ३० ते ३५ वर्षे वयाच्या अनोळखी पुरुषाचे प्रेत मार लागलेल्या अवस्थेत पडलेले असून, मृतकांचे  कपाळ फुटलेले, डोक्याचे डावे बाजूची चामडी निघालेली, गळ्या भोवती काळसर व्रण असल्याचे दिसत आहे. या वरुन सदर मृतकाचा कुणीतरी अज्ञात आरोपींनी खून केला आहे. अशा तक्रारीवरुन पोलिस स्टेशन नांदुरा येथे गुरनं. १६२/२४ कलम 302 भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपास सुरु करण्यात आला सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थागुशा करीत असतांना तपासात असे निष्पन्न झाले की सदर म्रुतकाचे नाव हर्षल ऊर्फ पप्पु सदाशिव घोपे वय 32 वर्षे रा. घाटपुरी खामगांव ह.मु. शेगांव हे आहे त्याअनुषंगाने तपास सुरु असतांना असे निर्दशनात आले की म्रुतकाचे मित्र





(1) आकाश ऊर्फ आदिनाथ आनंदा रावणकर वय 28 वर्षे रा. घाटपूरी ता. खामगांव
(2) रुपेश देविदास कुरवाडे वय 28 वर्षे रा. शिवनेरी चौक, शेगांव
(3) मयुर विजय शेलार वय 24 वर्षे रा. साईनगर, वाडी ता. खामगांव



यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर ईसम हे सोबतच मोलमजुरीचे काम करायचे व हे सगळे दारु पिण्याच्या सवईचे असल्याने घटनेच्या दिवशीसुध्दा त्यांनी सोबत दारु पिऊन त्यांच्यात शुल्लक कारणावरुन वाद झाला व वादाचे रुपांतर मारामारीत होऊन यातील तिन्ही आरोपींनी म्रुतक हर्षल यास जिवानिशी ठार केले व त्याचे प्रेत हे माळेगाव रोडवरील संदीप तायडे यांचे शेताचे धुर्यावर टाकुन तेथुन पसार झाले व गावात आपण काही केलेच नाही या तोर्यात वावरत होते अखेर त्यांना दिनांक ७ रोजी अटक करण्यात आली त्यांचेकडुन त्यांनी गुन्ह्यात वापरलेले टाटा इंडीका वाहन किं. 1,00,000/- रु जप्त करण्यात आले असुन पुढील तपास सुरु आहे



सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक सुनील कडासने,अपर पोलिस अधीक्षक खामगाव  अशोक थोरात,अपर पोलिस अधिक्षक बुलढाणा बी.बी. महामुनी यांचे मार्गदर्शनाखाली,पोलिस निरीक्षक,स्थागुशा अशोक एन. लांडे  बुलढाणा पोनि. विलास पाटील पो.स्टे. नांदूरा, सपोनि. आशिष चेचरे, पोउपनि, सचिन कानडे, पोहवा दिगंबर कपाटे,पंकज मेहेर, नापोशि. गणेश पाटील,पोशि विजय सोनोने, दिपक वायाळ, चानापोशि सुरेश भिसे स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा,पोहवा मिलींद जवंजाळ नापोशि. संजय जाधव, राहूल ससाने, शैलेश बहादुरकर पोशि विनायक मानकर, विनोद भोजने, कैलास सुरडकर,रवि झगरे, रवि सावळे पो.स्टे. नांदुरा, पोशि. संदिप टाकसाळ पो.स्टे. शिवाजीनगर, पोशि. प्रकाश गव्हांदे पो.स्टे. शेगांव शहर,पोहवा. राजू आडवे-सायबर पो.स्टे., बुलढाणा यांचे पथकाने पार पाडली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!