बनावट सोन्याची विक्री करून फसवणूक करणा-या आतंर राज्यीय टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक सुदर्शन मुमाक्का यांचे आदेशान्वये अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि २४ मार्च रोजी चंद्रपुर शहर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना शहरात बनावटी सोने विक्री करून फसवणूक करणारी टोळी फिरत असल्याची गोपनिय बातमी मिळाली या गोपनीय बातमीवरून सराफा लाईन येथील सोनार व ईतर व्यापारी यांना सतर्क करण्यासाठी  तसेच नमुद इसमांचा चंद्रपुर शहरात शोध घेत असतांना छोटा बाजार परिसरातील जया कलेक्शन या दुकानाचे मालक  राकेश मंधानी, रा. रामनगर चौक, चंद्रपुर यांना महिती देत असतांना त्यांनी सांगितले की, त्यांचेकडे काही वेळापुर्वी तिन इसम व एक महिला हे सोने विक्री करीता आले असुन त्यांनी सोन्याचे मणी दाखवुन त्यांचेकडे असलेली सोन्याची माळ आणणार आहे.

त्यांचेकडे जवळपास एक किलोच्यावर सोने असल्याचे सांगुन २० लाख रूपये मध्ये विकायचे आहे असे सांगितले. त्यावरून नमुद ठिकाणी सापळा रचुन आरोपी १) अतुल उर्फ मुखी बनाराम परमार, वय-३९ वर्ष, रा. नई आवादी, बोथला सराया, आगरा (उत्तरप्रदेश), २) शुत्रघ्न सिताराम सोलंकी, वय-४० वर्ष, रा. पश्चिमपुरी, दिपनगर, घर क्रमांक ए-७७, आगरा, उत्तरप्रदेश, ३) पुरन प्रेमचंद बघेल, वय-३८ वर्ष, रा. देवबलोदा, ता. पाटन, जि. दुर्ग, राज्या छत्तीसगड, ४) श्रीमती लक्ष्मी सेवाराम राठोड, वय-५५ वर्ष, रा. रेहीनाकी पुलीया, फैजीवाली गल्ली, फिरोजाबाद, ह. मु. नई आवादी, बोथला सराया, आगरा (उत्तरप्रदेश) यांचेकडुन १) ४ नग सोन्याचे मनी वजन १.५ मिली ग्रॅम किमंत १५,०००/- रू २) पिवळ्या धातुचे बनावटी मनीची माळ वजन १.३६१ किलो ग्रॅम (बनावटी नकली सोन्याची) किमंत १,०००/- रू, ३) दोन वेगवेगळया कंपनीचे मोबाईल किमंत २,०००/- असा एकुण असा एकुण १८,०००/- रू चा माल जप्त करून नमुद आरोपीं विरूध्द पोलिस स्टेशन, चंद्रपुर शहर येथे फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला





सदरची कामगीरी पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि दिपक कांक्रेडवार, पोउपनि सुनिल गोरकार, पोहवा किशोर वैरागडे,दिपक डोंगरे,सतिश अवथरे,रजनिकांत पुठ्ठवार, मपोहवा/निराशा,पोशि अमोल सावे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!