
अट्टल गुन्हेगारास ताब्यात घेऊन LCB ने उघड केल्या १२ घरफोड्या,१९ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…
स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडी करणा-या अट्टल गुन्हेगाराकडुन १२ घरफोड्या उघडकीस आणुन १९,१०,०००/- रू. चे सोन्याचे, चांदीचे दागीने केले जप्त…..
चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि २१ मार्च २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखे चे पथक पोलिस अधिक्षक सुदर्शन मुमाक्का यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयात प्रोव्हीशन, जुगार रेड, सुगंधीत तंबाकु तसेच इतर अवैध धंदयावर कार्यवाही करणेसाठी चंद्रपुर शहर परिसरात पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरव्दारे गोपनीय माहीती मिळाली की, सुरेश महादेव कामरे हा चोरी केलेले सोन्याचे दागीने विकणे करीता कुठे तरी घेवुन जात आहे अशा गोपनीय खबरे वरून नमुद आरोपीस ताब्यात घेवुन त्यांची अंगझडती घेतली असता त्याचेकडे २,६१,०००/- रू चे सोन्याचे दागीने मिळुन आले.


नमुद आरोपीस त्याचे नाव विचारुन खात्री केली असता तो सुरेश महादेव कामरे वय-६० वर्ष, धंदा-मजुरी, रा. पुनवट, ता. वणी, जि. यवतमाळ येथील सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले त्यास त्याच्या ताब्यातील सोन्याचे दागीन्याबात विचारणा केली असता, त्यांनी पोलिस स्टेशन, तळोधी परिसरातील मौजा आकापुर येथे रात्रौ दरम्यान घरफोडी करून चोरी केल्याचे सांगितले. नमुद आरोपीस अधिक विश्वासात घेवुन विचारपुस केले असता आरोपी सुरेश महादेव कामरे, वय-६० वर्ष, धंदा-मजुरी, रा. पुनवट, ता. वणी, जि. यवतमाळ यांनी आज पावेतो पोलिस स्टेशन भद्रावती-०१, वरोरा-०३, सावली-०१, मुल-०१, तळोधी-०५ तसेच नागभिड ०१ अश्या घरफोड्या केल्याची कबुली दिली. वरील सर्व घरफोड्या मधील चोरी केलेला मुद्देमाल एकुण १९,१०,००० रूपयाचे सोन्याचे व चांदीचे दागीने व नगदी रूपये पंचा समक्ष आरोपीकडून जप्त करण्यात आले.

तसेच आरोपी सुरेश महादेव कामरे, वय ६० वर्ष, धंदा-मजुरी, रा. पुनवट, ता. वणी, जि. यवतमाळ हा मागील २० वर्षापासुन चोरी, घरफोडी तसेच इतर गुन्हयात फरार असल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर हे करीत आहेत.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक. मुमक्का सुदर्शन, अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु , यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, मधुकर सामलवार, सुनिल गौरकार, सफौ धनराज करकाडे, पोहवा सुभाष गोहोकार,सतिश अवथरे, रजनिकांत पुठ्ठवार,दिपक डोंगरे, चेतन गज्जलवार,सुरेंद्र महंतो, पोशि प्रफुल गारघाटे,प्रशांत नागोसे,किशोर वाकाटे, शशांक बदामवार, अमोल सावे, चापोहवा दिनेश अराडे, चापोशि मिलींद टेकाम सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी केली आहे.


