निवडनुकीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कार्यवाही,परसोडा चेकपोस्टवर पकडला बनावट देशी दारुचा साठा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

स्थानिक गुन्हे शाखेची महाराष्ट्र विधानसभा अनुषंगाने परसोडा एसएसटी चेकपोस्ट येथे अवैधरित्या देशी दारूची वाहतुक करणारे वाहन ताब्यात घेऊन त्यामधील बनावट देशी दारूच्या ४८५ पेटया केल्या जप्त……





कोरपना(चंद्रपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आगामी विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगाने अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक सुदर्शन मुमाक्का यांनी स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते त्या अनुषंगाने दिनांक ११/११/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखा येथील पथके पोलिस स्टेशन कोरपना हददीत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्तबातमीदारा कडुन माहिती मिळाली की, एक आयशर क्र एमएच ४० एके-११४१ मधुन देशी दारूच्या पेटया वाहतुक होणार असुन वाहन क्र एमएच-३२ एएक्स ११२६ महिद्रां एक्सयुव्ही ७०० कंपनीची गाडी ही पायलेटींग करणार आहे,



अशा गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील अधिकारी यांचे वेगवेगळे पथक तयार करून खाजगी वाहनाने नमुद वाहनाचा शोध करीत असतांना कोरपना अदिलाबाद हायवे वर आयशर वाहन दिसुन आले. नमुद वाहनाचा पाठलाग करून सदरचे वाहन हे विधानसभा निवडणुक २०२४ परसोडा एसएसटी चेकपोस्ट येथे राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर, आरटीओ विभाग, पोलिस विभाग व महसुल विभाग येथील अधिकारी व स्टॉफचे मदतीने नाकाबंदी करून ताब्यात घेतले.



नमुद वाहनचालक आकाश देवीदास भोसकर, वय ३० वर्षे, व्यवसाय ट्रक चालक रा.सातघरे यांचे घरी किरायाने, शास्त्री वॉर्ड, हिंगणघाट ता. हिगंणघाट, जि. वर्धा व सहचालक अजय रामदास मुळे, वय ४८ वर्षे, धंदा ट्रक चालक, रा. गौतम वॉर्ड, हिंगणघाट ता. हिगंणघाट, जि. वर्धा यांचे ताब्यातील एक आयशर क्र एमएच ४० एके-११४१ मध्ये पोत्याचे बंडल त्याखाली लपवुन ठेवलेल्या कागदी खोक्याच्या पेटया रॉकेट देशी दारू संत्रा एकुण ४८५ पेटयासह एकुण ३२,०७,५००/- रू मिळुन आल्याने पंचनामा  करून जप्त करण्यात आला आहे.

नमुद जप्त देशी दारूची राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर यांचेकडुन पंचनामा कारवाई दरम्यान तपासणी केली असता सदरची देशी दारू ही बनावट असल्याबाबत अभिप्राय प्राप्त झाल्याने पोलिस स्टेशन कोरपना येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई ही  स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर, राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर, प्रादेशिक परिवहन विभाग चंद्रपूर व महसुल विभाग चंद्रपूर यांचे उपस्थितीत संयुक्तरित्या करण्यात आली आहे.

सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक सुदर्शन मुम्मका,अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर, राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर, प्रादेशिक परिवहन विभाग चंद्रपूर व महसुल विभाग बंद्रपूर यांनी संयुक्तरित्या केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!