पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाने नाकाबंदी व छापेमारी करुन अवैध गुटखा विक्रेत्यावर धडक कार्यवाही…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने नाकाबंदी व छापेमारी करुन जप्त केला  ७ लाखाचे वर गुटखा, आरोपींना घेतले ताब्यात….

छत्रपती संभाजीनगर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. 15 डिसेंबर 2024 रोजी 07.00 वा चे सुमारास पोउपनि संदीप शिंदे हे सोबतच्या पथकासोबत पोलिस आयुक्तालय हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई तसेच गुन्हेगार चेकींग कामी पेट्रोलिंग करीत असतांना पोलिस ठाणे मुकुंदवाडी हद्दीत झेडां चौक, पायलेट बाबा नगर मुकंदवाडी भागात एक इसम मारोती अल्टो कार MH 20 BC 5971 मध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाला व सुगंधीत तंबाखु विक्री करण्यासाठी घेवुन येणार आहे





अशी माहीती मिळाल्यावरुन झेडां चौक, पायलेट बाबानगर मुकुदवाडी येथे सापळा लावला असता सदर इसम सुरेश रमेश खोतकर वय – 37 वर्ष रा. प्लॉट नंबर 115 पायलेट बाबनगरी, मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर हा मारोती अल्टो कार MH 20 BC 5971 मध्ये गुटखा घेवुन जात असतानां मिळुन आला त्यास अधिक विचारपुस केली असता नमुद इसमाने त्याच्या राहते घरी गुटख्याचा साठा करुन ठेवलेला असल्याचे सांगीतले यावरुन त्याचे घराची झडती घेतली असता घरात सुध्दा गुटख्याचा मोठा साठा मिळूण आल्याने एकूण 7,17,248/- रुपये किमतीचा हीरा, गोवा, राजनिवास, RMD, विमल गुटखा जप्त करण्यात आला तसेच आरोपीच्या ताब्यातील मारोती अल्टो कार MH 20 BC 5971 व एक मोबाईल हॅन्डसेट असा एकुण 9,27,248/-  रु चा जप्त करण्यात आला.



सदर ईसम सुरेश रमेश खोतकर याची अधिक सखोल चौकशी केली असता त्याच्या ताब्यात मिळुण आलेला गुटखा हा त्याने 1) सोहेल महेमुद सय्यद वय-30 वर्ष रा. विड बायपास छत्रपती संभाजीनगर 2) सिराज सय्यद रा. बिड बायपास छत्रपती संभाजीनगर यांच्याकडुन खरेदी केल्याचे सांगीतल्याने तिन्ही आरोपी विरुध्द पोलिस ठाणे मुकुदंवाडी येथे गु.र.नं. 515/2024 कलम 123,223,274,275 भारतीय न्याय संहिता सह कलम 59 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनिमय 2006 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त प्रविन पवार, पोलिस उप आयुक्त (गुन्हे)प्रशांत स्वामी,सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे)सुभाष भुजंग यांचे मार्गदर्शनाखाली,विशेष पथकाचे पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे, पोलिस ठाणे सायबर, पोउपनि संदीप शिंदे, पोहवा विनोद परदेशी, अशरफ सय्यद, सुनिल जाधव, सुधीर मोरे, रंजक सोनवणे, सतिश हंबर्डे, पोलिस अंमलदार अजय दहिवाळ, सोहेल पठाण, प्रमोद सुरसे, मपोअ ज्योती काकडे, चालक विनोद गर्ज यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!