गावठी कट्ट्यासह एकास स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात…
गावठी कट्ट़ा व जिवंत काडतुस घेवुन फिरणा-या ईसमाला स्थानिक गुन्हे शाखेने शिताफिने केले जेरबंद….
छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 07/03/2024 रोजी स्थागुशाचे पोउपनि विजय जाधव व त्यांचे पथक हे बंदोबस्तावरुन छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने येत असतांना त्यांना गोपनीय बातमीदारा मार्फेत माहिती मिळाली कि, पोलिस ठाणे चिकलठाणा हद्यीतील मौजे शेंद्रा कमंगर भागातील स्वप्निल रेसिडेन्सी च्या परिसरात दोन ईसम हे पायी फिरत असुन त्यातील एकाने त्याचे कमरेला विनापरवाना बेकायदेशरीपणे गावठी कट्टा बाळगुन आहे.
या माहितीच्या आधारे पोउपनि विजय जाधव व त्यांचे पथकाने तात्काळ शेंद्रा कमंगर भागातील स्वप्निल रेसिडेन्सी च्या परिसरात धाव घेवुन संशयीत ईसमांचा कसोशिने शोध सुरू केला. यावेळी मिळालेल्या माहितीच्या वर्णनाचे दोन्ही ईसम हे पायी फिरत असतांना पोलिसांचे नजरेस पडले. त्याचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन ते बेसावध असतांना त्यांचेवर अचानक पोलिसांनी झडप घातली असता, दोन्ही ईसम हे पोलिसांशी जोरदार झटापट करून पळुन जाण्याचा प्रयत्न करून लागले. या झटपटीच्या दरम्यान एक व्यक्ती हा संधीचा फायदा घेवुन पळुन जाण्यात यशस्वी ठरला तर तर दुसरा व्यक्तीला पोलिसांनी कसोशिने पकडुन त्याच्या मुसक्या आवळण्यात यशस्वी झाले.
यावेळी त्याला विश्वासात घेवुन त्याचे नाव, गाव विचारले असता त्याने त्याचे नाव ईश्वर किशोर अहिरे वय 23 वर्षे रा. कुंभेफळ, ता.जि. छत्रपती संभाजीनगर, असे सांगितले. यावेळी त्याची झडती घेतली असता, त्याचे कमरेला त्याने लपवलेली एक काळया रंगाची मुठ असलेली गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस (राऊंड ) अवैधरित्या विनापरवाना जवळ बाळगतांना मिळुन आला आहे. सदर गावठी कट्टा व एक जिवंत काडतुससह त्याला ताब्यात घेवुन त्याचे विरुध्द पोलिस ठाणे चिकलठाणा येथे कलम 3, 25 भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चिकलठाणा पोलिस करीत आहे.
सदरची कामगिरी ही मनिष कलवानिया, पोलिस अधीक्षक, सुनिल कृष्णा लांजेवार, अपर पोलिस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सतिष वाघ, पोलिस निरीक्षक, विजय जाधव पोउपनि पोलिस अंमलदार लहु थोटे, श्रीमंत भालेराव, नरेन्द्र खंदारे, विजय धुमाळ, अख्तर शेख, योगेश तरमाळे यांनी केली आहे.