वैजापुर येथील बॅंकेत चोरीचा अयशस्वी प्रयत्न करुन तेथील दस्ताऐवजाची जाळपोळ करणारे स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

वैजापुर येथील महाराष्ट्र ग्रामीण बैंकमधील चोरीचा प्रयत्न करणारे तसेच बैंकेत जाळपोळ करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद……

वैजापुर(छ.संभाजीनगर) – याबाबत सवीस्तर व्रुत असे की,दि  20 एप्रिल 2025 रोजी फिर्यादी बजरंगलाल जुसालाल ठाका वय 31 वर्षे, व्यवसाय -बँक मॅनेजर महाराष्ट्र ग्रामीण बैंक रा. फुलेवाडी रोड वैजापुर ता. वैजापुर यांनी पोलिस ठाणे वैजापुर यांनी  येथे  येवुन तक्रार दिली  कि, दिनांक 20 एप्रिल 2025 चे पहाटे 03.24 वाजता चे दरम्यान अनोळखी चार ईसमाने एक स्वीफ्ट गाडी क्रमांक एम.एच.14 बी.एक्स. 7988 मध्ये येऊन महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चोरी करण्याच्या उद्देशाने शटर तोडुन बँकेत प्रवेश करुन बँकेला कशाने तरी आग लावुन स्फोट होऊन बँकेत ग्राहकाचे ठेवलेले ए.टी.एम. कार्ड, चेक बुक, डी.डी.बुक, कर्ज फाईल, कॅश वाउचर कॅम्युटर, युपीएस, फर्नीचर व दैनंदीन व्यवहाराचे कागदपत्र असे जाळुन 15 लाख रुपयाचे नुकसान केले,अशा बॅंक मॅनेजर बजरंगलाल जुसालाल ठाका यांचे फिर्यादी वरुन पोलिस स्टेशन वैजापुर येथे  गुरनं. 193/2025 कलम 305, 331(4), 62,326 (जी), 324 (5) भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.





नमूद गुन्हयांचे अनुषंगाने पोलिस अधिक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण डॉ. विनयकुमार मे. राठोड यांचे व अपर पोलिस अधिक्षक  अन्नपूर्णा सिंह यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्था.गु.शा सतिष वाघ यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकासह नमूद गुन्हयातील आरोपीचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.त्याअनुषंगाने सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठांच्या आदेशाने दिनांक 20/04/2025 रोजी स्थानिक गन्हे शाखेचे सहायक पोलिस निरिक्षक पवन इंगळे यांचे पथक तपास करित असतांना घटनास्थळी भेट देवुन घटनास्थळी मिळुन आलेली आरोपींची स्वीफ्ट गाडीची कसुन तपासणी केली असता गाडीच्या डिक्कीमध्ये वेगवेगळ्या नंबर प्लेट मिळुन आल्या त्याअनुषंगाने माहिती घेतली असता डिक्कीमध्ये सापडलेली नंबर प्लेट क्रमांक एम.एच.04 डि.डब्ल्यु. 4511 अशी मिळुन आल्याने तीचे बाबत पडताळणी केली असता नमुद स्विफ्ट गाडी हि ओम साई अॅटो कंन्सटींग मालेगाव जि. नाशिक येथुन विक्री झाली असल्याचे समजले



