सराईत गुन्हेगार राहुल पवार यास छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी MPDA कायद्यान्वये केले स्थानबध्द…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

वृध्द महिलांना गाडीवर सोडण्याचा बहाना करुन लुटणारा सराईत गुन्हेगार एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षासाठी हर्सुल कारागृहात स्थानबध्द, पोलिसांवर हल्ला करून पसार होण्याचा डाव मोडीत काढत शिताफिने पकडुन केले जेरबंद …

छत्रपती संभाजी नगर(प्रतिनिधी) – याबबत सवीस्तर व्रुत्त असे की, मनीष कलवानिया, पोलिस अधीक्षक,छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी जिल्हयातील संघटित गुन्हेगारीला लगाम लावत अशा गुन्हेगाराविरूध्द कठोर भुमिका घेत त्यांच्या मुसक्या आवळणे सुरू केले आहे.त्यानुसार जिल्हयातील वयोवृध्द महिलांना लुटणारा सराईत आरोपी एम.पी.डी.ए.कायद्याखाली  हर्सुल कारागृहात एक वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले आहे.





पोलिस ठाणे वडोदबाजार हद्यीतील ईसम राहुल कडूबा पवार वय 30 वर्षे रा. बाबरा ता. फुलंबी जि. छत्रपती संभाजीनगर, ह.मु. कुंभेफळ, ता +जि –  छत्रपती संभाजीनगर (पो.स्टे. करमाड हद्द.) यांचे विरूध्द पोलिस ठाणे निहाय खालील भादंवी कलमान्वये गंभीर गुन्हे दाखल आहेत.



अ) पो.स्टे. करमाड (04 गुन्हे ) कलम 392 भा.दं.वी
ब) खुलताबाद (02 गुन्हे ) कलम 392 भा.दं.वी
क) फुलंब्री व चिकलठाणा व एम. सिडको (शहर) असे ( प्रत्येकी 01 गुन्हा याप्रमाणे 03 गुन्हे ) कलम 392 भा.दं.वी
ड) करमाड व चिकलठाणा (प्रत्येक 01 गुन्हा असे 02 गुन्हे ) कलम 394 भा.दं.वी
ई) वडोदबाजार (01 गुन्हा) कलम 341, 506 भा.दं.वी) असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.



यामध्ये प्रामुख्याने तो ग्रामीण भागात गावाकडे जाणा-या वयोवृध्द व अशिक्षित महिला असे सावाज रोडवर एकट्यात हेरून त्यांना गोड बोलुन विश्वासत घेवुन त्यांना त्याचे मोटरसायकलवर गावी किंवा घरी नेऊण सोडण्याचा बाहणा करुन त्याचे मोटरसायकलवर बसवूण महिलांना निर्जनस्थळी नेऊन मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देवुन जबरदस्तीने त्यांचे दागिने, रोखरक्कम हिसकावुन घेवुन त्यांना तिथेच सोडुन पसार होत होता. याचप्रमाणे नागरिकांना रस्त्यात अडवुन त्यांना धमकावुन पैसे मागायचा, यावेळी त्याला प्रतिकार केला तर मारहाण करून शिवागाळ करायचा अशा कृत्यामुळे सामान्य जनतेमध्ये दहशतीचे वातारण निर्माण झाले आहे. अशा प्रकारे शरिराविरूध्द व मालाविरूध्दचे एकुण 12 गुन्हे त्याचेवर दाखल आहेत.

