सराईत मोटारसायकल चोरट्याकडुन चोरीचे २ गुन्हे स्थागुशा ने केले उघड…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

स्थानिक गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगारास ताब्यात घेऊन मोटारसायकल चोरीचे २ गुन्हे केले उघड…

चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,चंद्रपुर जिल्हयात मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड होण्याचे प्रमाण कमी असल्याने अभिलेखावरील गुन्हे तात्काळ उघडकिस आणणेबाबत  पोलिस अधीक्षक  मुम्मका सुदर्शन,अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधु यांनी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर प्रभारी  पोलिस निरीक्षक  महेश कोंडावार यांचे मार्गदर्शनाखाली शाखेचे पथकांना आदेशीत केले होते.





त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांना शहरात प्रभावी पेट्रोलींग करून मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकिस आणण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार दिनांक 01/03/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व कर्मचारी चंद्रपुर शहर, रामनगर हद्दीत पेट्रोलींग करीत
असता गोपनीय बातमीदार कडुन माहीती मिळाली कि एका सराईत चोराकडे दोन मोटरसायकल असुन त्याने मोटरसायकल आपले घरी लपवुन ठेवल्या आहेत. अशा खबरेवरून सदर चोरास त्याचे राहते घरुन ताब्यात घेऊन त्यास विचारपुस केली असता त्याने काही दिवसाआधी चंद्रपुर शहर हददीतील आझाद बगीचा जवळुन व रामनगर हददीतील डॉ. मुसळे यांचे दवाखान्या समोरून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. सदर कबुली वरून अतुल विकास राणा वय 25 वर्षे रा. नगिनाबाग चंद्रपुर त्यांचेकडुन गुन्हयातील वाहन चोरीचा मुद्देमाल



1) हिरो होंडा पॅशन क्र. 1) MH34 BD3854 किंमत 22,000/-रू. 2) MH34 X5327 किमत 25,000/- रू.
असा एकुण 47,000 /- रू. चा माल जप्त करण्यात आला आहे.तसेच सदर सराईत गुन्हेगाराकडुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकिस आलेले आहेत.
1) पोलिस ठाणे चंद्रपुर शहर अप. क्र. 149/24 कलम 379 भादंवि
2) पोलिस ठाणे रामनगर अप. क्र. 231 / 24 कलम 379 भादंवि



सदरची कर्यवाही पोलिस अधीक्षक  मुम्मका सुदर्शन,अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधु,स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर प्रमुख पोलिस निरीक्षक  महेश कोंडावार, सपोनी. जितेंद्र बोबडे, पो.हवा. नितीन साळवे, प्रकाश बलकी, सुभाष गोहोकार पोशि मिलींद जांभुळे चापोशि रूषभ बारसिंगे यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!