मुर्तीची विटंबना करणारा बल्लारपुर पोलिसांचे ताब्यात,परीसरात शांतता

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

बल्लारपुर पोलीसांनी  अतीशय शिताफिने भिवकुंड नाला विसापुर येथील हनुमानजी ची मुर्तीची विटंबना करणाऱ्यास घेतले ताब्यात……

बल्लारपुर(चंद्रपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस ठाणे बल्लारपुर हद्दीतील भिवकुंड नाला विसापुर येथील मंदिरातील हनुमानाच्या मुर्तीची विटंबना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने केल्याबाबत दिनांक-१९/१०/२०२४ रोजी पोलिस ठाणे बल्लारपुर येथे गुन्हा रजि.क्रं.९७१/२०२४ कलम-२९८ भारतीय न्याय संहिता-२०२४ अन्वये नोद करण्यात आला होता व  सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोधकामी गुन्हयाचे तपास अधिकारी पोलिस निरीक्षक सुनिल गाडे पोलिस ठाणे बल्लारपुर यांनी तपास पथक तयार करुन अज्ञात आरोपीचा तांत्रीक पध्दतीने तपास करुन आरोपीस निष्पन्न करुन आरोपीस आज दि.२५/१०/२०२४ रोजी अटक करण्यात आली आहे.





सदर आरोपीस ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी केली असता त्याचा व त्याचे पत्नीचा वाद झाल्याने व कौटुंबीक कलहामुळे त्याची पत्नी त्यास सोडुन तिचे माहेरी बाबुपेठ चंद्रपुर येथे गेली होती व तेथुन तिची आत्या राहणार बल्लारपुर हिचे घरी मुक्कामी गेली असता आरोपी हा पत्नीचे शोधात मोटार सायकलने चंद्रपुर येथुन बल्लारपुर जात असतांना सैनिक स्कुल जवळ त्याची मोटार सायकलची एक्सलेटर वायर तुटल्याने त्याने सदर मोटार सायकल रस्त्याचे कडेला उभी करुन मंदिराजवळ जावुन चंद्रपुर कडे जाणाऱ्या वाहन चालकाकडे लिफ्ट मागत होता. त्यास कोणीही लिफ्ट न दिल्याने व पहिलेच्या कौटुंबिक कलहामुळे त्याने रागाचे भरात जवळच असलेल्या मंदिरातील हनुमानाच्या मुर्ती तोडुन व ती गाभाऱ्या बाहेर फेकुन मुर्तीची विटंबना केली व तेथुन पायदळ चालत त्याचे घरी चंद्रपुर येथे निघुन गेला.



सदरची कारवाई पोलिस अधिक्षक  मुमक्का सुदर्शन, अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु,उपविभागिय पोलिस अधिकारी,राजुरा दिपक साखरे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनात पो.नि.सुनिल वि.गाडे, सपोनि. अंबादास टोपले, सफौ. गजानन डोईफोडे, आंनद परचाके, पोहवा. सुनिल कामटकर, . पुरुषोत्तम चिकाटे, रणविजय ठाकुर, पोहवा. संतोष दंडेवार,संतोष पंडीत, सत्यवान कोटनाके, पोशि विकास जुमनाके, शरदचंद्र कारुष, वशिष्ठ रंगारी, शेखर माथनकर, मिलींद आत्राम, भुषण टोंग, खंडेराव माने, लखन चव्हाण, मपोशि  अनिता नायडु  यांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!