अवैधरित्या विक्रीसाठी गुटख्याची वाहतुक करणारा स्थागुशा पथकाचे ताब्यात…
चंद्रपूर शहर परीसरात अवैधरित्या सुगंधीत तंबाखुची वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, एकुण 5,70,400 /- रू चा मुद्देमाल केला जप्त….
चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक सुदर्शन मुम्मका यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये अवैध धंधावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांना दिले त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक महेश कोंडावार स्थागुशा चंद्रपूर यांनी एक पथक नेमुण अवैध धंधावर कारवाई करण्याचे निर्देश दिले
त्याअनुषंगाने दि (11) रोजी गोपनीय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की,चंद्रपुर शहरात जटपुरा गेट कडुन कस्तुरबा चौका कडे जाणाऱ्या रोडने एक मारोती स्वीफ्ट कार क्र MH 40 A 7877 गाडीच्या डिकी मध्ये एक इसम हा प्लास्टिकच्या मोठ्या बॅगमधे सुगंधित तंबाखु बाळगुण अवैध रीत्या विक्री करीता येत आहे. अशा खबरेवरून जटपुरा गेट कडुन कस्तुरबा चौक, चंद्रपूर कडे येणाऱ्या दुदलवार हॉस्पीटल समोरील रोडवर नाकेबंदी केली असता एक चार चाकी कार संशयास्पद स्थितीत जटपुरा गेट कडुन कस्तुरबा चौका कडे येताना दिसली सदर कार जवळ येताच त्या कार चालकाला थांबण्याचा इशारा केला असता त्याने कार तशीच रस्त्याच्या कडेला सोडुन तेथुन पळ काढला तो पळत असतांना त्याचा पाठलाग केला परंतु मिळुन आला नाही त्याच्या चेहऱ्यावरुन तो सतिश उर्फ वैभव उर्फ लादेन गुम्मलवार रा. चव्हान फॅक्ट्री जवळ जलनगर चंद्रपुर हा असल्याचे कळले लागलीच त्याचे चारचाकी वाहन क्र MH 40 A 7877 .याची झडती घेतली असता वाहनासह ईगंल हुक्का शिशा सुंगंधीत तंबाखु एकुण कि. 5,70,400 /- रु. किमतीचा मुददेमाल मिळुन आला. त्यावरुन सतिश उर्फ वैभव उर्फ लादेन गुम्मलवार याचे विरुध्द पोस्टे चंद्रपूर शहर येथे नोंद करून मुद्देमाल पोस्टे चंद्रपूर शहर यांचे ताब्यात देण्यात आला
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलिस अधिक्षक, रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक, महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, पोउपनि विनोद भुरले,
नापोअ. संतोष येलपुलवार, पोशि नितीन रायपुरे, अमोल सावे चापोहवा दिनेश अराडे यांनी केली.