चंद्रपुर स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासाचे आत केला खुनाचा उलगडा….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पोलिस स्टेशन बल्लारपूर अंतर्गत मौजा विसापुर येथे झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस  २४ तासाचे आत अटक,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी…

चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 23 रोजी  रोजी पोलिस स्टेशन बल्लारपूर येथे माहिती मिळाली की, विसापुर येथे शिवाजी चौक, वार्ड क्र 01, विसापुर येथे





सचिन भाऊजी वंगणे वय 40 वर्ष रा. वार्ड क्र 01 विसापुर ता.
बल्लारपूर



याला कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी धारदार हत्याराने मारलेले आहे अश्या माहितीवरून घटनास्थळावर रवाना होवुन पाहनी केली असता सदर मृतक यास पोटावर कोणत्यातरी धारदार हत्याराने मारहान करून खुन केल्याचे दिसुन आले. त्यावरून त्याचा भाऊ  रमेश भाऊजी वंगणे वय 46 वर्ष रा. शिवाजी चौक, वार्ड क्र 01, विसापुर ता. बल्लारपूर याचे रिपोर्टवरून पोलिस स्टेशन,बल्लारपुर  अप क्र 81 / 2024 कलम 302, 452 भां.द.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी,अप्पर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु,उपविभाागीय पोलिस अधिकारी, राजुरा यांनी तात्काळ गुन्ह्याचे घटनास्थळाला भेट देवुन सदर घटनास्थळी तळ ठोकुन गुन्ह्याचे संबंधाने उपयुक्त मार्गदर्शन करून पोलिस स्टेशन बल्लारपूर व स्थानीक गुन्हे शाखा, चंद्रपुर असे दोन पथक तयार केले. पोलिस अधिक्षक व अपर पोलिस अधिक्षक यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलिस स्टेशन बल्लारपूर व स्थानीक गुन्हे शाखेचा पथकाने आरोपीबाबत कोणताही सुगावा
नसताना अतिशय कौशल्यपुर्ण तपास करून आरोपीबाबत गोपनीय माहिती काढुन 24 तासाचे आंत आरोपी यास निष्पन्न करून आरोपी नामे



विट्ठल उर्फ डेनी गोसाईराव डबरे वय 37 वर्ष रा. वार्ड क्र 01, विसापुर ता. बल्लारपूर

यास ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे.
सदर कामगिरी पोलिस अधिक्षक रविंद्रसिह परदेशी,अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु,उपविभागीय पोलिस अधिकारी, राजुरा यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उमेश पाटील, पोलिस
निरीक्षक महेश कोंडावार (स्थागुशा), सपोनी रमेश तळी, सपोनी विकास गायकवाड (स्थागुशा), सपोनी प्राची राजुरकर, पोउपनि वर्षा नैताम, पो. हवा रनविजय ठाकुर,  यशवंत कुमरे, बाबा नैताम,  संतोष दंडेवार, अनुप डांगे, मिलींद चव्हान, जमीर पठान,  नितेश महात्मे (स्थागुशा ), पो.शि श्रीनीवास वाभीटकर,  प्रसंन्नजित डोर्लीकर, प्रकाश मडावी,प्रसाद धुलगंडे यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!