
अवैध वाळु चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
शेगाव (बु.) हद्दीत वाळुची चोरटी वाहतुक करणारे तिन ट्रॅक्टर जप्त करुन,एकुन 15,15,000/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त,स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही….
चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशान्वये चंद्रुपर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा यांना दिले. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक महेश कोंडावार
स्थागुशा, चंद्रपुर यांनी एक पथक नेमुन त्यांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले.


त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांचे एक पथक पो.स्टे. शेगाव येथे पेट्रोलिंग करीत असता दि. 28.04.2024 गोपनिय बातमीदारा कडुन मिळाली की, काही ईसम ट्रॅक्टरनी अवैधरित्या चोरट्या रेतीची वाहतुक वाहनगाव – बोथली परीसरात करणार आहेत अश्या माहीतीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पहाटे 06.30 वा. दरम्यान वाहनगाव – बोथली रोडवर सापळा रचुन तिन वेगवेगळ्या ट्रॅक्टर व ट्रॉली त्यांच्या दिशेने येताना दिसले. तेव्हा त्या तिन्ही ट्रॅक्टरला थांबवुन वरील तिन्ही ट्रॅक्टर व ट्रॉलीची पाहणी केली असता तिन्ही ट्रॅक्टर च्या ट्रॉलीमध्ये अंदाजे तिन ब्रास रेती मिळुन आली. वर नमुद तिन्ही ट्रॅक्टर चे चालकास रेती वाहतुकीचा परवाना
(रॉयल्टी ) बाबत विचारले असता त्याचे जवळ रेती वाहतुकीचा परवाना नसुन त्याने ती रेती मुरपार येथील हत्तीघाट येथुन चोरुन आणुन मौजा बोथली परीसरात विकण्याकरीता घेवुन जात असल्याचे सांगितले.

सदरच्या कारवाईत एकुण 03 ब्रास रेती किं.15,000/- रु. व 03 ट्रॅक्टर किं. 15,00,000/- असा एकुण 15,15,000/- रु. चा मुद्देमाल जप्त करुन चालक 1) सौरभ दत्तु दडमल वय 24 वर्षे रा.खडसंगी ता. चिमुर जि. चंद्रपुर 2) मनोज रमेश वानखेडे वय 34 वर्षे रा. शेडेगाव ता. चिमुर जि. चंद्रपुर 3) बंडु बापुराव चौधरी वय ३९ वर्षे रा. खडसंगी व मालक नामे 4) अनिल ज्ञानेश्वर मेश्राम रा. खडसंगी 5) सचिन ज्ञानेश्वर मेश्राम रा. खडसंगी यांचेविरुध्द पो.स्टे. शेगाव येथे विविध कलमां अंतर्गत गुन्हा नोंद करुन जप्त मुद्देमाल व आरोपी यांना पुढील तपासकामी पो.स्टे. शेगाव यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक. मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोहवा धनराज
करकाडे,स्वामीदास चालेकर, गजानन नागरे, अजय बागेसर, पोशि प्रशांत नागोसे, स्थागुशा चंद्रपुर यांनी सापळा रचुन यशस्वीरीत्या कारवाई केली.



