बक-या चोरी करणारी आंतराज्यीय टोळी वडोदबाजार पोलिसांनी केली जेरबंद…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

वडोदबाजार हद्दीतील मौजे पिरबावडा येथील बक-या चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी मुद्देमालासह पोलिस स्टेशन वडोदबाजार कडुन जेरबंद…..

वडोदाबाजार(छ.संभाजीनगर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, फिर्यादी अब्दुल रहेमान अली बाजामान वय – ५५ वर्ष व्यवसाय शेती रा- पिरबावडा ता. फुलंब्री जि. छञपती संभाजीनगर याने पोलिस स्टेशन वडोदबाजार येथे तक्रार दिली की, दि.(५) चे दि.(६) रोजी रात्री ०९.०० ते २०.०० वा चे दरम्यान मौजे पिरबावडा येथील शेत गट नं – २५२ मधुन टिनपत्र्याचे शेड मधुन एकुण ४५ बक-या एकुण किंमत – २,२५,०००/- रु  अज्ञात आरोपी लबाडीच्या
ईराद्याने चोरुन नेला या तक्रारीवरुन दि.(६) रोजी पोलिस स्टेशन
वडोदबाजार येथे गुरन – ५७ / २०२४ कलम ३७९ भादवी प्रमाणे अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता
पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया, अपर पोलिस अधिक्षक सुनील लांजेवार छ. संभाजीनगर ग्रामीण यांनी नमुद गुन्हाचे तपासकामी मार्गदर्शन केल्याने त्यावरुन सहा.पोलिस निरीक्षक सुनिल इंगळे पोलिस स्टेशन वडोदबाजार यांनी तांत्रीक विश्लेषन व गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाल्यावरुन सदरचा गुन्हा नांदेड येथील ईसमांनी केल्याचे निष्पन्न झाले व ते आता येथुन जियागोडान राज्य तेलंगना येथे चोरीच्या गुन्हातील बक-या विक्री साठी जाणार आहे,





अशी बातमी मिळाल्यावरुन सदरची माहिती पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया यांचे आदेशाने गुन्हाचे तपासकामी पोलिस स्टेशन स्तरावर तपास पथक पोउपनि जी.के. कौळासे,एस एम खाडे, सहा. पोउपनि जिवरग,पोहवा शैलेश गोरे,  दत्ताञय मोरे, मुश्ताक पटेल, मदने,  बागल,पोशि वक्ते, यांना तपासकामी रवाना केले. पथकाने बारडगाव जि. नांदेड येथे सापळा रचुन आरोपीस पकडुन वरील आरोपीकडुन एकुण 11,12,000 /- रु मुद्देमाल ज्यात २,५५०००/- रुपयाच्या ५१ बक-या,५७,००० /-रु
मोबाईल, ५,००,००० /- रु महिंद्रा बोलेरो पिकअप एम एच ३८ एक्स ३०२३,व ३,००,०००/- रुपयाची टोयोटा कंम्पनीची ईटीॲास कार क्रमांक एम एच ०३ डी. ई. १६८४ असा वाहनाचा वापर करुन सदर चोरी ही सर्वांनी संगणमत करुन केल्याचे सांगितले आहे. व
त्यांनी त्याचे नावे विचारले असता त्यांनी त्याचे नाव



१) निसार सनातुल्ला मुलतानी वय – ४३ वर्ष रा- पिरबावडा ता फुलंब्री ह. मु पडेगाव अन्सार काँलनी ता. जि. छञपती संभाजीनगर



२) अन्सार शहा सरदार वय – ३६ वर्ष रा सिरजगाव मंडप ता.भोकरदन जि. जालना

३) रईस सरदार शहा वय २० वर्ष रा- सिरजगाव
मंडप ता.भोकरदन जि. जालना

४) दत्तु एकनाथ मुंडकुळे वय ३५ वर्ष शेती रा-खंडाळा पोस्टे
गव्हाली ता.भोकरदन जि. जालना

५)बालाजी बबन डाखुरे वय २३ वर्ष व्यवसाय चालक रा-
पऴसगाव ता.वसमत जि. हिंगोली

६) अनिस शेख मिया वय – ३९ वर्ष रा- पिरबावडा ता. फुलंब्री हे
बारड गाव जि.नांदेड

सांगितले  या वरुन पोलिस स्टेशन वडोद बाजारचे पथकाने त्यांना त्यांचे साथीदारांसह बारडगाव जि. नांदेड व अन्यठिकाणावरुन येथुन ताब्यात घेवुन जोखीम पत्कारुन शिताफीने पकडले आहे.
नमुद गुन्हातील आरोपींकडुन गुन्हातील चोरी गेलेला मुद्देमाल एकुण ५१ बक-या किंमत २,५५,०००/- रुपये व गुन्हात वापरलेले वाहन ५,००,०००/- महिंद्रा बोलेरो पिकअप एम एच ३८ एक्स ३०२३, व ३,००,०००/- रुपयाची टोयोटा कंम्पनीची ईटीॲास कार क्रमांक
एम एच ०३ डी.ई. १६८४,५७००० /- रुपयाचे मोबाईल असा एकुण – ११,१२,०००/- रु मुदेमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस स्टेशन वड़ोदबाजार येथील पोलिस उपनिरीक्षक  गजानन कोंडीबा कौऴासे हे करित आहेत.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक सुनील.लांजेवार छञपती संभाजीनगर ग्रामीण,पुजा नांगरे उपविभागिय पोलीस अधिकारी, छञपती संभाजीनगर ग्रामीण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलिस स्टेशन वडोदबाजार सहा.पोलिस निरीक्षक सुनील इंगळे यांचे सुचनेनुसार पोउपनि जी.के. कौलासे,  एस एम खाडे, सफौ जिवरग, पोहवा  शैलेश गोरे,दत्ताञय मोरे, मुश्ताक पटेल, मदने, बागल, पो.शि
वक्ते सायबर शाखेचे योगेश तरमाळे यांनी केले.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!