
सहा.पोलिस अधिक्षक यांचा रेतीचा अवैधरित्या उपसा करुन चोरटी वाहतुक करणाऱ्यावर छापा…
अवैधरित्या रेतीचे उत्खनन करुन त्याची चोरटी वाहतुक करणाऱ्यांवर सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,वरोरा यांचा छापा,३५ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…
वरोरा(चंद्रपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आज दि(२६) रोजी सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,वरोरा नयोमी साटम यांना गोपनीय माहीती मिळाली की तुळाणा व करंजी येथील वर्धा नदीच्या घाटावर काही अनोळखी ईसम स्वतहाच्या आर्थिक फायद्याकरीता अवैधरित्या उत्खनन करीत आहे यावरुन यांनी त्यांचे अधिनस्त पोलिस कर्मचारी व पोलिस स्टेशन, वरोरा येथील सपोनि विनोद जांभळे व त्यांचे सोबतचे पोलिस कर्मचारी यांचे सोबत सकाळी ०९.०० वा. चे सुमारास मौजा तुळाणा आणि करंजी येथील वर्धा नदी पात्रातील रेती घाटावर छापा घालुन रेती या गौण खनिजाचे अवैद्य उत्खनन करणारे ५ ट्रॅक्टर सोबत जोडलेले ट्रॉलीसह ज्यात रेती भरून असलेले आणि ट्रॅक्टर धारक व चालकांनी एकमेकांसोबत घटनेदरम्यान संपर्क करणेकरीता वापरलेले ०३ मोबाईल फोन असा एकुण ३५,३८,००० /- रू चा मुद्देमाल जप्त केला


सदर ट्रॅक्टर चालक आणि मालक १) नितेश वामन पिंगे, २) मुकेश चांदेकर, ३) विजय आनंदराव मारेकर, ४) राजा थैम, ५) विकास जानकीराम पंधरे, ६) आसिफ थैम, ७) भालचंद्र महादेव पिंपळशेंडे, ८) राजु गंधारे, ९) संजय मारोती खांडेकर आणि १०) विक्की गंधारे, अशा एकुण १० आरोपींविरूध्द कलम ३७९, ३४ भादवि सहकलम ४८ महाराष्ट्र महसुल अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.विशेष बाब म्हणजे सदर रेती घाट रेती उपसा करणेकरीता शासन स्तरावरून मा.जिल्हाधिकारी, चंद्रपुर यांचे आदेशाने लीलाव झालेले नाही. तरी सुध्दा यातील आरोपींनी संगणमताने मोठया प्रमाणात रेतीचे उत्खनन करून ट्रॅक्टरसोबतचे ट्रॉलीमध्ये भरतांना मिळुन आलेले आहेत.

तसचे रेती तस्करांकडुन रात्री अपरात्री रेती भरलेले ट्रॅक्टर लोकवस्तीतून भरधाव घेवुन जात असल्याने व वारंवार होत
असलेले चोरटी रेती वाहतुकीचे वाहनांमुळे नदी पात्राची व रस्त्यांची दुरावस्था होत असल्यामुळे वरोरा येथील सामान्य नागरिक त्रस्त झालेले आहेत व स्वतः पुढे येवुन रेती तस्करांविरूध्द कार्यवाही करण्यास सहकार्य करीत आहेत. अशाच प्रकारे नागरिकांचे सहकार्यातुन नयोमी साटम, सहाय्यक पोलिस अधिक्षक, तथा
उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा यांनी कायदेशिर कार्यवाही केलेली आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन,अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु,सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,वरोरा नयोमी साटम यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि विनोद जांभळे ,पोलिस अंमलदार किशोर बोढे, दिपक मोडक, विशाल राजुरकर, विठ्ठल काकडे, नितीन तुराळे यांनी केली
सदर प्रकरणात पुढील कार्यवाही करीता अहवाल महसुल विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे भविष्यात रेती तस्करांकडुन अवैद्यरित्या रेती उत्खनन किंवा वाहतुक केल्यास कठोर कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल, अशी चेतावनी पोलिस विभागाकडुन देण्यात आली आहे.


