
पैठण MIDC पोलिसांनी वेशांतर करुन घेतले सराईत दुचाकी चोरट्यास ताब्यात,१५ दुचाकी केल्या हस्तगत…..
सराईत मोटार सायकल चोरट्यास MIDC पैठण पोलासांनी केले जेरबंद,13,70,000/- रूपये किंमतीच्या चोरीच्या 15 मोटारसायकल केल्या जप्त…
पैठण(छ.संभाजीनगर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया यांनी जिल्हयातील वाहन चोरीच्या गुन्हयातील फरार आरोपींचा कसोशीने शोध घेवुन त्यांना जेरबंद करण्याचा सुचना सर्व प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या.
या अनुषंगाने MIDC पैठण पोलिस हे रेकॉर्डवरिल वाहनचोरी गुन्हयातील फरार आरोपी रामेश्वर अकुंश धनगर रा. पिंपळवाडी पिराची ता. पैठण याचा कसोशीने शोध घेत असतांना MIDC पैठण पोलिसांना माहिती मिळाली कि,रामेश्वर धनगर हा जायकवाडी धरणक्षेत्रातील बाभळीच्या झाडात लपुन बसला आहे. यावरून MIDC पैठण पोलिसांचे पथकाने दिनांक 07/04/2024 रोजी रात्रीच्या 10:00 वाजेच्या सुमारस वेशांतर करून जायकवाडी धरण क्षेत्रातील गणेशनगर परिसरातील त्याचे घराचे परिसरात सापळा लावला. आरोपी हा घरातच लपुन असल्याची खातर जमा
पथकाला झाल्यानंतर पोलिस घराचे दिशने पुढे सरकत असतांना आरोपी रामेश्वर धनगर याला पोलिसांची चाहुल लागल्याने त्यांने अंधाराचा फायदा घेत परिसरातील झाडा-झुडपामध्ये जोरात पळत सुटला. पोलिसांनी सुध्दा त्याचा कसोशिने अंधारात जोरदार पाठलाग करून त्याच्या काही अंतरावरच मुसक्या आवळल्या होत्या. यावेळी त्याने पळुन जाण्यासाठी पोलिसांशी झटापट सुरू केली. परंतु पोलिसांनी त्याला शर्थीने दाबुन धरुन ठेवले.
यावेळी त्याला विश्वासात घेवुन चोरींच्या गुन्हयाबाबत विचारपुस करता त्यांने त्याचे साथीदासह आष्टी (बीड),राजणगाव गणपती, शिक्रापुर, (पुणे), जालना, या ठिकाणाहुन मोटरसायकली चोरलेल्या असुन यातील काही मोटरसायकल या नातेवाईकांकडे ठेवलेल्या असुन काही या धरणक्षेत्रातील बाभळीच्या झाडात लपवुन ठेवल्याचे सांगितले.


यावरून पथकाने लागलीच धरणक्षेत्रातील बाभळीच्या झाडात पाहणी केली असता तेथे त्यांना मोटरसायकल लपवुन ठेवलेल्या मिळुन आल्या आहेत. तसेच त्यांना नातेवाईक व इतरांकडे ठेवलेल्या मोटरसायकल सुध्दा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्याचेकडुन 15 दुचाकी वाहने जप्त करण्यात आले आहेत.
यामध्ये अ) रॉयल इनफिल्ड बुलेट (03 नग) व) बजाज पल्सर 220 (03 नग) क) बजाज पल्सर (02 नग )ड) टी. व्ही. एस. स्टार सिटी (01 नग ) इ) हिरो स्प्लेंडर (02 नग ) ई) हिरो फॅशन प्रो (01 नग ) ए) हिरो एच एफ डिलक्स (03 नग) असे वाहने त्याने शिक्रापुर, लोणीकंद, रांजगाव गणपती, बदनापुर, हिंगोली, आष्टी (बीड),
परतुर, मुकुंदवाडी ( छ. संभाजीनगर), वालानगर, चित्तेगाव, पैठण या परिसरातुन चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचे ताब्यातु आतापर्यत 13,70,000/- रुपयांची दुचाकी वाहने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच त्याचे इतर साथीदारांचा सुध्दा पोलिस कसोशिने शोध घेत आहेत.
सदरची कामगिरी ही पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक सुनिल कृष्णा लांजेवार,उपविभागिय पोलिस अधिकारी,पैठण सिध्देश्वर भोरे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि ईश्वर जगदाळे,पोशि संभाजी झिजुर्डे, गणेश खंडागळे, राहुल मोहतमल, राजेश सोनवणे यांनी केली आहे.



