गडचांदुर येथील गोतस्कर बंधु स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात..
कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची तेलंगणा राज्यात तस्करी करणारे गडचांदुर येथील दोन तस्कर बंधु स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,छापा टाकुन १५० जनावरांची केली सुटका १ कोटी ३० लाख रूपयांचा मुद्देमाल केला जप्त…
चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक मुम्मका सुर्दशन यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांना दिले आहेत त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, स्थागुशा,विविध पथक तयार करुन त्यांना अवैध धंदयावर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते
त्याअनुषंगाने दि(१) रोजी गोपनीय बातमीदाराकडुन माहीती मिळाली की पोलिस स्टेशन, गडचांदुर परिसरातील मौजा हिरापुर, ता. गडचांदुर येथील अब्दुल अजीज अब्दुल रा. गडचांदुर हा आपला भाऊ अब्दुल अनीस रा. गडचांदूर याचे शेतात गाई-बैल(गोवंशीय जनावरे) गोळा करून ट्रक मध्ये क्षमते पेक्षा जास्त प्रमाणात कोंबुन अवैधरित्या कत्तली करीता वाहतुक करून तेलंगना राज्यात नेणार आहेत अशा माहीतीवरुन वरून स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील पथकाने मौजा हिरापुर शेतशिवारात छापा मारून पाहणी केली असता सदर शेत शिवारामध्ये आयचर ट्रक, अशोक लेलॅन्ड
कंपनीचा ट्रक, टाटा कपंनीचा पिकअप असे एकुण सात वाहने तिथे उभी दिसली सदर वाहनांची पाहणी केली असता,
सदर पाहणामध्ये अवैधरितया जानावराना क्रूरतेने हात, पाय, तोंड बाधुन चारा पाण्याची व्यवस्था न करता वाहनाच्या डाल्यात क्षमते पेक्षा जास्त प्रमाणात गाई-बैल (गोवंश) यांना आखुड दोराने कचकचुन दाटीने भरून त्यांची कत्तरी करीता वाहतुक करण्याकरीता डांबुन भरून अवैधरित्या वाहतुक करून तेलंगना
राज्यात घेवुन जाण्याचे समजले.
सदर सात वाहना मधील एकुण १५० जनावरे व वाहने किमंत एकुण १,३०,००,०००/- रु. (एक कोटी तिस लाख रूपये ) चा माल जप्त करण्यात आला असुन सदर गुन्हयातील एकुण १५ आरोपींना घटनास्थळावरून ताब्यात घेवुन पोलिस स्टेशन, गडचांदूर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे ताब्यातील आरोपींना पुढील तपासा कामी पोस्टे गडचांदुर यांचे ताब्यात देण्यात आले तसेच वाहनांमधील गोवंशाना नगरपालिका राजुरा कोंडवाडयात जमा करण्यात आले आहे
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन अपर पोलिस
अधिक्षक रिना जनबंधु, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, यांचे नेतृत्वात सपोनि हर्षल एकरे, पोउपनि विनोद भुरले, पोहवा धनराज, स्वामीदास,अजय,प्रकाश,नागरे, नितीन, सुभाष,सतिश,किशोर, रजनिकांत,चापोहवा दिनेश, नापोशि संतोष, पोशि सावे, प्रशांत,मिलींद स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर