
गांजाची चोरटी वाहतुक करणारा गंगापुर पोलिसांचे ताब्यात…
गांजाची चोरटी तस्करी करणाऱ्यास गंगापुर पोलिसांनी शिताफीने केले जेरबंद,२८ किलो गांजा केला जप्त….
गंगापुर(छ.संभाजीनगर) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२८) रोजी पोलिस ठाणे गंगापुर येथील पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांना गोपनीय बातमीदारमार्फेत माहिती मिळाली कि, अहमदनगर- छ. संभाजीनगर हायवेवरुन एक व्यक्ती हा गांजा या अंमलीपदार्थाची चोरटी वाहतुक विक्री करण्याचे उद्देशाने छुप्यामार्गाने घेवुन जाणार आहे.यावरुन मनिष कलवानिया , पोलिस अधीक्षक यांचे मार्गदर्शनानुसार पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले व त्यांचे पथकाने ढोरेगाव शिवारातील महाराष्ट्र हायवे ढाबा परिसरात सापळा लावला. बातमी मिळालेल्या वाहनावर पथकातील पोलिस बारकाईने लक्ष ठेवून असतांना अहमदनगरच्या दिशेकडुन त्यांना एक ईसम हा त्याचे सुझुकी अॅक्सेस मोपेड क्रमांक एम. एच. १६ ए. एस. ८७ यावर पथकाचे दिशने येतांना दिसला. त्याने त्याचे पाठीमागील सिटवर एक मोठी पांढ-या रंगाची प्लास्टीकचे पोते बांधलेले असल्याने त्याचेवर पथकाचा संशय बळावल्याने त्यास पुढे जावुन पथकातील पोलिसांनी थांबण्याचा ईशारा करून त्याला सुरक्षितपणे रोडच्या बाजुला घेतले. यावेळी त्याला त्याचे नाव गाव विचारता त्यांने त्याचे नाव राहुल राजेश जाधव वय ३८ वर्षे रा. पिंपळवाडी रोड, शिर्डी ता. राहता जि. अहमदनगर असे सांगितले. त्यास विश्वासात घेवुन गाडीवरील पोत्याबाबत विचारणा केली असता त्यामध्ये कुकूट पालनातील कोबडयांचे खाद्य घेवून जात असल्याची तो बतावणी करून लागला परंतु पोत्याचा उग्र वास येत असल्याने त्याची अधिक कसोशिने विचारपुस करता तो पोलिसांना उडवा-उडवीचे उत्तरे देवु लागल्याने त्याचेवर अधिक संशय बळावल्याने त्याचे गाडीवरील पोते उघडुन त्याची पाहणी केली असता, त्यामध्ये ०५ कागदाचे गठ्ठेमध्ये गांजा भरून ते खाकी चिकटपटी लावुन बंद केलेले ज्यात एका मध्ये १ किलो गांजा तर बाकी ०४ पाकिट मध्ये अंदाजे २ किलो गांजा प्रत्येकी तसेच पोत्यात खालच्या बाजुला गांजा सदृष्य वनस्पतीची पाने, ज्याचे वजन १९ किलो ५० ग्रॅम असा एकुण २८ किलो १५० ग्रॅम गांजा चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने वाहतुक करतांना पोलिसांना मिळुन आला आहे.
यावरून आरोपी नामे राहुल राजेश जाधव वय ३८ वर्षे रा.पिंपळवाडी रोड, शिर्डी ता. राहता जि. अहमदनगर यास गंगापुर पोलिसांनी ताब्यात घेवून त्याचे कडुन २८ किलो १५० ग्रॅम गांजा व मोपेड वाहन असा एकुण ४,७२,२५०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन त्याचे विरूध्द पोलिस ठाणे गंगापुर येथे गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ मधील कलम २० (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गंगापुर पोलिस करित आहेत.


सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक, सुनिल कृष्णा लांजेवार, उपविभागिय पोलिस अधिकारी डॉ. सिध्देश्वर भोरे,पैठण, चार्ज गंगापूर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले, पोलिस उपनिरीक्षक अझहर शेख, पोलिस अंमलदार कांचन शेळके, शकील शेख, अमोल कांबळे, विजय नागरे, अभिजीत डहाळे, राहुल वडमारे,
संदिप राठोड, कैलास राठोड, प्रविण प्रधान, भागवत खाडे, रिजवान शेख यांनी केली आहे.



