फिल्मीस्टाईल ३ तास पाठलाग केला आणि शेवटी लागलाच पोलिसांच्या गळाला…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

छत्रपती संभाजीनगर – सवीस्तर व्रुत्त असे की कुख्यात गुन्हेगार असलेल्या मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवत लहान भावानेही शनिवारी रात्री वेगवेगळे बार, देशी दारूच्या दुकानावर जाऊन गावठी पिस्टलच्या साहाय्याने दहशत निर्माण केली. ही माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलिसांनी मुसळधार पावसात अट्टल गुन्हेगाराचा तीन तास पाठलाग केला. गुन्हेगार सतत गुंगारा
देत फिरत होता. शेवटी त्यास पकडण्यात यश मिळाले. त्याच्याकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांनी
दिली. गुड्डु उर्फ मॅक्स उर्फ शेख जुबेर शेख मकसूद (३७, रा.
विजयनगर) असे गावठी कट्ट्यासह पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. पुंडलिकनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुड्डु उर्फ मॅक्स हा घातपात करण्याच्या उद्देशाने स्वत:जवळ पिस्टल बाळगून परिसरात दहशत निर्माण करीत असल्याची माहिती निरीक्षक आडे यांना समजली. तेव्हा त्यांनी उपनिरीक्षक आनंद बनसोडे, संदीप काळे यांच्या पथकास आरोपीचा शोध घेण्यास पाठविले. मात्र, अट्टल आरोपी पोलिसांनी हुलकावणी देत होता. तेव्हा निरीक्षक आडे
यांच्यासह सहायक निरीक्षक शेषराव खटाणे यांनीही आरोपीचा शोध सुरू केला. मुसळधार पावसात आरोपी सतत हुलकावणी देत होता. पोलिस त्याचा पाठलाग करीत होते. शेवटी आरोपी घरी पोहोचल्याचे समजताच पोलिसांच्या पथकाने घरावर छापा मारला. तेथे पोलिसांनी गुड्डुच्या  त्याच्याकडे देशी बनावटीचे गावठी पिस्टल, एक जिवंत काडतुसासह बुलेट, मोबाइल आढळले. पोलिस नाईक
जालिंदर मान्टे यांच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.

सदरची कारवाई पोलिस निरीक्षक राजश्री आडे, सपोनि खटाणे, उपनिरीक्षक बनसोडे, काळे, सहायक फौजदार व्ही. व्ही. मुंढे, पोलिस नाईक गणेश डोईफोडे, दीपक देशमुख, कल्याण निकम, संदीप बिडकर, प्रशांत नरवडे आदींनी केली.
सध्या सर्वत्र गणेशोत्सव सुरू आहे. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात लावण्यात आला आहे. त्यातच आरोपी गुड्डु हा गावठी पिस्टल घेऊन वेगवेगळ्या बिअरबार, देशी दारूच्या दुकानांवर जाऊन दहशत निर्माण करीत होता. ऐन गणेशोत्सवात पोलिसांच्या खबरदारीमुळे मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान, आरोपीचा मोठा भाऊ कुख्यात गुंड टिप्या सध्या दोन गुन्ह्यात फरार आहे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!