उच्चशिक्षित सराईत घरफोड्यास स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक,२ गुन्हे केले उघड…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

चंद्रपूर शहर परिसरात  घरफोडी करणा-या सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक,दोन घरफोडीचे गुन्हे केले उघड…

चंद्रपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुरची प्रशंसनिय कामगीरी मागील काही दिवसापासुन चंद्रपुर शहरात घरफोडीचे प्रमाण वाढल्याने अशा गुन्हयांना आळा घालण्याकरिता पोलिस अधिक्षक चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते. या निर्देशानुसार पोलिस निरिक्षक महेश कोंडावार स्थागुशा चंद्रपुर यांनी एक विशेष पथक नेमुन त्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी अनेक दिवसापासुन सापळा रचला होता त्यानुसार. १२/०१/२४ रोंजी गोपनिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोलिस रेकॉर्डवरील
घरफोडीचा गुन्हेगार  आशिष श्रीनिवास रेडडीमल्ला वय २४ वर्ष रा. रयत्तवारी कॉलरी, डिस्पेन्सरी चौक, चंद्रपूर यांने यांनी लालपेठ कॉलरी चंद्रपूर येथील घरफोडी करून तो रयत्तवारी कॉलनी परीसरात संशायास्पद स्थितीत फिरत आहे. अशा माहीतीवरून त्यास ताब्यात घेवुन सखोल व बारकाईने विचारपुस केली असता त्याने श्रीनगर कॉलनी,लालपेठ,चंद्रपूर तसेच बाबुपेठ येथे घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याने दोन्ही ठिकाणी घरफोडी करून चोरी
केलेले





१)सोन्याचा (पिवळया धातुचे) गळयातील नेकलेस, वजन १७.८५० ग्रॅम, कि.६५९५५/- रु



२) कानातील सोन्याचे पिवळया धातुचे ) दोन टॉप्स ३.१२० ग्रॅम कि. ११५००/- असे एकुण २०.९७ ग्राम असा एकुण ७७,४५५/-रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला. वर नमुद आरोपी कडुन (पोस्टे चंद्रपूर शहर येथे



१) अप. कं २८/२४ कलम ४५७, ३८० भादवी तसेच २)अप. क्रं १६/२४ कलम ४५७, ३८० भादवीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. नमुद आरोपी हा उच्चशिक्षीत असुन त्याचेवर यापुर्वी पोस्टे रामनगर येथे घरफोडीचे गुन्हे दाखल आहे.
सदरची कामगीरी  रविंद्रसिंग परदेशी पोलिस अधिक्षक, अप्पर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा, पोउपनि विनोद भुरले, पो.हवा. संजय आतकुलवार, नापोशि संतोष येलपुलवार, पोशि नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, तसेच सायबर पथक यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!