पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाने पकडला शहरात येणारा ४ लक्ष रु किंमतीचा गुटखा…
पोलिस अधिक्षकाच्या विशेष पथकांने पाठलाग करून पकडला शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधीत तंबाखु गुटखा,एकुण 13,68,550/- रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त….
छत्रपती संभाजी नगर(प्रतिनिधी) – याबबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया, यांनी जिल्हयातील अवैध धंदे बेकायदेशीरपणे चोरटया रित्या जिल्हयात गुटखा, धाबे व हॉटेल वर देशी /विदेशी दारु विक्री, जुगार यांचे विरुध्द सक्त कारवाईचा बडगा उगारत असे धंदे चालविणारे चालकाविरूध्द छापे मारून त्यांचे विरुध्द गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
याअनुषंगाने पोलिस अधीक्षक यांचे मार्गदर्शनानुसार विशेष पथक हे जिल्हयातील अवैध धंद्यावरती कारवाई करण्याचे अनुषंगाने दिनांक 22/01/2024 रोजी जिल्हयात गस्त घालत असतांना विशेष पथक प्रमुख यांना गोपनीय माहिती मिळाली कि, सोलापुर- धुळे रोडने चितेपिंपळगाव कडुन एक किया कंपनीची सेलटॉस चारचाकी वाहन क्रमांक एम एच -20-एफपी-7277 हि मध्ये एक इसम अवैध रित्या गुटखा व तत्सम पदार्थ घेवुन छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने येत आहे अशी गोपनीय माहिती मिळाली होती.
यावरुन पथकाने सोलापुर कडुन छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणारे निपाणी फाटा येथे रोडवर सापळा लावला. यानंतर माहिती मिळालेल्या वर्णनाची चारचाकी कार वाहन भरधाव वेगाने येतांना पथकाले दिसले, पथकने सदर वाहन चालकास थांबवण्याचा इशारा केला असता त्याने पोलिसांना पाहुन वाहन न थांबविता त्याचे वाहन भरधाव वेगात सुसाट पळविले. यावरुन पोलीसांना संशय अधिक बळावल्याने पथकांने त्याचा कसोशिने पाठलाग सुरू केला. वाहनचालकाला वारंवार पोलिस थांबण्याचा ईशार करत होते परंतु तो पोलीसांचे वाहनाला हुलकावणी देवुन वाहन न थांबविता सुसाट निघाल्याने पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने त्याला गांधेली फाट, जवळ त्याचा वेग कमी होताच त्याला गाडी आडवी लावुन शिताफिने थांबविले.
वाहन थांबविताच पथकांने वाहन चालक यास ताब्यात घेवुन विचारपुस करता त्यांने त्याचे नाव अमोल बिबीशन काळे वय 34 वर्ष रा. गट नंबर 168 प्लॉट नंबर 47 तिसगाव सिडको महानगर-1 छत्रपती संभाजीनगर असे सांगीतले.
वाहना बाबत त्याला विचारपुस करता तो पोलिसांना उडवा-उडवीचे उत्तरे देवु लागल्यने त्याचेवर अधिक संशय बळावल्याने तो चालवत असलेली किया सेलटॉस कार एच-20-एफपी-7277 हीची झडती घेतली असता त्यामध्ये गाडीतील आतील संपूर्ण सिट काढुन त्यामध्ये पांढ-या गोण्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधीत तंबाखु गुटखा खालील वर्णनाचा गुटखा 36 गोण्यामध्ये भरलेला मिळुन आला आहे.
1) 1,22,850/- रुपये- एकुण 18 पांढऱ्या रंगाच्या गोण्या, प्रत्येक गोणीमध्ये 105 पुडे, असे एकुण 1890 पुडे, त्यावर रॉयल 717 तंबाखु असे लिहीलेले आहेत.
.
2) 2,45,700-00 रुपये एकुण 18 पांढऱ्या- तपकिरी रंगाच्या गोण्या, प्रत्येक गोणीमध्ये 105 पुडे, असे एकुण 1890 पुडे, त्यावर हिरा पान मसाला असे लिहीलेले आहेत.
3) 10,00,000-00 एक पांढऱ्या रंगाची चारचाकी कार किया कंपनीची सेलटॉस जिचा पासींग क्रमांक पाहीला असता एमएच-20-एफपी-7277 असे असलेली.
असा एकुण 13,68,550/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील आरोपी अमोल बिबीशन काळे वय 34 वर्ष रा. गट नंबर 168 प्लॉट नंबर 47 तिसगाव सिडको महानगर-1 छत्रपती संभाजीनगर त्यांचे विरुध्द पोलिस ठाणे चिकलठाणा येथे भादंवी कलम 328,188,272,273 सह कलम 59 अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येवुन त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास चिकलठाणा पोलिस करित आहेत.
सदरची कारवाई ही मनिष कलवानिया, पोलिस अधीक्षक यांचे विशेष पथकांने केली