
चंद्रपुरात एका मोठ्या पक्षाच्या नेत्यास अवैध व्हिडीयो गेम पार्लर चालवतांना अटक…
चंद्रपुर- जिल्ह्यात विविध अवैध धंदे करणारे तस्कर असून यात बऱ्याच राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. पक्षाच्या पदाच्या नावाखाली दबाव तयार करून खुलेआम काळे धंदे केले जात आहेत. अशाच एका प्रकरणात मोठ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला
चंद्रपूरच्या रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. सपना
टॉकीज परिसरात तो व्हिडिओ पार्लरच्या नावाखाली लाखो
रुपयांचा जुगार चालवीत होता. या नेत्यावर कार्यवाही
झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
सदर नेता हा चंद्रपुरच्या असंघटित कामगार सेलचा नेता आहे.
संपूर्ण राज्यात जुगारावर बंदी आहे. मात्र, आडमार्गाने हा धंदा
सुरू आहे. आता तर खुलेआम जुगार खेळला जात आहे.
यासाठी मनोरंजनाचे माध्यम म्हणून व्हिडिओ पार्लरचा वापर
केल्या जात आहे. व्हिडिओ गेमच्या माध्यमातून मनोरंजनाचा
खेळ म्हणून शासनाने परवानगी दिली. पण या माध्यमातून
लाखो रुपयांचा जुगार खेळला जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात असे
१५ पेक्षा अधिक व्हिडिओ गेम पार्लर आहेत. यातील काही ठिकाणी पार्लरच्या नावाखाली क्वाईनच्या माध्यमातून लाखो रुपयांचा जुगार खुलेआम सुरू होता. दरम्यान, रामनगर पोलिसांनी त्यांची तपासणी करण्याची मोहीम राबविली. सदर नेता हा एका मोठ्या पक्षाच्या असंघटित कामगार सेलचा नेता आहे. त्याचे सपना टॉकीज परिसरात व्हिडिओ गेम पार्लर आहे. रामनगर पोलिसांनी त्याच्या गेम पार्लरची तपासणी करून त्याला अटक केली. नंतर जामिनावर त्याची सुटका करण्यात आली. या नेत्यावर कारवाई झाल्याने
चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय राजकीय वर्तुळात खळबळ
उडाली आहे.
शहरात व्हिडिओ गेम खेळणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या
माध्यमातून अनेक जण कंगाल झाले आहेत. अनेकांचे संसार
उद्ध्वस्त झाले असून, काहींनी आपले जीवनही संपविले आहे.
सामान्य माणसांपासून तर विद्यार्थी, श्रीमंत व्यक्तीही यांना गेम
खेळण्याची लत लागली आहे. रामनगर पोलिसांनी कार्यवाहीत
सातत्य ठेवले, तर या जुगारावर बऱ्याच प्रमाणात अंकुश लागू
शकतो.
व्हिडिओ गेमच्या माध्यमातून ग्राहकांना क्वाईन दिल्या
जातात. या माध्यमातून मग जुगार लावला जातो. जुगार सुरू
असताना मशिनमध्ये सेटिंग करून ठेवल्यामुळे रक्कम
जिंकणाऱ्यांची संख्या फार कमी असते. विशेषतः जास्तीत जास्त
गेम खेळणाऱ्यांना आर्थिक फटकाच बसतो. या गेममुळे
हजारोंच्या संख्येने जुगार खेळणारे कंगाल होत असताना
पार्लरचे मालक असणारे मात्र मालामाल होत आहेत. या
कारवाईने या जुगाराला आळा बसेल, अशी अपेक्षा सामान्य
नागरिक व्यक्त करीत आहे.


