चिकलठाणा पोलिसांनी अवैध शस्त्र धारकाच्या आवळल्या मुसक्या…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुस सोबत बाळगणारा सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून केला जेरबंद…

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण (प्रतिनिधी)- सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया यांचे निर्देशानुसार दिनांक १०/१२ / २०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे मोटरसायकल चोरीचे गुन्हयांचे तपासात करमाड व चिकलठाणा परिसरात असतांना पोउपनि विजय जाधव यांना गोपनीय बातमीदारमार्फेत माहिती मिळाली कि,पोलिस ठाणे चिकलठाणा हद्दीतील सुंदरवाडी शिवारातील हॉटेल मानव येथे एक ईसम हा येणार असुन त्याचे जवळ गावठी कट्टा व जिवंत काडतुस (राऊंड) आहेत अशी माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोउपनि विजय जाधव व त्यांचे पथकांने हॉटेल मानव परिसरात सापळा लावुन लपुन बसले. यावेळी मिळालेला वर्णनाचा ईसम हा हॉटेल मानव येथे आल्यानंतर पोलिसांनी त्याचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून त्यास बेसावध असतांना अचानक त्यांचेवर झडप घालुन त्यास ताब्यात घेतले. यावेळी त्याला विश्वासात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव





ज्ञानेश्वर उर्फे माऊली अंगत पवार वय ३४ वर्षे रा. रामगव्हाण, ता. अंबड जि. जालना



असे सांगितले यावेळी त्याच्या हातातील काळया बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये एक काळ्या रंगाचा गावठी कट्टा व
तीन जिवंत काडतुस (राऊंड ) अवैधरित्या विनापरवाना जवळ बाळगतांना मिळुन आला आहे.गावठी कट्टा व काडतुस जप्त करण्यात आली आहेत. नमुद आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन
त्याचेवर जबरी चोरी, लुटमार, घरफोडी, प्राणघात हल्ला करणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.त्याचे विरुध्द पोलिस ठाणे चिकलठाणा येथे कलम ३,२७ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा
दाखल करण्यात आला असून पुढील तपास चिकलठाणा पोलिस करित आहेत.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया,अपर  पोलिस अधीक्षक, सुनिल कृष्णा लांजेवार, यांचे मार्गदर्शनाखाली  सतिष वाघ, पोलिस निरीक्षक, स्थागुशा,विजय जाधव, पो.उप.नि. पोलिस अंमलदार लहु थोटे, श्रीमंत भालेराव, नरेंद्र खंदारे, विजय धुमाळ, गणेश सोनवणे, योगेश तरमळे, जिवन घोलप यांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!