कर्णकर्कश सायलेन्सर दुचाकी चालकांवर कारवाई; बसवून देणाऱ्यांवर सुद्धा…
कर्णकर्कश सायलेन्सर दुचाकी चालकांवर कारवाई; बसवून देणाऱ्यांवर सुद्धा…
धाराशिव (प्रतिनिधी) – पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या आदेशावरून (दि.१९फेब्रुवारी व दि.२०फेब्रुवारी) रोजी जिल्हाभरात वाहतुक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये ५९० वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाया करण्यात आल्या. ज्या मध्ये कर्णकर्कश सायलेन्सर, ट्रीपल सीट, वाहन चालविण्याचा परवाना न बाळगणे, विनानंबर प्लेट अशा प्रकारे कायद्यांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करून एकूण ३,९३,२५०/- रु. दंड आकारण्यात आला आहे.
अशा आवाजाचा दुष्परिणाम लहान मुले, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यावर होत असतो. या वाहनांबाबत परिवहन अधिकाऱ्यांना कळविण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करत विनापरवानगी गाडीमध्ये बदल करणाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या पुढे कर्णकर्कश सायलेन्सर वापरणारे व सायलेन्सर बसवून देणाऱ्यावर सुद्धा मोटारवाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील कायद्याचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांना दिला आहे.