गुटख्याची तस्करी करणारे पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाचे ताब्यात….
पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची अवैध गुटखा विरोधी कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त…
छ्त्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) – जिल्हयातील वाढत्या चोरीच्या गुन्हयांना आणि अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा पोलिस दल चांगलेच ॲक्शन मोड मध्ये आले आहेत, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस अधीक्षक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नाउघड गुन्हयांचा आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. या मध्ये छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी अवैधरित्या गुटखा तत्सम पदार्थ वाहतूक करणाऱ्या आरोपीला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून शिताफीने अटक केली आहे. ज्या मध्ये त्याच्याकडून 12 लाख 60 हजारांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे.
पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया, यांचे निर्देशानुसार जिल्हयातील चोरटया मार्गाने चालणारे अवैध धंदे, अवैध गुटखा साठवण, वाहतूक व विक्री, धाबे व हॉटेलवर देशी विदेशी दारुविक्री, जुगार यांचे विरुध्द पोलिस अधीक्षक यांचे विशेष पथकाद्वारे गोपणीय माहिती काढुन त्यांचेवर छुप्या पध्दतीने सातत्याने धाडी मारुन सक्त कारवाईचा बडगा उगारून अवैध धंदे चालविणारे विरुध्द गुन्हे दाखल करण्यात येत होते.
या अनुषंगाने पोलिस अधीक्षक यांचे मार्गदर्शनानुसार विशेष पथक हे जिल्हयातील अवैध धंद्याबाबत गोपनीय माहिती काढून कारवाई करण्याचे अनुषंगाने (दि.22मार्च) रोजी जिल्हयात गस्त घालत असतांना विशेष पथक प्रमुख यांना गोपनीय माहिती मिळाली कि, जळगाव कडुन सिल्लोडच्या दिशेने एक ग्रे रंगाची इनोव्हा कार क्रमांक एमएच 13 ए.सी. 5052 या मध्ये एक इसम अवैध रित्या गुटखा व तत्सम पदार्थ घेवुन येत आहे. यावरुन पथकाने दि.22मार्च च्या रात्री 20:00 वा.सु. अजिंठा लेणीच्या पायथ्याचे बाजुला असलेल्या हॉटेल राजस्थानी ढाब्याचे परिसरात सापळा लावला असता ब-याच प्रतिक्षेनंतर साधारण 20:45 वाजेच्या दरम्यान माहिती मिळालेल्या वर्णनाची चारचाकी कार वाहन भरधाव वेगाने येतांना पथकाला दिसली, पोलिसांनी संशयीत वाहनास आडवे होवुन थांबविण्याचा ईशारा करुन सदर इनोव्हा कार ही सुरक्षित पणे रस्त्याच्या कडेला घेऊन यातील चालक यास विश्वासात घेवुन नाव गाव विचारता त्यांने त्याचे नाव अनिल भाऊसाहेब भोजने (वय 32 वर्षे) रा.जामखेड, ता.अंबड जि.जालना असे सांगितले त्याच्या वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये पांढ-या व निळया गोण्या व खोके असे मोठ्या प्रमाणावर सामान भरलेले आढळुन आले, त्याबाबत चालकास विचारपुस करता तो पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे देवु लागल्याने त्यास कसोशिने विचारपुस करता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत करण्यात आलेला विमल, राजनिवास आरएमडी, जाफरानी जर्दा, वि-1, रंजनीगंधा यां सारखे गुटख्याचे पुडे असल्याचे सांगितले होते. नमुद वाहनांची पोलिसांनी झडती घेतली असता त्यामध्ये खालील प्रमाणे मुद्देमाल मिळुन आला आहे. ज्या मध्ये एकूण 12,60,460/- रुपयांचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे.
जप्त मुद्देमाल पुढीलप्रमाणे –
1) राजनिवास पान मसाला – 1200 पुडे, किं. 2,30,400/-
2) रंजनीगंधा पान मसाला (हिरव्या रंगाचे) 80 बॉक्स मोठे किं.1,64,160/-
3) रंजनीगंधा पान मसाला (हिरव्या रंगाचे) 40 बॉक्स छोटे किं.58,800/-
4) आर.एमडी 2 बॉक्स किं.7,2000/-
5) विमल पान मसाला 500 पुडे, किं.1,47,700/-
6) जाफरानी जर्दा तंबाखु 1200 पुडे, 57,600/-
7) वि 1 तंबाखु – 600 पुडे किं.14,800
8) इनोव्हा कार (जुनी वापरती) किं. 5,00,000/-
9) मोबाईल फोन किं.15,000/- असा एकूण 12,60,460/- रुपयांचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे.
यातील आरोपी अनिल भाऊसाहेब भोजने (वय 32 वर्षे) रा.जामखेड, ता.अंबड, जि.जालना याने महाराष्ट्र राज्यात शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा व सुगंधीत जर्दा हे स्वतःचे फायद्याकरिता चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने वाहतुक करतांना मिळुन आल्याने यांचे विरुध्द पोलीस ठाणे फर्दापूर येथे भादंवी कलम328 ,272 ,273 ,188 प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन आरोपीस अटक केली आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया यांचे आदेशाने यांचे विशेष पथकातील सहा.पोलिस निरीक्षक सुदाम सिरसाट,पोहवा नवनाथ कोल्हे,नापोशि धापटे,सोनवने यांनी केलेली आहे.