
कत्तलीकरीता जनावरांची वाहतुक करणारे पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाचे ताब्यात…
गोवंशाची अवैध वाहतुक करणारे वाहन विशेष पथकाने पाठलाग करून पकडले 07 जनावरांची सुटका.. 6,45,000/- रू चा मुद्देमाल केला जप्त….
छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया,यांनी जिल्हयातील गोवंशाची चोरटी वाहतुकीस लगाम लावत गोवंश जनावरे चोरणार टोळ्या हद्यपार केल्या आहेत, अवैधरित्या गोवंश कत्तलीच्या घटनांना अत्यंत गांर्भियाने घेवुन असे कृत्य करणारे ईसमाविरुध्द सक्त व कठोर भुमीका घेवुन त्यांचे विरुध्द तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश सर्व प्रभारी अधिकारी यांना देण्यात आले आहेत.


या अनुषंगाने दिनांक 10/04/2024 रोजी मध्यरात्री पोलिस अधीक्षक यांचे विशेष पथकातील अधिकारी च अंमलदार हे पिसादेवी ते सावंगी बायपास रोडवर पेट्रालिंग करत असतांना त्यांना रात्री पावनेदोन वाजेच्या सुमारास एक पिवळ्या रंगाची अशोक लिलॅण्ड पिक अप व्हॅन क्रमांक एम.एच. 20 जी.सी. 1919 ही अत्यंत भरधाव वेगाने नायगाव (सावंगी) कडे जाताना दिसले. वाहनाच्या वेगावरून त्याचेवर संशय आल्याने पथकाने त्यांचा पाठलाग सुरू करून वाहनचालकाला थांबण्याचा ईशारा केला.परंतु पोलिस पाठलाग करत असल्याचा संशय वाहनचालक याला आल्याने त्यांने वाहन न थांबविता त्याचे वाहन अधिक वेगाने नायगावच्या दिशेने सुसाट वेगात पुढे निघाला. त्यामुळे फुलंब्री येथील रात्रगस्तकामी असलेल्या पथकाला नायगाव येथे नाकाबंदी करण्याबाबत सुचना दिल्याने त्यांनी नायगाव फाटा सावंगी बायपास येथे बॅरेकेट लावुन नाकाबंदी केली. परंतु सदर वाहनचालकाने बॅरिकेटसच्या लगतच्या मोकळया जागेतुन वाहन घालुन ते जळगावच्या दिशने घातले पुढे नायगाव च्या अलीकडे रोडच्या कडेला त्यांने वाहन थांबवून अंधारात पळून जात असतांना त्याचे मागावर असलेल्या विशेष पथकाला ते अंधारात वाहन सोडुन पळत असतांना दिसाताच त्यांनी त्यांचा कसोशिने पळत पाठलाग सुरू करून काहि अंतरावरच त्यांना पकडुन ताब्यात घेतले.

यावेळी त्यांना वाहनाबाबत विचारपुस करता ते उडवा उडवीचे उत्तरे देवु लागल्याने त्यांना विश्वासात घेवुन त्यांची नाव गावे विचारता त्यांनी त्याचे नाव 1) डेव्हीड मायकल सेलोराजं वय 19 वर्षे रा. टांगास्टैंड बाजार छावणी, छ. संभाजीनगर 2) मोईन युनूस शेख वय 20 वर्षे रा. पडेगाव, छ. संभाजीनगर असे सांगतले. यावेळी त्याचे वाहनास ताडपत्री लावुन त्यांने बंद केलेले होते. त्याचे वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये काळया, तांबडया व पांढ-या रंगाची गोवंश जातीची 07 जनावरे ही विना परवाना बेकायदेशीररित्या क्षमतेपेक्षा अधिक जास्त दाटीवाटीने त्यांना त्रास होईल अशी कुरतेने वागणुक देवुन त्यांची वाहतुक करतांना दिसुन आले. त्यांना वाहनातील जनावरा बाबत अधिक विचारपुस करता त्यांचेकडे जनावरे खेरीदे करण्याबाबत कोणताही दाखल, मालकीचा पुरावा तसेच जनावरे वाहतुकीचा परवाना सुध्दा नसल्याचे सांगितले. याबाबत त्यांना अधिक कसोशिने विचारपुस करता सदर जनावरे ही त्यांनी नेवासा, जि. अहमदनगर येथुन आणल्याचे सांगुन ते कत्तलीसाठी घेवुन जात असल्याचे सांगितले आहे.

यावरुन 1) डेव्हीड मायकल सेलोराज वय 19 वर्षे रा. टांगास्टँड वाजार छावणी, छ. संभाजीनगर 2) मोईन युनूस शेख वय 20 वर्षे रा. पडेगाव, छ. संभाजीनगर यांना ताब्यात घेण्यात येवुन त्यांचे विरूध्द पोलिस ठाणे फुलंब्री येथे महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 कलम 5 (अ), (1), 5(31) (2), सह कलम प्राण्यांना कुरतेन वागविण्यास प्रतिबंध करणे वावत अधिनियम 1960 चे कलम 11 (1), (च), 11 (1) (ज), व 3/181 मोटर वाहन अधिनयम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यांचे ताब्यातुन 07 गोवंश जातीचे जनावरे किंमत 1,25,000/- अशोक लिलॅण्ड पिकअप वाहन, मोबाईल फोन असा एकुण 6,45,000/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नमुद कारवाई ही पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया यांचे आदेशानुसार त्यांचे विशेष पथकातील स.पो.नि. सुदाम सिरसाठ, पोलीस अंमलदर नवनाथ कोल्हे, रामेधर धापसे, यांनी केली आहे.


