निवडनुकीच्या अनुषंगाने चेकपोस्टवर LCB ची मोठी कार्यवाही,३५ लाखाचा गुटखा जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ चे अनुषंगाने आंतरजिल्हा बॉर्डरवर लावण्यात आलेल्या व्याहाड खुर्द एस.एस.टी चेक पोस्टवर महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधीत असलेला सुंगधित तंबाखुने भरलेल्या ट्रकसह एकुण ३५ लाखाचा माल स्थानिक गुन्हे शाखेने केला जप्त…..





चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आज दि.१८/१०/२०२४ रोजी सकाळी पोलिस अधिक्षक चंद्रपुर यांचे आदेशान्वये विधानसभा निवडणुक – २०२४ चे आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने चंद्रपुर जिल्हयात दारूबंदी, जुगार प्रतिबंध, प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु तसेच इतर अवैध धंदयावर कार्यवाही करनेकामी पोलिस स्टेशन सावली परिसरात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार पेट्रोलींग करीत असतांना गुप्तबातमीदार यांचेकडुन माहिती मिळाली की, एक पांढऱ्या रंगाचा आयचर क्र सीजी-०७ सीक्यु ४६०२ मधुन महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधीत असलेला सुगंधित तम्बाकु व पानमसाला या अन्नपदार्थाच्या विक्रीकरीता गडचिरोली ते चंद्रपूर अशी अवैद्यरित्या वाहतुक करणार आहे,



अशा खात्रीशीर बातमीवरुन विधानसभा निवडणुक -२०२४ एसएसटी चेक पोस्ट व्याहाड (बुज) ता. सावली येथे उपविभागीय पोलीस अधिकारी, मुल, एस एस भगत,पोलिस निरीक्षक स्थागुशा महेश कोंडावार ,सपोनि दिपक कांकेडवार, पोउपनि संतोष निंभोरकर, पोहवा चेतन गज्जलवार, पोहवा नितेश महात्मे, पोशि किशोर वाकाटे,अमोल सावे,प्रफुल गारघाटे,प्रमोद डंबारे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी राज्य उत्पादन शुल्क, चंद्रपूर येथील कर्मचारी यांचेसह नाकाबंदी करून नमुद वाहन चेक केले असता त्यामध्ये लोखंडी तारेच्या बंडल खाली लपवुन ठेवलेला महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधीत असलेला मजा १०८ सुंगधित हुक्का शिशा तंबाखूचे २०० ग्रॅम वजनाचे १६८० बॉक्स, ५० ग्रॅम वजनाचे १८०० बॉक्स एकूण कि. १९,९३,८००/- रू व जप्त वाहन कि. १५,०००,०००/-रू असा एकुण ३४,९३,८००/- रू चा माल पंचनामा कार्यवाही करून जप्त करण्यात आला



जप्त वाहनाचा चालक १) इरफान कुरेशी मुस्तफा कुरेशी, वय २७ वर्ष, धंदा ड्रायव्हर, रा. इस्लामनगर वॉर्ड नं.४, सुफेला, ता.भिलाई, जि.दुर्ग, छत्तीसगड. २) संतोष कुमार सुंदर सिंह, वय ४७ वर्षे, धंदा ड्रायव्हर, रा. पयली, ता. शहपुरा, जि.डिंडोरी, मध्यप्रदेश यांचेविरूध्द सरकारतर्फ पोउपनि संतोष निंभोरकर यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन सावली येथे गु.र.नं – २३३/२०२४ कलम ३०(२) (अ),२६(२) (i),२६ (२) (iv), ५९ अन्न सुरक्षा आणि मानके अधि.२००६, सहकलम २२३,२७५,१२३ भा.न्या.सं अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि दिपक कांकेडवार, स्था.गु.शा चंद्रपूर हे करीत आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक सुदर्शन मुमक्का,अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु,उपविभागिय  पोलिस अधिकारी,मुल एस एस  भगत  यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश कोंडावार स्था.गु.शा चंद्रपूर, सपोनि दिपक कांकेडवार, पोउपनि संतोष निंभोरकर, पोहवा चेतन गज्जलवार,नितेश महात्मे, पोशि किशोर वाकाटे, अमोल सावे,प्रफुल गारघाटे,प्रमोद डंबारे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी कारवाई केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!