त्याच्या गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी त्याचेविरूध्द वेळोवेळी प्रतिबंधित  कारवाई सुध्दा करण्यात आली होती. परंतु याबाबीचा त्याच्येवर काहि एक परिणाम न होता त्याने त्याच्या गुन्हेगारी व धोकादायक कारवाई चढत्या क्रमाने चालुच ठेवलेल्या होत्या.
त्याअनुषंगाने एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस ॲक्टिविटी) कायद्यानुसार म्हणजे महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, धोाकदायक व्यक्ती, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, वाळु तस्कर, व अत्यावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे, दृक श्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणारे (व्हिडीओ पायरेसी) असे विद्यातक कृत्य करणा-या व्यक्तींना आळा घालण्याबाबत एम.पी.डी.ए. कायद्यान्वये त्याचे गुन्हेगारी व धोकादायक कृत्यांना प्रतिबंध करणे आवश्यक होते. त्यामुळे  मनीष कलवानिया, पोलिस अधीक्षक यांचे सुचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व करमाड पोलिसांनी त्याचे विरुध्द एम.पी.डी.ए कायद्यान्वये कारवाईसाठी प्रस्ताव तयार करून मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी,छत्रपती संभाजीनगर यांचे कडे सादर करण्यात आला होता. यावरून आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक 18/12/2023 रोजी राहुल कडुबा पवार वय 30 वर्षे रा. बाबरा याचे विरूध्द एम.पी.डी.ए अधिनियम 1981 ( 1981 महाराष्ट्राचा 55 वा कायदा) चे कलम 3 पोटकलम (1) अन्वये स्थानबध्दतेचा आदेश पारित केला होता.याबाबत आरोपीस माहिती मिळाल्यापासुन तो जिल्हयातुन पसार झाला होता. पोलिस त्याच्या ठाव – ठिकाणाचा शोध घेत होते, परंतु तो पोलिसांना गुंगारा देवुन त्याची वास्तव्याची ठिकाणे तो सारखी बदलत होता. पंरतु पोलिस त्याचे मागावर राहुन त्याचा कसोशिने शोध घेत असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला तो त्याचे बाबरा शिवारातील शेत वस्तीवरील घरी येवुन लपून बसला असल्याबाबत गोपनीय माहित मिळाली. यावरून पथकांने दिनांक 18/01/2024 रोजी दुपारी 1.00 वाजेच्या सुमारास स्थानिक पोलिस स्टेशनच्या मदतीने त्याचे घरा जवळ सापळा लावला असता आरोपी हा त्याचे घराचे ओटयावर बसलेला होता. त्यास पोलिसांची चाहुल लागताच तो सुसाट पळुन जाण्याचे तयारीत असतांना पोलिसांनी त्याचेवर झडप घातली व त्यास स्थानबध्दते बाबतच्या आदेशाची माहिती सांगुन त्याला ताब्यात घेत असतांना त्याच्यासह कुटूंबातील 03 महिला व भाऊ असे एकुण 05 जणांनी पोलिसांना जोरदार विरोध करून त्यांचेवर जिवघेणा दगडाने घातक हल्ला चढविला. तसेच पोलीसांचे ताब्यातील आरोपी हा पळुन जाण्यास यशस्वी व्हावा या हेतुने ते पोलिसांशी तीव्र झटापट करू लागले. ज्यामध्ये पोलिस सुध्दा जखमी झाले. तरीही पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने त्याचेसह त्याचे कुटूंबाचा तिव्र प्रतिकार मोडीत काढत आरोपीस शिताफिने ताब्यात घेवुन त्याला एम.पी.डी.ए अधिनियम 1981 (1981महाराष्ट्राचा 55 वा कायदा) चे कलम 3 पोटकलम (1) अन्वये स्थानबध्दतेचा आदेश पारित करुन त्यास काल दिनांक 18/01/2024 रोजी जिल्हा मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे एक वर्षाकरिता स्थानबध्द करण्यात आले आहे.त्याचप्रमाणे यातील आरोपी यास ताब्यात घेत असतांना पोलिसांचे सरकारी कामात अडथळा निर्माण करून त्यांचेवर जिवघेणा हल्ला करणे, मारहाण, धक्काबुक्की, शिवीगाळ, याबद्दल

1) राहुल कडूबा पवार वय 30 वर्षे

2) रोहीत कडूबा पवार वय 24 वर्षे

3) चंद्रकला कडूबा पवार वय 50 वर्षे

4) सोनाली वाल्मीक जंजाळ वय 31 वर्षे

5) अनिता भ्र.राहुल पवार वय 25 वर्षे सर्व रा. बाबरा ता. फुलंब्री यांचे विरूध्द कलम 307,353, 332 ,336 ,323 ,143 ,147, 148 ,149,504,506 भादंवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास वडोदबाजार पोलिस करित आहेत.

सदरची कार्यवाही ही  मनिष कलवानिया, पोलिस अधीक्षक, सुनिल कृष्णा लांजेवार, अपर पोलिस अधीक्षक, जयदत्त भवर, उपविभागीय पोलिस अधिकारी, यांचे मार्गदर्शनाखाली  सतिश वाघ, पोलिस निरीक्षक,  प्रताप नवघिरे, सपोनि,(करमाड)  सुनिल इंगळे, सपोनि (वडोदबाजार), विजय जाधव, पो.उप.नि. (स्थागुशा), दादासाहेब बनसोडे, पोउपनि, करमाड पोलिस अंमलदार लहु थोटे, श्रीमंत भालेराव, विजय धुमाळ,जनाबाई चव्हाण, संतोष डमाळे, शंकर चव्हाण, निवृत्ती मदणे, शैलेश गोरे, सिध्दांत वक्ते, दादाराव पवार, जयसिंग नागलोद,सुनिल गोरे, शकुल बनकर, संतोष टिमकिकर, यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!