तडीपार गुन्हेगाराला नाशिक गुन्हे शाखेने केले पिस्तुलासह अटक…
तडीपार गुन्हेगाराला नाशिक गुन्हे शाखेने केले पिस्तुलासह अटक…
नाशिक (शहर प्रतिनिधी) – नाशिक शहर आयुक्तालयात पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपआयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा.पोलिस आयुक्त (गुन्हे) डॉ.सिताराम कोल्हे यांनी नाशिक शहरात अवैध अग्निशस्त्र बाळगणा-या व्यक्तींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत गुन्हेशाखा युनिट-२ ला मार्गदर्शन करून आदेश दिले होते. तेव्हा नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट २ यांनी तडीपार आरोपीस मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून देशी बनावटीच्या पिस्टल आणि काडतुसासह शहरात फिरत असताना अटक केली आहे.
त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली पो.अंमलदार महेश खांडबहाले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून (दि.१०एप्रिल) रोजी सापळा रचून इसम नामे वेदांत संजय चाळगे, (वय १९ वर्षे), रा.राहुलनगर, तिडके कॉलनी, वेद मंदिरच्या पाठीमागे, नाशिक यास पकडले असता तो पोलिस उपआयुक्त, परिमंडळ-१, नाशिक शहर यांचेकडील हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून नाशिक शहरातील चांडक सर्कल कडुन तरण तलावाकडे जाणा-या रोडवरील विजय शासकीय वसाहत समोरील सार्वजनिक रस्त्यावर वावरतांना मिळून आला, त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात एक देशी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) व एक जिवंत काडतुस आढळून आले. त्याला ताब्यात घेवून त्याचेकडून २५५००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अशा प्रकारे सदरची कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपआयुक्त गुन्हे/विशा, प्रशांत बच्छाव, सहा.पोलिस आयुक्त गुन्हे डॉ.सिताराम कोल्हे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र.२ कडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, सपोनि. सचिन जाधव, पोहवा. राजेंद्र घुमरे, पो.हवा.मनोहर शिंदे, पोअं.विशाल कुवर, पो.अंमलदार समाधान वाने, पो.अंमलदार महेश खांडबहाले, पोअं. सोमनाथ नाधव, पोअं.तेनस मते, पोहवा. चंद्रकांत गवळी,पोहवा. प्रकाश महानन, पोहवा.परमेश्वर दराडे, पोहवा. विनय वरंदळ, पोहवा. संजय सानप, पोहवा. मधुकर साबळे, पोअं.जितेंद्र वजीरे यांनी केलेली आहे.