
चंद्रपुर स्थानिक गुन्हे शाखेने वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यातील १२ मोटारसायकल केल्या हस्तगत
चंद्रपुर- जिल्हयामध्ये होत असलेल्या वाहन चोरीच्या गुन्हयांना आळा घालण्याकरिता पोलिस अधिक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक महेश कोंडावार यांनी विशेष पथक तयार करून त्यांना त्याबाबत आदेश दिले होते. पोलिस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांचा मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर चे पथक हे मोटारसायकल चोरीचे रेकॉर्डवरिल गुन्हेगार शोध मोहीम पेट्रोलिग राबवीत असतांना पोलिस स्टेशन शेगाव हद्दीतील चारंगाव बु बस स्टॉप येथे जावुन सापळा रचून रेकॉर्डवरील आरोपी
1)राजु बालाजी धुर्वे वय 33 वर्ष रा.अर्जुनी कोकेवाडा ता. वरोरा जि. चंद्रपूर
2) प्रशांत उर्फ भोला कवडुजी गाते वय 31 वर्ष रा.शिवाजी नगर,नितेची वाडी ता. भद्रावती जि. चंद्रपूर


यांना ताब्यात घेवुन त्याचे कडुन खालील प्रमाणे मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहे पोलिस स्टेशन भद्रावती ,वरोरा,चिमुर, सिदेवाही येथील दाखल असलेले मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस करण्यात आले.
सदरची यशस्वी कामगीरी पोलिस अधिक्षक रविंद्र परदेशी अप्पर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पो.नि. महेश
कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचे नेतृत्वात सपोनि जितेद्र बोबेडे, पो.उप.नि.विनोद भुरले, पो.हवा. संजय आतकुलवार,पोहवा धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, नापोकॉ संतोष येलपुलवार, अजय बागेसर, दिनेश अराडे व पो.अ.नितीन रायपुरे,गोपाल आतकुलवार, प्रशांत नागोसे, रूषभ बारसिगे, सिसिटिनएस चे पोहवा गोपाल पिंपळशेन्डे व सायबर पथक यांनी केली.



