
अवैधरित्या विक्रीसाठी आणलेला मद्यसाठा गोंडपिपरी पोलिसांनी केला जप्त….
गोडपिंपरी पोलिसांची अवैध मद्यविरोधी कारवाई…
गोंडपिपरी(चंद्रपूर)प्रतिनिधी – जिल्हयातील वाढत्या चोरीच्या गुन्हयांना आणि अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नाउघड गुन्हयांचा आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. म्हणून त्या अनुषंगाने गोडपिंपरी पोलिसांचे पथक हे कारवाईसाठी गस्तिस होते. या वेळी पोलिसांना गुप्त माहितीदारा कडून मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक करून ४ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोउपनी. मनोहर मोगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी प्रकाश विजय बोरकर, रा. सिद्धार्थ नगर, दुर्गापूर, जि.चंद्रपूर आणि शैलेश वानखेडे, रा.तुकुम, चंद्रपूर यांच्यावर भा.दं.सं. कलम १०२/२०२४ कलम ६५ (अ), ८३ मदाका अंतर्गत गोडपिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या बाबत अधिक माहिती अशी की, दिनांक १५/३/२०२४ रोजी शिवाजी चौक गोंडपिपरी या ठिकाणी मुखबिरच्या खबरेवरून पोलिस पथकासह नाकाबंदी केली असता यातील नमुद आरोपी हा आपल्या ताब्यातील वाहन क्र.एम.एच.०५ सी.एच.१६९९ मध्ये वरिल प्रमाणे दारूचा मुद्देमाल अवैध्यरित्या बाळगुन वाहतुक करीत असताना मिळून आल्याने. सदर मालाबाबत चौकशी केली असता सदर माल हा शैलेश वानखेडे याचा असून त्यांनी लगामबोरी येथे नेण्यास सांगितल्या वरून आरोपी हा सदर दारूचा मुद्देमाल वाहतुक करीत असताना मिळून आल्याने सदर नमुद आरोपीतांविरूध्द विवीध कलमाअन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे.

सदर आरोपीचे ताब्यातुन निळ्या रंगाचे आठ मोठ्या प्लास्टिक पिशवीमध्ये रॉकेट संत्रा देशी दारूचे प्रत्येकी ९० एम.एल. चे ज्या वर आर व्ही.बीन.४२४ फेब २०२४ असे बॅच नंबर असलेले एकुण १५०० नग प्रत्येकी कि.३५ रू.प्रमाणे ५२,५००/- रू. चा माल, २) हुंडाई कंपनीचे चारचाकी वाहन क्र. एम.एच. ०५ सी.एच.१६९९ कि.४००००० रु.चा माल एकुण ४,५२,५००/-रू.चा माल हा जप्त कऱण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक मुमका सुदर्शन,अपर पोलिस अधिक्षक रीना जनबंदू ,उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे ,पोलिस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा महेश कोंडावार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रमेश हत्तीगोटे,पोउपनि मोगरे,पोहवा वागदरकर, गौरकार चापोशि पवार यांनी केली आहे.


