छुप्या मार्गाने चालणार्या कुंटनखाण्यावर SDPO च्या पथकाने टाकला छापा,५ महिलांची केली सुटका…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

हॉटेल गॅलेक्सी मध्ये छुप्या मार्गाने चालणा-या कुंटनखान्यावर पोलीसांचा छापा, 05 आंतरराज्यीय पिडीताची सुटका ,उपविभागीय पोलिस अधिकारी, छत्रपतीसंभाजीनगर ग्रामीण यांची कारवाई…..

छत्रपती संभाजी नगर(प्रतिनिधी) याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारे शिवजयंती निवडनुक याच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मनीष कलवानिया यांनी सर्व प्रकारचे अवैध धंदे यांवर कडक कार्यवाही तथा निर्बंध लावण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व प्रभारी यांना देण्यात आले होते त्याअनुषंगाने उपविभागिय पोलिस अधिकारी,छत्रपती संभाजीनगर ग्रामीण उपविभाग श्रीमती पुजा नागरे यांना गोपनीय माहीती की,पोलिस ठाणे चिकलठाणा हद्दीत असलेल्या सुंदरवाडी शिवारातील हॉटेल गॅलेक्सी या ठिकाणी हॉटेल मालक व मॅनेजर हे स्वत:चे आर्थिक फायद्या करिता बाहेर राज्यातील रहिवाशी असलेल्या महिलांचे आर्थिक परिस्थितीचा तसेच त्यांचे अशिक्षीतपणाचा व असहाय्यतेचा गैरफायदा घेवुन दुसर्या राज्यात राहणा-या महिलांकडुन वेश्याव्यवसाय करून घेत आहे.





सदर मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने मनीष कलवानिया, पोलिस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली  श्रीमती पुजा नागरे, उपविभागीय पोलिस अधिकारी, व सपोनि आरती जाधव अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथक (AHTU) यांचे पथकांने दिनांक 05/02/2024 रोजी हॉटेल गॅलेक्सी च्या परिसरात सापळा लावुन एका डमी ग्राहकांस हॉटेल गॅलेक्सी येथे पाठवले असता तेथे हॉटेल मालक संदीप खाजेकर याला डमी ग्राहक भेटला असता. त्यांने तुम्हाला जे पाहिजे ते मॅनेजर भावेश जाधव हे देतील असे सांगुन तेथील नौकर जब्बार शेख याला डमी ग्राहक याची भेट हॉटेल मॅनेजर जाधव यांचेशी घालुन देण्याचे सांगितले. यावरुन डमी ग्राहक हा हॉटेल मॅनजेर भावेश जाधव याला भेटला असता मॅनेजर यांने ग्राहकाला तुम्हाला जे पाहिजे ते भेटेल त्या करिता तुम्ही हॉटेल च्या पहिल्या मजल्यावरिल रूम नं 101 जा असे सांगितले. यावरुन तेथे अवैधरित्या वेश्याव्यवसाय करून घेताला जातो आहे. याबाबत पथकांची खात्री झाल्याने पथकाने डमी ग्राहकांस रूम मध्ये गेल्यावर ईशारा करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
यावरून डमी ग्राहक हा हॉटेल गॅलेक्सीच्या पहिल्या मजल्यावरिल रूम नं 101 मध्ये जावुन थांबला असता तेथे मॅनेजर हा एक महिलेला घेवुन आला असता डमी ग्राहकांने लपुन बसलेल्या पथकाला ईशारा करताच पथकांने छापा मारून पिडीत महिला हिची सुटका केली. याचप्रमाणे हॉटेलच्या इतर खोल्याची झडती घेतली असता तेथील इतर खोल्यात लपवुन ठेवलेल्या 04 आंतरराज्यीय महिला मिळुन आल्याने यांची चौकशी केली असता. यामध्ये पटना (बिहार) येथील 01 पिडीता, सुरत व अहमदाबाद (गुजरात) येथील 02 पिडिता तसेच पश्चिम बंगाल येथील 02 पिडीत महिला यांना हॉटेल कामाचे आमिष दाखवुन त्यांचे अशिक्षीतपणाचा तसेच आर्थिक असहाय्यतेचा गैर फायदा घेवुन त्यांचकडुन अवैधरित्या देहव्यापार करुन घेतला जात होता. यावेळी पथकाने 05 आंतरराज्यात राहणा-या महिलांची सुटका केली आहे.
तसेच आरोपी



1) संदीप भिकाजी खाजेकर वय 26 वर्षे, हॉटेल मालक रा. सिध्दनाथ वडगाव ता. गंगापुर ह.मु. हॉटेल गॅलेक्सी, सुंदरवाडी शिवार. छत्रपती संभाजीनगर



2) भावेष प्रविण जाधव वय 20 वर्षे हॉटेल मॅनेजर रा. रामनगर, हर्सुल टि पाँईट छ. संभाजीनगर

3) जब्बार निजाम शेख वय 26 वर्षे वेटर, रा.शिंगी ता. गंगापुर छ.संभाजीनगर यांचे विरुध्द कलम 3,4,5, अनैतिक देह व्यापार अधिनियम 1956 प्रमाणे पोस्टे चिकलठाणा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी मोबाईल फोन, निरोध पाकिट असा एकुण 78,760/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही. मनिष कलवानिया, पोलिस अधीक्षक,सुनिल कृष्णा लांजेवार, अपर पोलिस अधीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती पुजा नागरे,उपविभागीय पोलिस अधिकारी, श्रीमती आरती जाधव, सपोनि, पोलिस अंमलदार कपिल बनकर,मंजुषा हातकंगणे, सपना चरवंडे, ईशाद पठाण यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!