अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतुक करणार्याच्या आवळल्या मुसक्या

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

पोलीस ठाणे सालेकसा पोलीसांची कारवाई :- निर्दयतेने बंधिस्त केलेल्या 26 गोवंशीय जनावरांची सुटका. किंमती एकुण 17,लाख 60,000/- रुपयाचा मुददेमाल जप्त
सालेकसा(गोंदिया)- पोलिस अधीक्षक निखिल  पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक  बनकर, यांनी आगामी कालावधीत साजरे करण्यात येणारे सण- उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हयातील सर्व पोलिस स्टेशन हददीत अवैधरित्या चालणारे सर्व बेकायदेशीर धंदयाचे समुळ उच्चाटन करणा-याच्या तसेच अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करून अवैध धंद्यांवर अंकुश व आळा घालण्या करीता धाड कारवाई करण्याच्या निर्देश सूचना सर्व ठाणे प्रभारी यांना देण्यात आले होते.या अनुषंगाने पोलिस अधीक्षक, निखिल  पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक,  अशोक बनकर, यांचे निर्देश, सूचनाप्रमाणे आणि मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंदयाविरुध्द धाड मोहीम राबविण्यात येत होती तसेच या अनुषंगाने पोलिस ठाणे सालेकसा पोलिसांची अवैध धंदयाविरुध्द विशेष धाड मोहिम सुरु आहे.दिनांक 02/09/ 2023 रोजी पोलिस निरीक्षक बाबासाहेब  बोरसे, ठाणेदार सालेकसा यांना मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे सालेकसा पोलिसांनी गस्तीदरम्यान अवैध जनावरें वाहतूक संदर्भात कारवाई केली असता मौजा- पांढरवानी (बिजेपार) ते डोमाटोला जंगल परिसरातील ठाकुरटोला गावातील रस्त्यावर एक ट्रक (आयसर) क्र.एम.एच- 40 सी.एम. 4034 डोमाटोला कडुन पांढरवानी (बिजेपार) कडे जातांना दिसून आल्याने सदर ट्रकला थांबविन्याचा प्रयत्न केला असता सदर ट्रकचे ड्रायव्हरने ट्रक (आयसर) ठाकुरटोला गावातील रस्त्यावर थांबविला व तेथून जंगलात पळून गेला. पाठलाग केला असता मिळून आले नाही. सदर ट्रकचे मागील डाल्याची पाहणी केली असता ट्रक मध्ये डाल्यात लहान- मोठे गोवंश जातीचे एकूण 26 जनावरे दोरीने दाटी वाटीने बांधुन डांबून ठेवून सदर जनावरांना कोणत्याच प्रकारचे चा-या पाण्याची सोय न करता निर्दयतेने बांधुन ठेवलेले मिळुन आले. गोवंश जातीचे 26 जनावरे कि. अं. 2 लाख 60 हजार /- रु व ट्रक (आयसर) कि. अं. 15 लाख /-रु असा एकुण 17 लाख 60 हजार /- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आले. पो.ठाणे सालेकसा येथे अज्ञात इसमाविरुध्द कलम 11 (1) (ड) (इ), (फ) (ह) महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, सहकलम 5 (अ) (2),9 महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1960 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्यातील अज्ञात आरोपी चा शोध घेणे सुरु आहे. सदर गुन्हयाचा तपास म.पो.उप.नि.मयुरी नागदिवे हे करित आहेत.सदर गुन्हयात जप्त गोवंश जातीचे जनावरांना त्यांचे सुरक्षेच्या दृष्टीने लक्ष्मी गौशाला चॅरीटेबल ट्रस्ट चुटीया ता. जि. गोंदिया येथील गौशालेत दाखल करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक  निखील पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक, अशोक  बनकर, उप- विभागिय पोलिस अधिकारी, आमगांव यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सालेकसा पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, म.पो. उप.नि. मयुरी नागदिवे, पोशि.अजय इंगळे,विकास वेदक, पो.स्टे. सालेकसा यांनी सदरची कामगिरी बजावली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!