गंगापुर पोलिस एका गुन्ह्याची उकल करुन परत येतांना दुसरा गुन्हाही केला उघड…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

कामगाराला चाकुचा धाक दाखवुन जबरदस्तीने लुटणारे दोघे 24 तासात गजाआड तसेच नमुद गुन्ह्यातील आरोपींसह पोलिस स्टेशनला येत असतांना योगायोगाने वाळुज पोलिस स्टेशन हद्दीत घडलेल्या मोटारसायकल चोरीचा गुन्हाही केला उघड…

गंगाखेड(छत्रपती संभाजी नगर) प्रतिनिधी –  याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस ठाणे गंगापुर येथे दिनांक १८/०१/२०२४ रोजी तक्रारदार दिनेश रुमसिंग कश्यप वय ३४ वर्षे रा. पिपलीया
गई, ता. सेंधवा जि. बडवाणी (मध्यप्रदेश) ह.मु. भिवधानोरा ता. गंगापुर यांनी तक्रार दिली कि ते भिवधानोरा येथील शेतवस्तीवर शेतमजुर म्हणुन कामाला असुन दिनांक १८/०१/२०२४ रोजी भिवधानोरा येथील आठवडी बाजार असल्याने सायंकाळी ०६:३० वाजेच्या सुमारास बाजार करण्यासाठी गेले असता ,यावेळी मालकाने त्यांचा पगार म्हणुन त्यांना २०,००० रुपये दिलेले त्यांचे जवळच होते. रात्री ०८:०० वाजेच्या सुमारास बराच अंधार झालेला असल्याने बाजार करून शेतवस्तीवर परत जात असतांना भिवधानोरा गावाचे अलिकडे दोन व्यक्ती या भरधाव वेगात त्यांच्याजवळ आले व त्यांच्या हाताला धरून बळजबरीने ओढत शेतात नेले, बराच आरडा ओरड करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या व्यक्तींनी त्याच्या जवळ असलेला चाकुचा धाक दाखवुन जिवे मारण्याची धमकी देवुन बाजार करून उरलेले  १५,००० रूपये रोख व मोबाईल फोन असा एकुण २६,०००/- रुपये किंमतीचा माल बळजबरीने चोरून नेला. या तक्रारीवरून पोलिस ठाणे गंगापुर येथे
दिनांक १९/०१/२०२४ रोजी कलम ३९४ भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मनिष कलवानिया, पोलिस अधीक्षक यांचे सुचना नुसार नमुद गुन्हयाचा तपास पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले हे
करिता असतांना त्यांना गोपनीय बातमीदाराकडुन माहिती मिळाली कि नमुद गुन्हा हा भिवधानोरा व पखोरा येथील राहणारे दोन व्यक्तींनी केला आहे. यावरून गंगापुर पोलिसांची दोन वेगवेगळी पथके तयार करून पो.नि. ताईतवाले यांचे पथकांने
पखोरा येथील शेतवस्तीवर संशयीत ईसमाचा शोध घेतला असता तो एका पडित गायरान जमिनीतील झाडाचे आडोशाला
लपुन बसला होता. पोलीसांनी शेताच्या परिसरात सापळा लावुन अत्यंत शिताफिने हालचाल न होवु देता आरोपी हा गाफिल
असतांना त्याचेवर अचानक झडप घालुन त्याला ताब्यात घेतले यावेळी त्याला त्याचे नाव गाव विचारता त्यांने त्याचे नाव
सागर अशोक जाधव वय २२ वर्षे रा. पाखोरा ता. गंगापुर असे सांगितले यावेळी त्याला गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस करता
तो पोलिसांना उडवा उडवीचे उत्तरे देवुन लागल्याने त्याचेवर अधिक संशय बळावल्याने त्यास विश्वासात घेवून विचारपुस करता त्यांने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार  रामेश्वर बाळासाहेब चव्हाण यांचे सोबतीने केल्याचे कबुल केले. यावरून लगेच  प्रमोद काळे, पोउपनि यांचे पथकांने मिळालेल्या माहितीच्या आधारे भिवधानोरा येथील स्मशान भुमीच्या परिसरात लपुन बसलेल्या दुसरा आरोपीच्या अत्यंत शिताफिने मुसक्या आवळुन त्यांना जेरबंद केले आहे. त्यांचे ताब्यातुन गुन्हयातील ३००० /- रुपये रोख व मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. व नमुद गुन्हयात





१) सागर अशोक जाधव वय २२ वर्षे रा. पाखोरा ता. गंगापुर



२) रामेश्वर बाळासाहेब चव्हाण वय ३० वर्षे रा. भिवधानोरा



यांना अटक करण्यात आली असुन

पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले हे पखोरा येथील आरोपीला पो.स्टे. गंगापुर येथे घेवुन जात असतांना मोटरसायकल वरिल एक ईसम हा पोलिसांना बघुन अत्यंत भरधाव वेगात सुसाट निघाला यावेळी त्याचेवर संशय बळावल्याने त्याचा ०१ किमी पेक्षा अधिक पाठलाग करून त्यास पखोरा येथील पारधी वस्तीजवळ थांबवुन विचारपुस करता तो पोलिसांना घाबरुन उडवा-उडवीचे उत्तरे देवु लागल्याने त्याची कसोशिने विचारपुस करता त्यांने त्याचे नाव सुरेश वाल्मिक घाणे वय २५ वर्षे रा. शहापुर घोडेगाव असे सांगुन तो चालवित असलेली मोटरसायकल स्प्लेंडर प्लस काळ्या रंगाची क्रमांक एम. एच. २० डी.पी. ७४०४ ही त्याने बकलवालनगर, वाळुज, छत्रपती संभाजीनगर येथुन दिनांक ५ / ७ / २०२० रोजी चोरी केल्याचे कबुल केले आहे. यावरून गंगापूर पोलिसांचे सतर्कतेमुळे पो.स्टे. वाळुज, छत्रपती संभाजीनगर येथील गुरनं १०७ / २०२० कलम ३७९ भादंवी हा सुध्दा उघडकीस आणला असुन नमुद गुन्हयातील चोरी गेलेली मोटरसायकल स्प्लेंडर प्लस क्रमांक
एम. एच. २० डी. पी. ७४०४ ही जप्त करण्यात आरोपी सुरेश वाल्मिक घाणे वय २५ वर्षे रा. शहापुर घोडेगाव यास नमुद
गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदरची  कारवाई ही मनिष कलवानिया, पोलिस अधीक्षक, सुनिल कृष्णा लांजेवार, अपर पोलिस अधीक्षक,जयदत्त भवर, उपविभागीय पोलिस अधिकारी चार्ज गंगापुर यांचे मार्गदर्शनाखाली सत्यजीत ताईतवाले पोलिस  निरीक्षक  प्रमोद काळे, पो.उप.नि. पोलिस अंमलदार संदीप राठोड, राहुल वडमारे, संदीप गायकवाड, अजित नागलोद यांनी केली आहे





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!