त्यावरुन सपोनि पवन इंगळे यांचे पथक मालेगाव जि.नाशिक येथे जावुन त्यांनी नमुद वाहनाची माहिती घेतली असता नमुद अॅटो कन्सींग मध्ये नमुद वाहनाच्या विक्री बाबतच्या डिलेव्हरी चलान मध्ये खरेदी करणा-याने नाव पत्ता व मोबाईल क्रमांक हे चुकिचे दिले असल्याचे आढळुन आले. गोपनीय व तांत्रिक माहिती आधारे दिनांक 21/04/2025 रोजी नमुद ईसम 1) अक्षय ज्ञानेश्वर कराळे वय 28 वर्षे रा. करंजगाव ता. वैजापुर जि. छत्रपती संभाजीनगर याचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेवुन नमुद घटनेबाबत विचारपुस केली असता त्याने सांगितले कि, भरत शिवाजी कदम रा. विरगाव याचेवर महाराष्ट्र ग्रामीण बँक वैजापुर येथुन बनावट कागदपत्राच्या आधारे कर्ज घेतल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्याचा राग व बदला घेण्यासाठी भरत शिवाजी कदम याचे सांगणेवरुन दिनांक 03/04/2025 रोजी मी, सोबत भरत शिवाजी कदम, सचिन सुभाष केरे रा. गवळी शिवरा, वैभव उर्फ गजु पंढरीनाथ केरे रा. गवळी शिवरा असे मालेगाव येथे ओम साई अॅटो कंन्सटींग मालेगाव जि. नाशिक येथे जावुन वाहन स्विफ्ट व्हिडिआय कार क्रमांक एम.एच.04 डि.डब्ल्यु. 4511 हि 1,55000/- रुपये मध्ये विकत घेतांना वाहन डिलेव्हरी चालानवर वाहन खरेदी करणाराचे नाव व पत्ता, मोबाईल क्रमांक हे चुकिचे देवून तेथुन नमुद स्विफ्ट गाडी घेवुन आलो. असे सांगुन दिनांक 20/04/2025 रोजी वैजापुर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चोरी व जाळण्याचा कट रचुन 2) भरत शिवाजी कदम 3) सचिन सुभाष केरे 4) वैभव उर्फ गजु पंढरीनाथ केरे 5) धारबा बळीराम बिराडे 6) आप्पा बालाजी वने यांचेसह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. याचे सांगणेवरुन कट रचुन नमुद महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न करुन जाळली आहे. सदर गुन्हयात दिनांक 21/04/2025 रोजी आरोपी  1) अक्षय ज्ञानेश्वर कराळे वय 28 वर्षे रा. करंजगाव ता. वैजापुर जि. छत्रपती संभाजीनगर 2) भरत शिवाजी कदम रा. विरगाव ता. वैजापुर 3) सचिन सुभाष केरे वय-25 वर्षे रा. गवळी शिवरा ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर 4) वैभव उर्फ गजु पंढरीनाथ केरे वय-27 वर्षे रा. गवळी शिवरा ता. गंगापुर जि.छत्रपती संभाजीनगर 5) धारबा बळीराम बिराडे वय 31 वर्षे रा. अंधोरी ता. अहमदपुर जि. लातुर यांना ताब्यात घेण्यात येवुन त्यांना पुढील कायदेशीर कार्यवाही कामी पोलिस ठाणे वैजापुर येथे हजर करण्यात आलेले आहे.



सदरच्या गुन्हयात तपासामध्ये असे आढळून आले आहे कि, यातील आरोपी भरत शिवाजी कदम रा.विरगाव ता. वैजापुर याचेवर पोलीस स्टेशन विरगाव गुरनं. 39/2024 कलम 120 (ब), 420, 467, 468,471 भादंवि. नुसार गुन्हा दाखल असुन वैजापुर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खोटे दस्तऐवज देवुन पैसे लाटुन बँकेची फसवणुक केली बाबत गुन्हा दाखल आहे. यातील आरोपी क्रमांक 5 धारबा बळीराम बिराडे वय-31 वर्षे रा.अंधोरी ता. अहमदपुर जि. लातुर हा घटना करते वेळेस आग लागुन त्याचे नाक जळाले आहे. तसेच आरोपी क्रमांक 6) आप्पा बालाजी बने रा.अंधोरी ता. अहमदपुर जि. लातुर हा फरार असुन तो सुध्दा घटना करतांना जळाला असल्याची माहिती ताब्यात घेतलेल्या आरोपींकडुन मिळाली आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक डॉ. विनयकुमार मे. राठोड, .अपर पोलिस अधिक्षक  अन्नपूर्णा सिंह यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक  सतिष वाघ, सपोनि पवन इंगळे, पोहवा भागीनाथ आहेर, विठ्ठल डोके,वाल्मीक निकम शिवानंद बनगे, नापोशि अशोक वाघ,दिपक सुरोशे,पोशि राहुल गायकवाड, योगेश तरमाळे, यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!