बल्लारपुर पोलिसांनी २ देशी बनावटीच्या पिस्तुलसह ४ आरोपी घेतले ताब्यात….
दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत बल्लारपूर पोलिसांनी जप्त केली देशी बनावटीची दोन पिस्तूल,४ आरोपी ताब्यात…..
बल्लारपुर(चंद्रपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. १३/१०/२०२४ चे सायंकाळी ५.३० वा. ते ६.०० वा. चे दरम्यान पोलिस स्टेशन बल्लारपुर चे पथक परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना खबरीकडुन गोपनीय माहीती मिळाली की फुकटनगर परीसरात कश्मीरसिंग महेंद्रसिंग बावरी, रा. फुकटनगर बामणी, बल्लारपुर, जि. चंद्रपूर याचे राहते घरी बेकायदेशिर रित्या पिस्तुल ठेऊन आहे
अशा मिळालेल्या माहितीच्या आधारेसदर ठिकाणी घरझडती घेतली असता त्याठिकाणी एक जुने वापरते लोखंडी धातूचे देशी बनावटीसारखे सिंगल बॅरल व खाली मॅगझीन असलेले (अग्नीशस्त्र) ०७ एम.एम. पिस्तूल किंमत १०,०००/- रू.मिळुन आले,सदरचे अग्नीशस्त्र घटनास्थळ जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करून पो स्टे ला अप क ९५८/२०२४ कलम ३, २५ भारतिय हत्यार कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
तसेच दुसर्या एका कार्यावाहीत दि. १४/१०/२०२४ चे रात्री १२.१५ वा. दरम्यान मिळालेल्या माहीतीवरुन ०१) आकाश बाबूराव चाफले, वय २४ वर्ष, ०२) प्रणय मारोती जुनघरे, वय २३ वर्ष, दोन्ही रा. सुब्बई, ता. राजूरा, जि चंद्रपूर, ०३) पलविंदरसिंग चॉदसिंग बावरी, रा. कन्नमनगर वार्ड, बल्लारपुर, जि. चंद्रपूर यांना ताब्यात घेवून आकाश बाबूराव चाफले याचे ताब्यातून एक जुने वापरते लोखंडी धातूचे देशी बनावटीसारखे सिंगल बोअर व खाली मॅगझीन असलेले (अग्नीशस्त्र) ०७ एम.एम. पिस्तूल किंमत २५,०००/- रू. घटनास्थळ जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करून पो स्टे ला अप क ९५९/२०२४ कलम ७, २७ भारतिय हत्यार कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.सदर दोन्ही कार्यवाहीत एकुण चार आरोपींना ताब्यात घेवून अटक करण्यात आली. सदर गुन्हयाचा तपास सुरू आहे
सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु,, उपविभागिय पोलिस अधिकारी, राजूरा यांचे मार्गदर्शनात पोलिस निरिक्षक सुनिल विठ्ठलराव गाडे, स.पो.नि. ए.एस. टोपले, पो.उप. निरिक्षक हुसेन शहा, स.फौ. गजानन डोईफोडे, आनंद परचाके, पोहवा. रणविजय ठाकूर, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, सुनिल कामतकर, पुरूषोत्तम चिकाटे, पो. अंमलदार शेखर माथनकर, शरदचंद्र कारूष, विकास जुमनाके, वशिष्ठ रंगारी, मिलींद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हान, म.पो. अंमलदार अनिता नायडू, तसेच चालक पो अंमलदार विकास खंदार, यांनी केली